Mumbra Station New Platform : मुंब्रा स्थानकावरील नव्या फलाटावर थांबणार गाडी, नव्या मार्गिकेवर धावणार मध्य रेल्वेच्या धीम्या गाड्या

Mumbra Station New Platform मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा दरम्यान पाचवी आणि सहावी मार्गिका सुरू झाली आहे. या मार्गावर मध्य रेल्वेच्या गाड्या धावणार आहेत. असे असले तरी ठाणे ते दिवादरम्यान नव्या कॉरिडरसाठी अजून दोन मेगाब्लॉक घेण्यात येतील.

Multibagger Stock
थोडं पण कामाचं
  • मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा दरम्यान पाचवी आणि सहावी मार्गिका सुरू झाली आहे.
  • या मार्गावर मध्य रेल्वेच्या गाड्या धावणार आहेत.
  • ठाणे ते दिवादरम्यान नव्या कॉरिडरसाठी अजून दोन मेगाब्लॉक घेण्यात येतील.

Mumbra Station New Platform : मुंबई : मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा दरम्यान पाचवी आणि सहावी मार्गिका सुरू झाली आहे. या मार्गावर मध्य रेल्वेच्या गाड्या धावणार आहेत. असे असले तरी ठाणे ते दिवादरम्यान नव्या कॉरिडरसाठी अजून दोन मेगाब्लॉक घेण्यात येतील. रविवारी २४ तासांचा जम्बो मेगाब्लॉक घेतल्यानंतर रेल्वेला यश आले आहे. आता दिवा ते कळवा दरम्यान नव्या कॉरिडरवर स्लो गाड्या धावणार आहेत. 

ठाण्याहून दिव्याल्या जाणारी गाडी कळवा बोगाद्यातून निघून रेल्वेच्या नव्या ओव्हर ब्रिजवरून धावतील. या गाड्या मुंब्रा स्थानकावरील नव्या फलाटावर थांबतील. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार कळवा दिवा दरम्यान साडे सहा किमीचा नवा मार्ग सुरू करण्यात आला आहे. पूर्वी १८ तासाचा मेगाब्लॉक घेण्यात आला होता, त्यामुळे दीड किमी नव्या मार्गाचे काम पूर्ण झाले होते. आता कळवा ते दिवादरम्यान नवा साडेसहा कि.मीचा मार्ग उपलब्ध झाला आहे.  


मध्य रेल्वेच्या अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार पूर्वी १८ आणि २४ तासांचा मेगाब्लॉकमुळे फक्त झोनल रेलेवेच्या एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या होत्या. परंतु ३६ आणि ७२ तासांच्या ब्लॉकमुळे दुसर्‍या राज्यातील ट्रेनही रद्द होण्याच्या शक्यता आहेत. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार ९ जानेवारी ३६ तासांचा मेगाब्लॉक घेण्याची शक्यता आहे. तर ६ फेब्रुवारी रोजी ७२ तासांचा मेगाब्लॉक घेण्याची शक्यता आहे. या ब्लॉक्ससाठी ट्रेन्सचे नियोजन एक आठवड्यापूर्वी करणे गरजेचे असते. 
 

ठाणे ते दिवादरम्यान अजूनही ९ किमीच्या चार मार्गिकेचे काम सुरू आहे. तर दिवा ते कल्याण आणि ठाणे ते कुर्लादरम्यान सहा मार्गिकांचे काम बाकी आहेत. त्यामुळे दिवा ते ठाणे दरम्यान जून २ मार्गिकेचे काम बाकी असल्याने प्रवाशांना अजून मेगाब्लॉकचा त्रास सहन करावा लागणार आहे. ९ किमीवरील ही अतिरिक्त मार्गिका बंद असल्याने लांब पल्ल्याच्या गाड्या लोकलच्या मार्गिकेवर चालवाव्या लागत आहेत, त्यामुळेच गाड्या उशीरा धावत असतात. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टचा हा प्रकल्प संपायला अजून जास्त अवधी लागणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी