Shiv Sena: 'राज्यात भाजपला धोका दिल्याने शिवसेना फोडली', मोदींचा गौप्यस्फोट

मुंबई
रोहित गोळे
Updated Aug 10, 2022 | 14:04 IST

Shiv sena betrayed us and faced consequences said sushil modi: शिवसेनेने आम्हाला धोका दिला म्हणून आम्ही शिवसेना फोडली असा गौप्यस्फोट भाजपच्या एका दिग्गज नेत्याने केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

we broke only those who betrayed us in maharashtra shiv sena betrayed us and faced consequences said sushil modi
'भाजपला धोका दिल्याने शिवसेना फोडली', मोदींचा गौप्यस्फोट 
थोडं पण कामाचं
  • शिवसेना भाजपनेच फोडल्यादा सुशील मोदींनी केला गौप्यस्फोट
  • शिवसेनेने महाराष्ट्रात दगा दिल्याने भाजपने शिवसेना फोडल्याचा सुशील मोदींचा दावा
  • सुशील मोदींच्या दाव्यानंतर शिवसेनेची भाजपवर आक्रमक टीका

Sushil Modi: मुंबई: साधारण दोन महिन्यांपूर्वी राज्यात सत्तेत असणाऱ्या शिवसेनेत (Shiv Sena) मोठं बंड झालं. त्यानंतर बंडखोर आमदारांनी  भाजपच्या (BJP) मदतीने राज्यात नवं सरकार स्थापन केलं. पण या सगळ्यात भाजप आतापर्यंत असा दावा करत होती की, शिवसेनेत बंडखोरी ही त्यांच्यातील अंतर्गत वादामुळे झाली. शिवसेना फोडण्यात भाजपचा अजिबात हात नव्हता. मात्र, आता पहिल्यांदा भाजपाच्या एका मोठ्या नेत्याने शिवसेना भाजपनेच फोडल्याचे मान्य केलं आहे. (we broke only those who betrayed us in maharashtra shiv sena betrayed us and faced consequences said sushil modi)

त्याचं झालं असं की, काल (९ ऑगस्ट) बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत राजदशी हातमिळवणी केली. त्यामुळे बिहारमधून भाजपला सत्तेतून बाहेर पडावं लागलं. नितीश कुमारांच्या याच खेळीमुळे भाजप नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी (Sushil Kumar) हे खूपच चिडले आहेत. याचबाबत बोलताना सुशील मोदी यांनी मोदी यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. जो महाराष्ट्रासाठी संबंधित आहे.

अधिक वाचा: शिंदे गटातील या आमदारांना मंत्रिपद देण्यास भाजपचा होता विरोध

महाराष्ट्रात भाजपला धोका दिल्याने शिवसेना फोडली असा गौप्यस्फोट सुशील मोदी यांनी यावेळी केला आहे. शिवसेना भाजपनंच फोडल्याचं उघड वक्तव्य मोदी यांनी केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. भाजपला धोका दिल्याचे परिणाम शिवसेना भोगते आहे. असंही ते यावेळी म्हणाले. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना इशारा देताना सुशील मोदी यांनी शिवसेनेसंदर्भात हे वक्तव्य केलं आहे. 

पाहा सुशील मोदी नेमकं काय म्हणाले: 

'भाजपने आजपर्यंत कधीही आपल्या सहयोगी पक्षाला धोका दिलेला नाही. आम्ही त्याच पक्षाला फोडलं ज्यांनी आम्हाला धोका दिला. मग ते महाराष्ट्रात शिवसेना असो. त्यांची युती होती भाजपसोबत, पण शिवसेनेने जेव्हा धोका दिला तेव्हा त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागले.' असा गौप्यस्फोट सुशील मोदी यांनी केला आहे. 

अधिक वाचा: मंत्रिमंडळ विस्ताराचा पुढचा टप्पा कधी, कुणाला मिळणार संधी?

'राजद-जदयूला असा भ्रम आहे की, तिघे एकत्र आल्यानंतर ते लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींनी हरवू शकतो. ते हे विसरत आहेत की, आज नरेंद्र मोदींची लोकप्रियता २०१४, २०१९ पेक्षा देखील किती तरी पटीने जास्त आहे. त्यामुळे त्यांनी कितीही ताकद लावली तरी 2024 मध्ये ते नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनण्यापासून रोखू शकत नाहीत. तसंच आम्ही बिहारमध्ये प्रचंड बहुमतांनी निवडून येऊ.' असं म्हणत सुशील मोदींनी नितीश कुमार आणि त्यांच्या पक्षाला एकप्रकारे इशाराच दिला आहे. 

शिवसेनेचा हल्लाबोल 

दरम्यान, सुशील मोदी यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेनेने भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'पाठीत सुरा खुपसण्यात भाजप एक्सपर्ट आहे.' अशी जहरी टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी यावेळी केली आहे. तर 'भाजप ज्या शिडीवरुन वर चढते त्याच शिडीला लाथ मारते.' अशा शब्दात खासदार अरविंद सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला. दुसरीकडे शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी 'भाजपची निती ही इंग्रजांसारखी आहे. आधी जोडायचं मग फोडायचं. पण एक दिवस भाजपच्या याच दमननितीचा हिंदुस्थानात स्फोट होईल.' अशी टीका केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी