Weather Forecast Maharashtra : मुंबई : मागील काही दिवसांपासून हवामानामध्ये (Weather) सातत्याने बदल होत असल्याने राज्यातील(State) काही भागात कधी पावसाच्या (Rain) सरी तर कधी कडाक्याची थंडी (Cold) पडल्याचं चित्र आहे. मुंबई(Mumbai), पुणे(Pune) अशा मोठ्या शहरातही कधी हुडहुडी तर कधी ढगाळ वातावरण असं चित्र निर्माण झाले आहे.
हवामानाच्या या स्थितीमुळे शेतीचे(Agriculture) नुकसान होत आहे. पावसामुळे आणि धुक्यामुळे (Fog) आंबा (Mango) बागायतदारांची चिंता वाढली आहे. मध्यरात्री झालेल्या या पावसामुळे वातावरणातल्या गारव्यात आणखीन वाढ झाली आहे. दापोलीत अवकाळी पावसानंतर पडलेल्या थंडीमुळे आंब्याला मोहर आला होता. मात्र पुन्हा हलका पाऊस ढगाळ वातावरणामुळे मोहर करपण्याची धास्ती आंबा-काजू बागायतदार शेतकऱ्यांनी घेतली आहे. दरम्यान, मुंबईतील दादर, लोअर परेल, महालक्ष्मी आणि आसपासच्या भागात पावसाचा हलक्या सरींमुळे हवामानातील गारवा वाढला आहे. तर सिंधुदुर्ग (Sindhudurg Weather) जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या आहेत.
पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये तर पारा आणखी घसरला असून जागोजागी शेकोट्या पेटलेल्या दिसत आहेत. पुण्यातल्या काही ठिकाणी 22 आणि 23 जानेवारीला पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली होती. या अंदाजानुसार मध्यरात्री राज्यातल्या काही भागात पावसानं हजेरी लावली. शनिवारी मध्यरात्री राज्यातील मुंबई, ठाणे पालघर आणि नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगावमध्ये पावसाने हजेरी लावली. महाबळेश्वरमध्येही अजूनही पाऊस सुरुच आहे. दरम्यान आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.
हवामान खात्याने काल मुंबईसह पुणे, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या अकरा जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली होती. काल सकाळपासून याठिकाणी ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली. त्यामुळे पुढील तीन ते चार तासांत संबंधित जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. यासोबतच दक्षिण गुजरात आणि लगतच्या मध्य प्रदेशात देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. काही भागांत पावसाला सुरुवात देखील झाली आहे.
आज महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र कोरडं हवामान राहण्याची शक्यता आहे. 23 जानेवारीनंतर राज्यात अनेक ठिकाणी थंडीचा कडाका वाढणार आहे. दरम्यान किमान तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसची घट होण्याची शक्यता आहे. मच्छिमारांनी पुढील किमान 5 दिवस मासेमारी करण्यासाठी खोल समुद्रात जाऊ नये, असा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. दरम्यान याठिकाणी 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार आहेत. वाऱ्यांचा वेग 60 किमी प्रतितास इथंपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.