नवी दिल्ली : महाराष्ट्रातील (Maharashtra) राजकारणात (Politics) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या गटाने मोठा स्फोट घडवला आहे. या विस्फोटात आमदारासह शिंदेंनी फक्त सेना आमदारचं नाही तर मुख्यमंत्र्यांचा आत्मविश्वासही पळवला आहे. शिंदेच्या गटातील आमदारांची संख्या 46 झाली आहे. दरम्यान एकनाथ शिंदे शिवसेनेचं (Shiv Sena) चिन्ह धनुष्यबाण आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं म्हटलं जात आहे. शिवसेनेत इतका मोठा बंड कधीच झाला नव्हता. अनेक तज्ञ आणि राजकीय जाणकारांनी या बंडाची कारणे सांगितली आहेत. सामान्य माणसांनाही समजव्यात अशा सोप्या भाषेत या बंडाची कारणे आम्ही सांगत आहोत..
बाळासाहेब ठाकरे यांची ओळख ही हिंदू हृदयसम्राटची आहे. पाकिस्तान संघाशी भारतीय संघाने क्रिकेट खेळू, नये यासाठी बाळासाहेब ठाकरेंच्या समर्थकांनी मैदानावरील खेळपट्टी खोदून काढली होती. असा दरारा बाळासाहेब ठाकरेंचा होता, परंतु त्याचे उत्तराधिकारी म्हणून उद्धव ठाकरे हे अपयशी ठरताना दिसत आहेत. ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे वीर सावरकर यांना इंग्रजांचा माफीचा साक्षीदार होते असं म्हणतात.
वीर सावरकरांचा अपमान हिंदुत्ववादी शिवसैनिक नेते ही गोष्टी पचवू शकत नाहीत. शिवाय शिवसेना तयार झाल्यापासून काँग्रेस, राष्ट्रवादीवर शिवसेनेने टीकेची झोड उठवली होती. त्यांच्याशी उद्धव ठाकरेंनी सत्ता स्थापली आहे. तर सत्तेत असताना शिवसेनेच्या आमदारांना पुरेसा निधी आणि त्यांची कामे होत नसल्यानं नेत्यांमध्ये नाराजी होती. वेळोवेळी याची तक्रार केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यावर काहीच निर्णय घेतला नव्हता.
मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचा आपल्या पक्षातील नेत्यांशी आणि घटक पक्षातील नेत्यांशी संपर्क हवा तितका नव्हता. मुख्यमंत्र्यांऐवजी शिवसेना नेता मिलिंदद नार्वेकर आणि अनिल परबसह मुख्य सचिव यांची किचन कॅबिनेट नेत्याशी चर्चा करत भेटी करत. हीच किचन कॅबिनेट या बंडाचं मोठं कारण मानलं जात आहे. शिवसेनेचे आमदार शिरसाठ यांनी आपल्या पत्रातून म्हटलं आहे की, मुख्यमंत्री झाल्यापासून सेना नेत्यासाठी वर्षा बंगल्याची दारे बंद होती. म्हणजेच काय नेत्यांना भेटीची वेळ दिली जात नव्हती. राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंनी किचन कॅबिनेटवर विश्वास ठेवला होता.
उद्धव ठाकरेंनी राजकीय संकेतांकडे दुर्लक्ष केलं किंवा त्यांना महत्त्व दिलं नाही. राज्यसभेची निवडणूक झाली तेव्हा भाजपकडे तिसऱ्या उमेदवारासाठी पुरेसे मत नसतानाही उमेदवार जिंकून आला होता. त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय खेळीचे कौतुक केले. यासह त्यांनी उद्धव ठाकरेंना मिळणाऱ्या संकेतांची जाण करुन दिली होती. परंतु उद्धव ठाकरेंनी त्याकडे दुर्लक्ष केलं.
मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे हे किती परिपक्कव होते, याचा अंदाज आपल्याला एका गोष्टीवर येतो. राज्यातील गृप्तचर यंत्रणा राज्यातील संशयीत हालचाली आणि काही व्हिआयपी लोकांच्या हालचालींवर लक्ष ठेवून असते. ती यंत्रणा दरदिवशी मुख्यमंत्र्यांना त्याची माहिती देत असतात. पक्षातील आणि घटक पक्षातील तसेच विरोधी पक्षातील नेत्यांची हालचाली आणि त्याच्या कामांवर लक्ष ठेवून असते. या यंत्रणेकडून एकनाथ शिंदेचा सुरतकडे जात असल्याची माहिती होती. ही माहिती मुख्यमंत्र्यांना मिळाली नसेल का?
अनुभव नसताना मुख्यमंत्री होणारे उद्धव ठाकरे हे एकटे व्यक्ती किंवा उमेदवार नाहीत. आसामचे मुख्यमंत्री प्रफुल्ल कुमार महंत ते ओरिसाचे नवीन पटनायक हे नेतेही पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले आहेत. त्यांनाही या पदाचा अनुभव नव्हता. परंतु त्यांनी आपल्या कामातून आणि आपल्या चुकांमधून धडा घेत आपला कारभार चालवत आहेत. परंतु उद्धव ठाकरेंना चुकांमधून शिकण्याची इच्छा नसल्याचं दिसत आहे.
राज्यातील अर्थसंकल्पामध्ये देण्यात आलेल्या निधींविषयी अनेक शिवसेना आमदार नाराज होते. सेना आमदारांनी आरोप केला होता की, राष्ट्रवादी नेत्यांना अधिक निधी देण्यात आला परंतु शिवसेनेच्या नेत्यांना तुलनेने कमी निधी मिळाला आहे. याबाबत नाराजी असताना सेना नेत्यांनी याची कल्पना मुख्यमंत्र्यांना दिली होती. परंतु त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोणताच उपाय काढला नाही.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मुलगा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना अगदी योग्य पद्धतीने पुढे-पुढे केले जात होते. सर्व धोरणांमध्ये त्यांना प्राधान्य आणि त्याची उपस्थिती करुन घेण्यात येत होती. हीच गोष्ट सामान्य कार्यकर्ता आणि पक्षासाठी काम करत एका उच्च ठिकाणी पोहचलेल्या एकनाथ शिंदेंसारख्या नेत्यांना घराणेशाहीची घरघर लागली होती. आता परिवारातील लोकं आपल्यावरती राज्य करतील अशी शंका नेत्यांना होती.
अनेक नेत्यांना असं वाटत होतं की, त्याची जागा ही राष्ट्रवादी किंवा काँग्रेसच्या नेत्यांना दिली जाईल. याच उदाहरण म्हणजे छगन भुजबळ यांना नाशिकच्या पालकमंत्री पदावर हटविण्यासाठी सुहास कांदे यांनी मुंबई उच्च न्यायालायात दाखल केलेली याचिका सर्व काही सिद्ध करते. कांदेंना वाटत होतं की, त्याची सीट ही एनसीपीला म्हणजेच राष्ट्रवादीला दिली जाईल.
महाविकास आघाडीच्या सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात फ्त सेनेच्या आमदारात नाहीतर अपक्ष नेत्यांमध्ये नाराजी होती. जेथे राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी अपक्षांना सोबत घेण्यासाठी आपला उमेदवार निवडणून आणण्यासाठी शरद पवारांनी स्वत अपक्ष नेत्यांना अपक्ष आमदारांना फोन केले होते. पंरतु उद्धव ठाकरे आपल्या घरी बसून होते आणि किचन कॅबिनेटवर सर्व विषय सोडून मोकळे झाले होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मित्रपक्ष आणि आपल्या नेत्याशी हे राजकीय चर्चा करण्याऐवजी फोटोग्राफी आणि वाइल्ड लाइफवर गप्पा करण्यात धन्य होत असतात.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.