मुंबईत पश्चिम रेल्वेचा सर्वात मोठा स्कायवॉक

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jul 07, 2022 | 15:43 IST

Western Railways longest skywalk connecting Bandra Terminus to Khar station in Mumbai : मुंबईत पश्चिम रेल्वेचा सर्वात मोठा स्कायवॉक आहे. हा स्कायवॉक खार रोड स्टेशन ते वांद्रे टर्मिनस एवढा मोठा आहे.

Western Railways longest skywalk connecting Bandra Terminus to Khar station in Mumbai
मुंबईत पश्चिम रेल्वेचा सर्वात मोठा स्कायवॉक 
थोडं पण कामाचं
  • मुंबईत पश्चिम रेल्वेचा सर्वात मोठा स्कायवॉक
  • स्कायवॉक खार रोड स्टेशन ते वांद्रे टर्मिनस एवढा मोठा
  • स्कायवॉकची लांबी ३१४ मीटर आणि रूंदी ४.४ मीटर एवढी

Western Railways longest skywalk connecting Bandra Terminus to Khar station in Mumbai : मुंबईत पश्चिम रेल्वेचा सर्वात मोठा स्कायवॉक आहे. हा स्कायवॉक खार रोड स्टेशन ते वांद्रे टर्मिनस एवढा मोठा आहे. या स्कायवॉकवरून दोन्ही स्टेशनांच्या प्लॅटफॉर्मवर जाणे येणे सोपे झाले आहे. पश्चिम रेल्वेच्या या स्कायवॉकची लांबी ३१४ मीटर आणि रूंदी ४.४ मीटर एवढी आहे. स्कायवॉकमुळे प्रवाशांची मोठी सोय झाली आहे. । रेल्वे

खार रोड स्टेशन ते वांद्रे टर्मिनस हा स्कायवॉक वांद्रे टर्मिनस स्टेशनच्या सर्व पादचारी पुलांशी (फूटओव्हर ब्रिज - एफओबी) जोडला आहे. यामुळे प्रवाशांना स्कायवॉकद्वारे वांद्रे टर्मिनसच्या सर्व प्लॅटफॉर्मवर जाणे-येणे सोपे झाले आहे. वांद्रे टर्मिनस येथून लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक होते. यामुळे या स्टेशनवर लांबच्या प्रवासाला निघालेल्यांची गर्दी असते. हे प्रवासी बऱ्याचदा भरपूर सामान सोबत घेऊन आले असतात. या परिस्थितीत त्यांना स्कायवॉकमुळे प्रवास करणे आणि वांद्रे टर्मिनस स्टेशनच्या कोणत्याही प्लॅटफॉर्मवर जाणे सोपे झाले आहे. या संपूर्ण स्कायवॉकसाठी १४ कोटी रुपयांचा खर्च झाला.

मुंबईत उपनगरांमध्ये सात स्कायवॉक बांधण्याची योजना आहे. ही योजना प्रत्यक्षात आल्यावर मुंबईकरांना वाहतुकीचा त्रास टाळून स्कायवॉकद्वारे चालत प्रवास करणे सोपे होईल.

अलिकडेच पश्चिम रेल्वे मार्गावर चर्नी रोड येथे ३६ मीटर लांबीचा आणि ६ मीटर रुंदीचा तसेच विलेपार्ले येथे ५५ मीटर लांबीचा आणि ६ मीटर रुंदीचा पादचारी पूल (फूटओव्हर ब्रिज - एफओबी) सुरू झाला आहे. या दोन पुलांमध्ये दोन्ही स्टेशनवर प्रवाशांची मोठी सोय झाली आहे. 

प्रवाशांच्या आवश्यकता ओळखून आधुनिकीकरण करण्याचे काम पश्चिम रेल्वे मार्गावर सातत्याने सुरू आहे. वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करून पश्चिम रेल्वे मार्गावरील १५ डबा गाड्यांच्या फेऱ्या वाढविण्याची तयारी सुरू आहे. सध्या पश्चिम रेल्वे मार्गावर १५ डबा गाड्यांच्या ७९ फेऱ्या होतात. यात आणखी २७ फेऱ्यांची भर लवकरच पडणार आहे. यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील १५ डबा गाड्यांच्या फेऱ्यांची संख्या १०६ होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी