'आमच्याकडे महाराष्ट्रात 'योगी' कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे "भोगी", राज ठाकरेंची राज्य सरकारवर टीका

मुंबई
भरत जाधव
Updated Apr 28, 2022 | 15:44 IST

भोंग्याच्या प्रकरणावरुन सध्या महाराष्ट्रभर राजकारण तापलं आहे. यातच आता मनसेप्रमुख (MNS) राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उत्तरप्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री (Chief Minister) योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचे अभिनंदन करत राज्यातील महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) जोरदार टीका केली आहे. 

Raj Thackeray's criticism on State Government
आमच्याकडे महाराष्ट्रात 'योगी' कुणीच नाही,आहेत ते फक्त....  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • धार्मिक स्थळांवरुन विशेषत: मशिदींवरुन भोंगे काढण्याबाबत राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर राज्यासह देशभरात वातावरण तापलं.
  • मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं अभिनंदन केलं आहे.
  • योगी आदित्यानाथ यांनी धार्मिक स्थळावरील अवैध भोंगे काढण्याचा निर्णय घेतला आहे.

Raj Thackeray Tweet On Yogi Sarkar : मुंबई : भोंग्याच्या प्रकरणावरुन सध्या महाराष्ट्रभर राजकारण तापलं आहे. यातच आता मनसेप्रमुख (MNS) राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उत्तरप्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री (Chief Minister) योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचे अभिनंदन करत राज्यातील महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) जोरदार टीका केली आहे. धार्मिक स्थळांवरुन विशेषत: मशिदींवरुन भोंगे काढण्याबाबत राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर राज्यासह देशभरात वातावरण तापलं आहे. अशात उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारनं (Yogi Sarkar) धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचं राज ठाकरेंनी कौतुक केलं आहे.

या निर्णयावरुन त्यांनी योगींचं कौतुक करत उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. राज ठाकरे यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील, विशेषत: मशिदींवरील भोंगे उतरवल्या बद्दल योगी सरकारचं मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार. आमच्याकडे महाराष्ट्रात योगी कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे भोगी आहेत. महाराष्ट्र सरकारला सद्बुद्धी मिळो, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना असं ट्वीट राज ठाकरे यांनी केलं आहे. 

ट्विटमधील अभिनंदन पत्र राज ठाकरेंनी मराठी आणि इंग्रजी या दोन भाषेत लिहिलं आहे. राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी राज्य सरकारला तीन मे चा अल्टिमेटम दिला आहे. भोंगे हटवण्याबाबत राज्य सरकारनं निर्णय घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं आहे. राज ठाकरे यांच्या या घोषणेनंतर राज्यासह देशभरात वातावरण ढवळून निघाले आहे.

Read Also : पंतप्रधानांनी बिगर भाजपशासित राज्यांना टोमणे मारले - राऊत

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबईत जाहीर सभा घेत मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. त्यासोबतच महाविकास आघाडी सरकारवरही जोरदार हल्लाबोल केला. भोंग्याच्या प्रकरणावरुन सध्या महाराष्ट्रभर राजकारण तापलं असून प्रशासनाकडून शांततेच आवाहन केलं जात आहे. दरम्यान, येत्या 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनी औरंगाबादेत जाहीर सभेचं आयोजन केलं आहे. या सभेला विरोधही होताना दिसत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी