Pawar Mamata meet : काँग्रेसला वगळून तिसऱ्या आघाडीचे सुरू झाले का प्रयत्न? काय घडलं बैठकीत जाणून घ्या 

Thrid front । पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची  त्याच्या मुंबईतील निवासस्थान सिल्व्हर ओक येथे भेट घेतली. 

west bangal cm mamata banerjee meet ncp chief sharad pawar in mumbai house Silver oak
काँग्रेसला वगळून तिसऱ्या आघाडीचे सुरू झाले का प्रयत्न?  
थोडं पण कामाचं
  • पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी महाराष्ट्र दौऱ्यावर
  • शरद पवार यांची घेतली मुंबईत भेट
  • तिसऱ्या आघाडीचे दिले संकेत

Mamata banarjee Mumbai vist । मुंबई : महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी (Mamata banarjee)यांनी आज राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची त्यांचे निवास स्थान असलेल्या सिल्व्हर ओक (Silver Oak) येथे भेट घेतली. या दोन्ही नेत्यांची तब्बल एक तास बैठक चालली. (west bangal cm mamata banerjee meet ncp chief sharad pawar in mumbai house Silver oak )

यूपीएला वेगळा पर्याय

या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ममता बॅनर्जी  (Mamata banarjee)यांनी मोठे विधान केले. यूपीए आता अस्तित्वात नाही असे बोलून ममता बॅनर्जी यांनी यूपीएला सुरूंग लागल्याची वर्दी दिली आहे. पण जर वेगळी आघाडी होणार असेल तर त्याचं नेतृत्व कोण करणार यावर मात्र ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांनी उत्तर देणे टाळले आहे. काँग्रेस (congress) वगळून अन्य  पक्षांची आघाडी तयार करण्याचे प्रयत्न आता अवघ्या देशभरात सुरु झालेले आहेत हे स्पष्ट झाले आहे.  आणि ममता बॅनर्जी या प्रयत्नांमध्ये आघाडीवर आहेत.

सध्या देशात जी परिस्थिती आहे त्याविरोधात एक मजबूत पर्याय उभे करण्याची गरज आहे, हे  एकटे कोण करु शकत नाही, जे जिथे मजबूत आहे त्यांना सोबत घेऊन हे करता येईल भाजप विरोधात असणाऱ्या सर्वांना एकत्र घेऊन यूपीए व्यतिरिक्त वेगळा पर्याय देणार असल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. 

ममतांच्या विधानाचं पवारांकडून समर्थन

ममता बॅनर्जी यांनी आज मुंबईतील एका कार्यक्रमात राहुल गांधी यांच्यावर नाव न घेता हल्लाबोल केला. विदेशात राहून कसं चालेल? हा टोमणा मारला आहे. ममता बॅनर्जी यांच्या या विधानाचे शरद पवार यांनी समर्थन केले आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा जो विजय झाला, नेता रस्त्यावर राहिला तरच विजय होतो हे ममतांचे म्हणणे बरोबर आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

शरद पवार यांची वेगळी भूमिका

काँग्रेसला वगळून यूपीएला वेगळा पर्याय देण्याच्या ममता बॅनर्जी यांच्या भूमिकेवर मात्र  शरद पवार यांनी मात्र आपली वेगळी भूमिका मांडली.  काँग्रेसला वगळण्याचा प्रश्न नाही, भाजपविरोधात असलेल्या कुणालाही एकत्र यायचे असेल तर त्यांचं स्वागत आहे, नेतृत्व हा महत्त्वाचा मुद्दा नाही, सक्षम पर्याय उपलब्ध करुन देणे महत्त्वाचा विषय असल्याचे शरद पवार यांना स्पष्ट केले आहे. जे सगळ्यांसह येण्याबरोबर तयार आहे त्या सर्वांबरोबर मिळून पुढे जाऊ, भाजप विरोधात एकत्र येणाऱ्या सगळ्या पक्षांचं स्वागत असल्याचं शरद पवार यांनी म्हटले आहे. 

2024 च्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाविरोधात एक मजबूत नेतृत्व उभं करण्याची गरज आहे, त्या दृष्टीने या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचंही पवार यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी