मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा; सोमवार आणि मंगळवारी 'या' भागात असेल पाणीपुरवठा बंद

Mumbai Water cut : मुंबई पाणी संकट: बीएमसीने मुंबईकरांना सांगितले की ३० जानेवारीपासून ३१ नोव्हेंबरपर्यंत पाणीकपात केली जाईल.

 Water supply will be off in Mumabi on Monday and Tuesday
मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा; सोमवार आणि मंगळवारी 'या' भागात असेल पाणीपुरवठा बंद 
थोडं पण कामाचं
  • मुंबईच्या काही भागात दोन दिवस पाणी कपात
  • बीएमसीकडून एक जलवाहिनी जोडण्याचे काम सुरू
  • मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन

मुंबई : बीएमसीच्यावतीने जानेवारी महिन्याच्या अखेरीस पाणीकपात करण्यात आल्याने ते सांभाळून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई शहारमध्ये 30 आणि 31 जानेवारीला मुंबईच्या काही भागात दोन दिवस पाणी कपात होणार आहे. त्यामुळे निम्म्या मुंबईच्या पाणी पुरवठ्यावर त्याचा परिणाम होणार आहे. ( Water supply will be off in Mumabi on Monday and Tuesday)

अधिक वाचा : Pathaan movie in theaters: पठाण सिनेमा आज प्रेक्षकांच्या भेटीस, प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई महानगरपालिकेने भांडूप संकुलामध्ये जलशुद्धीकरण केंद्राला अजून 4000 मिलीमीटर व्यासाची एक जलवाहिनी जोडण्याचे काम सुरू केले. तसेच भांडूपमध्ये 2 ठिकाणी जलवाहिन्यांवर झाकण बसवणे, नवी जलवाहिनी जोडणे आदी काम हाती घेतले आहे.

अधिक वाचा : Pathaan Movie Review : चाहत्यांना कसा वाटला पठाण सिनेमा आणि IMDB वरील पठाणचे रेटिंग

या भागात पाणी पुरवठा बंद

बीएमसीच्या देण्यात आलेल्या माहितीनुसार, 30 जानेवारीला सकाळी 10 ते 31 जानेवारीला सकाळी 10 वाजेपर्यंत हा पाणीपुरवठा बंद केला जाणार आहे. 24 पैकी सुमारे 12 भागांमध्ये पाणीपुरवठा होणार आहे. 2 भागांमध्ये 25% पाणी कपात केली जाईल. मुंबई मध्ये पश्चिम उपनगरांत के पूर्व, के पश्चिम, पी दक्षिण, पी उत्तर, आर दक्षिण, आर मध्य, आर उत्तर, एच पूर्व आणि एच पश्चिम या भागामध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असणार आहे. तर पूर्व उपनगरामध्ये एस,एनआणि एल विभागात पाणीपुरवठा बंद असेल.

अधिक वाचा : Pathaan vs MNS : शाहरूख खानच्या पठाणला मनसेचा विरोध

या भागात अंशत: पाणी कपात

दरम्यान 'जी उत्तर' आणि 'जी दक्षिण' या प्रभागात येणार्‍या माहीम पश्चिम, दादर पश्चिम, प्रभादेवी व माटुंगा पश्चिम येथील पाणीपुरवठा 30 आणि 31 जानेवारी 2023 रोजी 25 टक्के कमी असणार आहे. तर धारावी परिसरातील ज्या भागात दुपारी 4 ते सायंकाळी 9 या दरम्यान पाणीपुरवठा होतो. त्या भागात 30 जानेवारी 2023 रोजी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवला जाईल. त्यामुळे मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी