पश्चिम रेल्वेवर २० जूनपासून धावणार एसी लोकलच्या ४० फेऱ्या

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jun 18, 2022 | 18:26 IST

Western Railway to increase AC local services to 40 from June 20 : मुंबई उपनगरीय रेल्वेच्या पश्चिम रेल्वे मार्गावर सोमवार २० जून २०२२ पासून एसी लोकलच्या ४० फेऱ्या धावणार आहेत.

Western Railway to increase AC local services to 40 from June 20
पश्चिम रेल्वेवर २० जूनपासून धावणार एसी लोकलच्या ४० फेऱ्या  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
 • पश्चिम रेल्वेवर २० जूनपासून धावणार एसी लोकलच्या ४० फेऱ्या
 • सध्या पश्चिम रेल्वे मार्गावर एसी लोकलच्या ३२ फेऱ्या
 • सोमवार ते शुक्रवार पश्चिम रेल्वे मार्गावर एसी लोकलच्या ४० फेऱ्या, शनिवार आणि रविवार या दोन दिवशी एसी लोकलच्या ३२ फेऱ्या

Western Railway to increase AC local services to 40 from June 20 : मुंबई उपनगरीय रेल्वेच्या पश्चिम रेल्वे मार्गावर सोमवार २० जून २०२२ पासून एसी लोकलच्या ४० फेऱ्या धावणार आहेत. सध्या पश्चिम रेल्वे मार्गावर एसी लोकलच्या ३२ फेऱ्या धावतात. या फेऱ्यांमध्ये २० जूनपासून आणखी आठ फेऱ्यांची भर पडणार आहे.

रेल्वे प्रशासनाच्या निर्णयानुसार २० जून पासून सोमवार ते शुक्रवार पश्चिम रेल्वे मार्गावर एसी लोकलच्या ४० फेऱ्या धावतील तर शनिवार आणि रविवार या दोन दिवशी एसी लोकलच्या ३२ फेऱ्या धावतील. यामुळे प्रत्येक आठवड्यात पाच दिवस ४० प्रमाणे एसी लोकलच्या २०० फेऱ्या होतील तर इतर दोन दिवस ३२ प्रमाणे एसी लोकलच्या ६४ फेऱ्या होतील. यामुळे दर आठवड्याच्या एसी लोकलच्या फेऱ्यांची संख्या २६४ होणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर एसी लोकलच्या ५६ फेऱ्या धावतात. या व्यवस्थेत कोणताही बदल झालेला नाही.

एसी लोकलच्या तिकिटात ५० टक्क्यांची कपात झाल्यानंतर पश्चिम रेल्वे मार्गावरील एसी लोकलच्या प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. यामुळे पश्चिम रेल्वे एसी लोकल फेऱ्यांची संख्या वाढवत आहे. मुंबईतील इतर एसी वाहतुकीच्या पर्यायांच्या तुलनेत एसी लोकल ही पैसे आणि वेळ या दोन्हीची बचत करणारी सेवा आहे. यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील एसी लोकलच्या प्रवासी संख्येत वाढ होत आहे. 

पश्चिम रेल्वे मार्गावर २० जूनपासून धावणार असलेल्या आठ अतिरिक्त एसी लोकलची माहिती

चर्चगेटच्या दिशेने धावणाऱ्या फास्ट एसी लोकल

 1. विरार ते दादर सकाळी ६.५७ वाजता
 2. विरार ते चर्चगेट सकाळी ९.३४ वाजता
 3. मालाड ते चर्चगेट संध्याकाळी ६.४४ वाजता
 4. वसई ते चर्चगेट रात्री ८.४१ वाजता

विरारच्या दिशेने धावणाऱ्या फास्ट एसी लोकल

 1. दादर ते विरार सकाळी ८.१८ वाजता
 2. चर्चगेट ते मालाड सकाळी ११.०३ वाजता
 3. चर्चगेट ते वसई रोड संध्याकाळी ७.०५ वाजता
 4. चर्चगेट ते विरार रात्री ९.५७ वाजता

एसी लोकलच्या दरांमध्ये ५० टक्के कपात

 1. ५ किमी - आधी ६५ रुपये - आता ३० रुपये
 2. २५ किमी - आधी १३५ रुपये - आता ६० रुपये
 3. ५० किमी - आधी २०५ रुपये - आता १०० रुपये
 4. १०० किमी - आधी १९० रुपये - आता १४५ रुपये
 5. १३० किमी - आधी ३७० रुपये - आता १८५ रुपये

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी