पश्चिम रेल्वेवर १५ डबा गाड्यांच्या फेऱ्या वाढणार

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jul 06, 2022 | 18:13 IST

western railway planning to increase 15 coaches local rounds : वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करून पश्चिम रेल्वे मार्गावरील १५ डबा गाड्यांच्या फेऱ्या वाढविण्याची तयारी सुरू आहे.

western railway planning to increase 15 coaches local rounds
पश्चिम रेल्वेवर १५ डबा गाड्यांच्या फेऱ्या वाढणार  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • पश्चिम रेल्वेवर १५ डबा गाड्यांच्या फेऱ्या वाढणार
  • सध्या पश्चिम रेल्वे मार्गावर १५ डबा गाड्यांच्या ७९ फेऱ्या होतात
  • आणखी २७ फेऱ्यांची भर लवकरच पडणार

western railway planning to increase 15 coaches local rounds : मुंबई : वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करून पश्चिम रेल्वे मार्गावरील १५ डबा गाड्यांच्या फेऱ्या वाढविण्याची तयारी सुरू आहे. सध्या पश्चिम रेल्वे मार्गावर १५ डबा गाड्यांच्या ७९ फेऱ्या होतात. यात आणखी २७ फेऱ्यांची भर लवकरच पडणार आहे. यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील १५ डबा गाड्यांच्या फेऱ्यांची संख्या १०६ होईल. । रेल्वे

पश्चिम रेल्वे मार्गावर प्रामुख्याने चर्चगेट ते विरार आणि चर्चगेट ते डहाणू या मार्गावर १५ डबा गाड्यांच्या फेऱ्या होतात. जास्त प्रवासी सामावून घेणाऱ्या या फेऱ्यांना प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. यामुळेच आता सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेत १५ डबा गाड्यांच्या फेऱ्या वाढविण्यासाठी तयारी सुरू आहे.

मध्य रेल्वे मार्गावर जागेच्या कमतरतेमुळे १५ डबा गाड्यांच्या फेऱ्या वाढविण्यात तांत्रिक अडचणी येत आहेत. या अडचणी दूर होईपर्यंत मध्य रेल्वे मार्गावरील १५ डबा गाड्यांच्या फेऱ्या वाढविणार नसल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सध्या पश्चिम रेल्वे मार्गावर १३७५ फेऱ्या होतात. यात १२९६ फेऱ्या या १२ डब्यांच्या गाड्यांच्या आहेत. बाकीच्या ७९ फेऱ्या या १५ डब्यांच्या गाड्यांच्या आहेत. गर्दीच्या वेळेत दर तीन मिनिटाला एक या गतीने पश्चिम रेल्वे मार्गावर गाड्या उपलब्ध असतात. पश्चिम रेल्वेच्या गाड्यांमधून दररोज ३५ लाख प्रवासी प्रवास करतात. प्रवासी संख्येत वाढ होऊ लागली आहे. यामुळे वाढत्या प्रवाशांना सामावून घेण्यासाठी पश्चिम रेल्वेने १५ डब्यांच्या गाड्यांच्या संख्येत वाढ करण्याची तयारी सुरू केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी