'Wazegiri' of Jadhav, Chahal, Velarsu in Mumbai Municipal Corporation; BJP's allegation : मुंबई : मुंबई महापालिकेत २५ वर्षांत सुमारे तीन लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे; असा आरोप भारतीय जनता पार्टीने केला आहे. ‘आमच्या कारभारात लपवाछपवी नाही’ असे म्हणणारे मुख्यमंत्री १५ कोटींच्या ‘मनी लॉन्ड्रिंग’ प्रकरणात आयकर खात्याने ताशेरे ओढलेल्या स्थायी समिती अध्यक्षांचा अभिमान बाळगतात हे दुर्दैवी आहे; अशी टीका भारतीय जनता पार्टीचे आमदार मुंबई भाजपाचे सरचिटणीस अमित साटम यांनी केला.
BMC Whatsapp Chatbot : मुंबई महापालिकेच्या ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेचे लोकार्पण
मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीत बेकायदेशीर प्रस्तावांना मंजुरी दिली जाते. ही लपवाछपवी नेमकी कशासाठी? भ्रष्टाचारासाठी की, मलिदा लाटण्यासाठी? असा रोखठोक सवाल अमित साटम यांनी केला. भ्रष्टाचार करायला अक्कल लागत नाही. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, आयुक्त इक्बाल सिंह चहल, वेलरसु यांच्या रुपात वाझेगिरी सुरू आहे. या सर्वांचा 'हँडलर' कोण याचा शोध घेतला पाहिजे; असे अमित साटम म्हणाले. महापालिकेच्या निवडणुकीत सत्ताधारी शिवसेनेला मुंबईकर जनता उखडून फेकल्याशिवाय राहणार नाही; असेही ते म्हणाले.
कोविडच्या काळात मुंबई महापालिकेत ३ हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला. कोविड सेंटरची कामे नातेवाईक गँगला दिली जातात. मुख्यमंत्री कोविड काळातील महापालिकेच्या कामांचे कौतुक करतात. पण देशात झालेल्या ४ लाख ८५ हजार मृत्यूपैकी १ लाख ४२ हजार महाराष्ट्रातले आहेत; असे अमित साटम यांनी सांगितले.
कोस्टल रोड, पोईसर, मिठी नदी, शालेय टॅब खरेदी, ट्रेंचिंग या कामांमध्ये भ्रष्टाचार करून सर्वसामान्य जनतेला ओरबडता येईल तेवढे ओरबाडण्याचे काम सुरू आहे; असा आरोप अमित साटम यांनी केला.
मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीत प्रस्ताव सादर करुन ते मंजूर करण्याची प्रक्रिया पूर्ण करताना विरोधकांना बोलू दिले जात नाही. प्रस्ताव समितीसमोर आणून बेकायदेशीरपणे मंजूर केले जातात. सत्ताधाऱ्यांच्या हुकुमशाही वृत्तीमुळे लोकशाही मूल्यांची पायमल्ली होत असून कायद्याचे पालन होत नसल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या स्थायी समिती सदस्यांनी अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडला आहे; असे अमित साटम यांनी सांगितले.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.