मोठी बातमी : ये सोमय्या झुकेगा नही ! आरोपांप्रकरणी सर्व माहिती आम्ही उच्च न्यायालयात देणार

मुंबई
भरत जाधव
Updated Apr 12, 2022 | 12:27 IST

आएनएस विक्रांत (INS Vikrant) प्रकरण समोर येताच बरोबर अज्ञातवासात जाणारे किरीट सोमय्या (Kirit Somaiya) एका व्हिडिओमधून जगासमोर आले आहेत. शिवसेना नेते (Shiv Sena leader) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी 'आएनएस विक्रांत'बाबत सोमय्यांवर आरोप केले होते.

We will give all the information about the allegations in the High Court
गायब असणारे किरीट सोमय्या व्हिडिओतून आले समोर   |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • डिसेंबर २०१३ मध्ये तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने 'विक्रांत' युद्धनौका ६० कोटी रुपयांना भंगारमध्ये विकत होते - सोमय्या
  • प्रतिकात्मकरित्या निधी जमा करत 11 हजार रुपये गोळा झाले.
  • दोन महिन्यांमध्ये संजय राऊत यांनी माझ्यावर सात वेगवेगळे आरोप केले, पण पुरावा नाही.

मुंबई : 'आएनएस विक्रांत (INS Vikrant) प्रकरण समोर येताच बरोबर अज्ञातवासात जाणारे किरीट सोमय्या (Kirit Somaiya) एका व्हिडिओमधून जगासमोर आले आहेत. शिवसेना नेते (Shiv Sena leader) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी 'आएनएस विक्रांत'बाबत सोमय्यांवर आरोप केले होते. त्या आरोपानंतर माजी सैनिकाच्या तक्रारीवरून भाजप नेते (BJP leader) आणि माजी खासदार (Former MP) किरीट सोमय्या आणि त्यांचे सुपुत्र नील सोमय्या यांच्याविरोधात मुंबई पोलिसात (Mumbai Police) गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर किरीट सोमय्या हे अज्ञातवासात गेले असल्याची चर्चा सुरू आहे.

दरम्यान या चर्चांवर पडदा टाकण्यासाठी सोमय्या यांनी एक व्हिडिओ शेअर करत याप्रकरणी आपली बाजू मांडत राज्य सरकारला परत आव्हान दिलं आहे.
प्रसारित केलेल्या व्हिडिओमध्ये सोमय्या म्हणातात, 'डिसेंबर २०१३ मध्ये तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने 'विक्रांत' युद्धनौका ६० कोटी रुपयांना भंगारवाल्याला विकण्यासाठी काढली होती. त्यामुळे आम्ही या गोष्टीचा निषेध करत प्रतिकात्मकरित्या निधी जमा करण्याचा निर्णय घेतला होता आणि यामध्ये ११ हजार रुपये जमा झाले होते.

मात्र आता १० वर्षांनंतर शिवसेना नेते संजय राऊत आरोप करत आहेत की, आम्ही ५८ कोटी रुपये चोरून मुलाच्या कंपनीच्या माध्यमातून मनी लॉन्ड्रिंग केलं. याआधीही मागच्या दोन महिन्यांमध्ये संजय राऊत यांनी माझ्यावर सात वेगवेगळे आरोप केले आहेत, परंतु यातील एकाही आरोपाचा कागद पुरावा म्हणून पोलिसांकडे नाही,' तक्रारदाराला राऊतांना विचारल्यानंतर ते सांगतात आम्ही सोमय्यांचे स्टेटमेंट दिलं आहे, असा दावा सोमय्या यांनी केला आहे.

ठाकरे सरकारला आव्हान

किरीट सोमय्या यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओतून पुन्हा एकदा ठाकरे सरकारला आव्हान दिलं. 'ठाकरे सरकारमधील घोटाळेबाज मंत्र्यांवर शेवटची कारवाई होईपर्यंत मी झुकणार नाही आणि मागे हटणार नाही. माझ्यावर झालेल्या आरोपांप्रकरणी सर्व माहिती आम्ही उच्च न्यायलयात देणार आहोत,' असं किरीट सोमय्या यांनी सांगितलं आहे. दरम्यान, आयएनएस विक्रांत प्रकरणात मुंबई पोलीस किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांचा शोध घेत असून ते दोघेही अद्याप हाती लागले नसल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे. 

ईडी'च्या धमक्या देऊन थायलंड आणि बँकॉकमध्ये पैसे जमा होतात - राऊत 

दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी ईडीच्या कारवाईवरुन भाजपला टीका केली आहे. भाजपशी संबंधित नेत्यांची एक माफिया टोळी ईडीची धमकी देऊन लोकांकडून पैसे उकळत आहे. हे पैसे थायलंड आणि बँकॉकमध्ये जमा केले जातात, असा गंभीर आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी