Weather In Maharashtra: बळीराजा चिंताग्रस्त, येत्या तीन दिवसात राज्यात पावसाची शक्यता, पाऊस या जिल्ह्यांना झोडपणार 

Weather forcast In Maharashtra : अरबी समुद्रात कर्नाटकाच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट ओढविणार आहे.  येत्या तीन दिवसात राज्यात अवकाळी पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. 

weather update rain alert in maharashtra imd pune kokan kolhapur marathwada vidarbha
येत्या तीन दिवसात राज्यात अवकाळी पावसाची शक्यता  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अरबी समुद्रात कर्नाटकाच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचं क्षेत्र निर्माण
  • राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट ओढविणार आहे.
  •  येत्या तीन दिवसात राज्यात अवकाळी पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. 

 Maharashtra Rain Forecast ।  मुंबई :  अरबी समुद्रात कर्नाटकाच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट ओढविणार आहे.  येत्या तीन दिवसात राज्यात अवकाळी पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. (weather update rain alert in maharashtra imd pune kokan kolhapur marathwada vidarbha)

ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या भागात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मेघगर्जना होऊन पाऊस होण्याची शक्यता आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


मंगळवारी राज्यात काही ठिकाणी पावसाची बॅटिंग 

राज्यातल्या विविध भागात मंगळवारी रात्री पावसाने हजेरी लावली. यावेळी कोकण, सातारा आणि पुण्यात पावसाने जोरदार हजेरी लावली.   सातारा शहर परिसर, महाबळेश्वर, पाचगणी परिसरात रात्री एक पासून पहाटे तीन वाजेपर्यंत सुमारे दोन तास मेघगर्जनेसह पाऊस बरसला. तर रत्नागिरी, खेड येथेही मुसळधार पावसाने बॅटिंग केली. दापोली, मंडणगडमध्ये पावसाचे वातावरण निर्माण झाले होते. चिपळूण, संगमेश्वर, लांजा, राजापूरमध्ये पावसाने वर्दी दिली. 

काय आहे हवामान खात्याचा अंदाज 

पुढील चार दिवस राज्यात विविध ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची (Heavy rainfall) शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट (yellow alert) जारी केला आहे.

सध्या शेतीतील कापणीची कामे संपली आहेत. तर अनेक जिल्ह्यांमध्ये रब्बी हंगामातील पिकांची लागवड करण्यास सुरुवात झाली आहे.

 अनेक शेतकरी वाल, मूग, पांढरा कांद्याची पेरणी करत आहे.  आंब्याला पालवी येण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. अशा स्थितीत पुढील चार दिवस राज्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. आंब्याची पालवी कुजून मोहोर येण्याची प्रक्रिया लांबवणीवर पडण्याची भीती बळीराजाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
 
पुढील तीन-चार तासांत याठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. आकाशात विजा चमकत असताना, नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी