Uday Samant : आमच्या मनात उद्धव ठाकरेंबद्दल आदर कायम राहणार, उदय सामंत यांची प्रतिक्रिया

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र येण्यासाठी जे काही निर्णय घेतील ते मान्य असेल अशी भूमिका शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि माजी मंत्री उदय सामंत यांनी मांडली आहे. तसेच आमच्या मनात उद्ध ठाकरे यांच्याबद्दल कायम आदर आहे असेही सामंत म्हणाले.

थोडं पण कामाचं
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र येण्यासाठी जे काही निर्णय घेतील ते मान्य असेल
  • आमच्या मनात उद्ध ठाकरे यांच्याबद्दल कायम आदर आहे
  • आम्ही सर्व शिवसेनेतच आहोत

Uday Samant : पुणे :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र येण्यासाठी जे काही निर्णय घेतील ते मान्य असेल अशी भूमिका शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि माजी मंत्री उदय सामंत यांनी मांडली आहे. तसेच आमच्या मनात उद्ध ठाकरे यांच्याबद्दल कायम आदर आहे असेही सामंत म्हणाले.

पुण्यात एका पत्रकार परिषदेत सामंत म्हणाले की, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले म्हणून 18 जुलै रोजी पुणेकरणाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. तसेच एकनाथ शिंदे आणि आम्ही घेतलेल्या भूमिकेला  पुण्यातील कार्यकर्त्यांकडून मोठे समर्थन मिळत आहे असे सामंत म्हणाले. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंना एकत्र यायचे असेल तर त्याबाबत शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असेही सामंत म्हणाले.  

सामंत म्हणाले की,  आम्ही सर्व शिवसेनेतच आहोत, पण हे जे काही नगरसेवक आमच्यासोबत येताहेत ते शिंदे साहेबांनी घेतलेल्या भूमिकेला समर्थन देण्यासाठी आमच्यासोबत येत आहेत. रत्नागिरीतही 18 नगरसेवक मला भेटले आणि त्यांनी शिंदे साहेबांच्या भूमिकेला समर्थन दिल आहे. माझी आज काही पिंपरी चिंचवड येथील  नागरिकांसोबत  चर्चा झाली. याचा अर्थ शिवसेना फुटली असा होत नाही. तसेच कुणाला कोणते पद द्यायचे याचा सर्वस्वी निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा आहे. तसेच विरोधकांच्या टीकेवरून एकनाथ शिंदे यांचं भाजपकडून खच्चीकरणं होत आहे असे मला वाटत नाही. माइक आणि चिठ्ठीबाबत उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः खुलासा केला आहे असेही सामंत म्हणाले

सामंत म्हणाले की, आम्ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचेच शिवसैनिक आहोत, आम्ही फक्त शिंदे साहेबांच्या भूमिकेचं समर्थन करतोय. तसेच विनायक राऊत हे माझ्या वडिलांसारखे आहे. विनायक राऊत यांनी कितीही टीका केली तरी मी त्यांच्यावर टीका करणार नाही कारण ती आपली संस्कृती नाही. शिवसेना प्रवक्ता दीपक केसरकर आणि राणे यांच्या होणाऱ्या टिके बाबत सामंत यांनी विनोदाचा रंग दिला. सिंधुदुर्ग ही मनोरंजन नगरी असल्याचे सामंत म्हणाले आहेत. आमच्या या उठावात एकनाथ शिंदे यांनी एकदा ही असे सांगितले नाही की, मला शिवसेना बळकवायची आहे किंवा शिवसेनेचा धनुष्यबाण मला ताब्यात घ्यायचा आहे. मला पक्षप्रमुख व्हायचे आहे. असा कोणताही गैरसमज करु नये. उध्दव साहेबांसाठी आदर जो काल आमच्या मनामध्ये होता तो आज ही आहे आणि भविष्यात देखील राहणार आहे असेही सामंत यांनी नमूद केले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी