weather Update : राज्यात सरासरीच्या तुलनेत मोठी तापमानवाढ; सप्टेंबरमध्येच 'ऑक्टोबर हिट'

मुंबई
भरत जाधव
Updated Sep 04, 2022 | 07:10 IST

 मुंबईमध्ये (Mumbai) गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या उकाड्यामुळे 'ऑक्टोबर हीट' (October heat)ची जाणीव होत आहे. गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) काळामध्ये पावसाने दिलासा दिला असला, तरी उकाड्यानेही हैराण झाले आहेत. केवळ मुंबईच नाही, तर संपूर्ण राज्यामध्येच सरासरीपेक्षा कमाल तापमानात मोठा फरक जाणवत आहे.

'October Hit' in September itself
राज्यात सरासरीच्या तुलनेत मोठी तापमानवाढ;  |  फोटो सौजन्य: Google Play
थोडं पण कामाचं
 • सध्या मान्सूनचे वारे कमजोर झाले आहेत.
 • पुढील आठवड्याच्या अखेरपर्यंत म्हणजे किमान सहा दिवस उकाडा जाणणार आहे.

मुंबई : मुंबईमध्ये (Mumbai) गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या उकाड्यामुळे 'ऑक्टोबर हीट' (October heat)ची जाणीव होत आहे. गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) काळामध्ये पावसाने दिलासा दिला असला, तरी उकाड्यानेही हैराण झाले आहेत. केवळ मुंबईच नाही, तर संपूर्ण राज्यामध्येच सरासरीपेक्षा कमाल तापमानात मोठा फरक जाणवत आहे. ही परिस्थिती पुढील आठवड्याच्या अखेरपर्यंत म्हणजे किमान सहा दिवस कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  (weather Update : Greater than average warming in the state; 'October Hit' in September itself)

राज्यामध्ये सध्या पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव अधिक आहे. या वाऱ्यांमुळे तापमानात वाढ आणि वातावरणात अस्वस्थता जाणवत असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकारी सुषमा नायर यांनी सांगितले. पावसाळ्यापूर्वीच्या काळात जाणवणारी असह्य उष्णता आणि आर्द्रता सध्या मुंबईमध्ये अनुभवायला येत आहे. सध्या मान्सूनचे वारे कमजोर झाले आहेत. मान्सूनच्या वारे पश्चिमेकडून वाहतात. पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा पावसाळी ढगांच्या निर्मितीसाठी उपयोग होत नाहीये. अरबी समुद्रातही सध्या असलेले पश्चिमेकडून वाहणारे वारे कमजोर आहेत. पावसाळी वारे कमजोर असतात, तेव्हा तापमानामध्ये ही वाढ दिसू लागते, असेही नायर यांनी स्पष्ट केले. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. आणखी आठवडाभर तरी तापमानात फारशी घट अपेक्षित नसल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईचे तापमान ३५ अंशांच्या पार जाण्याची शक्यता कमी असल्याचेही त्या म्हणाल्या. मात्र ३३ ते ३४ अंशांदरम्यान असलेले तापमानही त्रासदायक ठरत आहे.

 • सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याचा अंदाज असून, त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात पावसाळी वातावरण निर्माण होण्याचा अंदाज आहे.
 •  कुलाबा आणि सांताक्रूझ या दोन्ही ठिकाणी कमाल तापमान सरासरीपेक्षा अनुक्रमे २.४ आणि २.६ अंश सेल्सिअसने तापमान अधिक
 • डहाणू केंद्रावर शनिवारी ३४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद, सरासरीहून ३.४ अंशांनी अधिक तापमान
 • उर्वरित महाराष्ट्रातील स्थिती
 • मध्य महाराष्ट्रात जळगाव येथे कमाल तापमानाचा पारा ३६.७ अंशांवर, सरासरीपेक्षा तब्बल ५ अंशांनी तापमान अधिक
 • पुणे येथे कमाल तापमान ५.९ अंशांनी सरासरीपेक्षा जास्त तर सातारा येथे कमाल तापमान सरासरीपेक्षा ५.१ अंशांनी अधिक
 • सोलापूर येथे पारा ३५.२ अंशांवर
 • मराठवाड्यात परभणी येथे सरासरीपेक्षा कमाल तापमान ५ अंशांनी अधिक, कमाल तापमानाचा पारा ३६ अंशांवर
 • औरंगाबाद येथे कमाल तापमान ३.८ अंशांनी अधिक तर नांदेड येथे कमाल तापमान ३ अंशांनी अधिक

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी