आघाडी करुन बनलेल्या सरकारला बिघाडीची कीड, सेनेची घुसमट तर काँग्रेसची अस्तित्वासाठी धडपड, काय असू शकतं भवितव्य

मुंबई
भरत जाधव
Updated Mar 31, 2022 | 20:33 IST

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या नेत्यांनी आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अंतर्गत वादाला सुरुवात केली आहे. यामुळे सरकारचा पुढील मार्ग खाच खड्डे असलेला असेल यात शंका नाही. निधी वाटपात उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून भेदभाव केला जात असल्याचा आरोप सेना आमदारांनी केला आहे.

What could be the next option for the Shiv sena  and the Congress
आघाडी करुन बनलेल्या सरकारला बिघाडीची कीड  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • निधी वाटपात उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून भेदभाव
  • महाविकास आघाडीत बिघाडीची चिन्हे
  • राष्ट्रवादी भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेत नसल्यानं मुख्यमंत्री नाराज

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या नेत्यांनी आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अंतर्गत वादाला सुरुवात केली आहे. यामुळे सरकारचा पुढील मार्ग खाच खड्डे असलेला असेल यात शंका नाही. निधी वाटपात उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून भेदभाव केला जात असल्याचा आरोप सेना आमदारांनी केला आहे. राष्ट्रवादीच्या या कारभारावर फक्त सेनाचं नाही तर आपल्या अस्तित्वासाठी धडपडणारी काँग्रेसही नाराज आहे. सरकारमध्ये राहून आपल्याला काम करता येत नसल्याची नाराजी काँग्रेसच्या नेत्यांनीही बोलून दाखवली आहे. याचमुळे त्यांनी थेट दिल्लीतील काँग्रेस हायकमांडकडे भेटीची वेळ मागितीली आहे.  

आघाडीत बिघाडीची किडी

तिन्ही पक्ष कसं हसत खेळत सरकारमध्ये काम करत आहेत, असा भास दाखवण्याचा प्रयत्न वरच्या वर केला जात आहे. परंतु आतमध्ये मात्र तितकाच दुरावा वाढू लागला आहे. आघाडीचं ठाकरे सरकार कसं कठीण आहे, असं वरुन शिवसेना खासदार संजय राऊत दाखवत असले तरी आघाडीत वादाची आणि भ्रष्टचाराची कीड लागली आहे.  

नेते फोडण्यांची कीड

महानगरपालिकांच्या निवडणुकांवेळी कार्यकर्त्यांची फोडाफोडी होणार यात शंका नाही. कारण कोणताच पक्ष आपल्या हक्क्याच्या जागा सोडणार नाहीत. त्याला मात देण्यासाठी मित्र पक्षाच्या उमेदवाराला पाडण्याचं काम शत्रूला हाताशी घेऊन केलं जाईल. आधीच कामांमुळे नाराज झालेले नेते मंडळी यातून आपला बदला घेतील. आघाडी करुन सत्तेत बसलेले असतानाही तिन्ही पक्ष आप-आपली ताकद वाढवत आहेत. विशेष म्हणजे भाजपपेक्षा आपआपसातील कार्यकर्त्यांचीच फोडाफोड केली जात आहे.

party

पंचायत समितीच्या निवडणुकीच्या वेळेही जळगावमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीमधील वाद दिसून आला होता. मंत्री गुलाबराव पाटील आणि एकनाथ खडसे यांच्यात आरोप-प्रत्यारोप नेहमी होत होत होते. इतकेच काय कार्यकर्त्यांची फोडाफाडी देखील झाली होती. बीडमध्येही राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या अनेक समर्थकांनी शिवबंधन हाती बांधलं. सोलापूरमध्ये बोलताना तान्हाजी सावंत यांनी आघाडी धर्माची आठवण करून दिली. परंतु जळगाव आणि बीडमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांना सेनेत प्रवेश देण्यात आल्याचं सावंत विसरले. बुलडाण्यात सेनेचा उमेदवार पाडण्यात आला.  खेड तालुक्यातील सेनेच्या सभापतीला राष्ट्रवादीत घेण्यात आल. अहमदनगरमध्येही नगरसेवकाला राष्ट्रवादीत घेण्यात आलं आहे.

निधीमुळे वाढली नाराजीची कीड

निधीच मिळत नसल्यानं विकासकामे करता येत नसल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्यांनी केला आहे. कामे करण्यासाठी निधी हवा असतो आणि तो मिळवण्यासाठी चढाओढ चालू आहे. अर्थमंत्री राष्ट्रवादी पक्षाचा असल्यानं राष्ट्रवादी आमदारांच्या कागदावर लववकर स्वाक्षरी होते, इतर मात्र वाट पाहत असतात असं विधान शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांनी एका कार्यक्रमादरम्यान केले होते. त्याआधी माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते यांनी  सत्तेत होत असलेल्या घुसमटीविषयी भाष्य केलं होतं. आता तान्हाजी सावंत यांनी जाहीरपणे सांगितलं की, शिवसेनेच्या नेत्यांना सरकारमध्ये दुय्यम वागणूक मिळतेय. नेत्यांमध्ये होणारी धूसपूस आघाडीत बिघाडी करणार का असा प्रश्न अनेकांच्या मनात येत आहे. निधी वाटपाविषयी काँग्रेसही नाराज आहे.

uddhav

सरकार तीन पक्षांचे असले तरी सत्तेचा सर्वाधिक फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला होत आहे. निधीवाटपापासून ते सत्ता राबवण्यापर्यंत राष्ट्रवादीची दादागिरी चालते आहे. निधी वाटपावेळी सर्वाधिक ५५ ते ६० टक्के निधी राष्ट्रवादीच्या अखत्यारीतील खात्यांना दिला जातो, शिवाय काँग्रेसी आमदारांच्या मतदारसंघातील कामांना निधी मिळत नाही, अशी तक्रार काँग्रेसच्या आमदारांनी केली आहे. काहीतरी यावर मोठी घडामोड होईल असं भाजपला वाटत आहे. हाच धागा पकडत निधी वाटपामधील विषमतेवरुन भाजपनेही राष्ट्रवादीवर टीका केली होती.

काँग्रेसच्या नेत्यांमध्येही राष्ट्रवादीविषयी नाराजी

काँग्रेस आमदारांच्या मतदारसंघात कामेच होत नसल्यानं काँग्रेस नाराज आहे.  यासाठी काँग्रेस २७ आमदारांनी काँग्रेस पक्ष अध्यक्षा सोनिया गांधींना पत्र लिहून पाठवले आहे. राष्ट्रवादीकडून निधीबाबत भेदभाव केला जातो. विधानसभा अध्यक्ष, महामंडळे, जिल्हा नियोजन समितीच्या नियुक्त्या रखडल्या आहेत, अशा तक्रारी आमदारांनी केल्या आहेत. शिवाय काँग्रेसच्या मंत्र्यांवरही आमदारांनी निशाणा साधला आहे. काँग्रेसचे एकूण ४४ आमदार असून त्यापैकी २७ आमदारांनीच तक्रारी केल्या आहेत. मंत्रिमंडळात काँग्रेसचे एकूण १० मंत्री अाहेत. या मंत्र्यांशी जवळीक असलेल्या १७ आमदारांची कामे होतात. ही व्यथाही सोनियांच्या कानावर घालणार असल्याचे एका आमदाराने सांगितले.

घुसमट असूनही शांतता

भाजप अशाच काही घटनांची वाट पाहत आहे. आघाडीत कधी बंड होतो आणि कधी त्यात आपण उडी मारून सत्ता स्थापनेची पोळी भाजतो. पण सेनेची ही घुसमट फक्त नेत्यांपुरती मर्यादीत आहे असे नाही, मुख्यमंत्र्यांसुद्धा या घुसमटीचा त्रास होऊ लागला आहे. सरकार बनल्यानंतर काही दिवसातच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कार्यप्रणालीविषयी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे तक्रार केली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्याही काही तक्रारी तेथे मांडल्या होत्या, परंतु सत्ता आणि मानाचं पद हवं असल्यानं तक्रारी सोडून मुख्यमंत्र्यांना राष्ट्रवादीने त्यांच्याविषयी केलेल्या तक्रारीवर लक्ष दयावं लागलं. त्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या कार्यप्रणालीत बदल करत न काही जास्त बोलता गुपचूप बसाव लागलं.

सेनेला सत्तेत बसण्याची सवय नाही पण सत्ताही सुटत नाही

सोलापूर आणि रत्नागिरीमध्ये आमदार आणि खासदाराने पक्षातील नेत्यांची होणारी घुसमट सांगितली. यावेळी सावंतांनी शेवटाचा पर्याय सांगत वेगळी वाट निर्माण करण्याचे संकेत दिले. मुळात सत्तेसाठी जेथे मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळातील राष्ट्रवादीच्या नेत्यांपुढे शांत बसावं लागलं तर सेना खरं वेगळी वाट करू शकेल यात शंका आहे. जर आपण सावंताच्या भाषणाचा आणि नाराजी लक्षात घेतली. त्यानुसार गणिते मांडली तर कोणासोबत न जाता स्वाभिमानाने स्वबळावर निवडणुका लढवणं सेनेने केलं पाहिजे. शिवेसेनेची होणारी घुसमट होणार असा अंदाज सरकार स्थापनेपासून दबक्या आवाजात वर्तवला जात होता. तर अशीच घुसमट भाजपसोबत युती असताना होत होती. तेव्हा मात्र एक दोन मंत्री सोडता कोणीच राजीनामा दिला नाही. शिवाय सत्तेतून बाहेर पडण्यासही त्यांनी पूर्ण वेळ घेतला.

राष्ट्रवा५दी सशक्त मुख्यमंत्री अशक्त

सर्वाधिक आमदार निवडून आणलेल्या शिवसेनेला राष्ट्रवादीने मुख्यमंत्री पद जरी दिले असले, तरी अंतिम निर्णयाची ताकद राष्ट्रवादीच्या शरद पवारांकडे असल्याचं दिसतं आहे. सेनेच्या नेत्यावर काही संकट ओढवलं तर शिवसेनेलाचं त्याला तोंड द्यावे लागते. संजय राठोड, प्रताप सरनाईक, अनिल परब, भावना गवळी, या नेत्यांवर ईडीची कारवाई झाली परंतु याच्या विरोधात सेनेलाच लढा द्यावा लागला किंवा नेत्यांना कारवाईला सामोरे जावे लागले. राज्यातील विरोधी पक्ष भाजपने आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी अन् काँग्रेसला वगळून एकट्या शिवसेनेला टार्गेट केले आहे.

Read Also : पेट्रोल, डिझेल दरवाढीचा विषय काढला, तर रामदेव बाबा म्हणतात..

शिवसेना व मुख्यमंत्री आपल्या परीने त्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु राष्ट्रवादीचं मौन  सेनेला खटकू लागले आहे. यामुळेच काय आता शिवसेनाही भाजपविषयी जरा सावध भूमिका घेतना दिसू लागली आहे. ईडीच्या कारवायाविरोधातील लढ्यातही सेनेला दोन्ही पक्षाकडून फंलदाजी करावी लागत आहे. ईडीच्या रडारवरती शिवसेनेचे नेते अधिक आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांवरही कारवाई झाली पण सेनेच्या तुलनेने कमीच. त्यावर राष्ट्रवादीची भूमिका सौम्य आहे. सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादीनेही तिच भूमिका घ्यावी असं मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे.

Read Also : न्यायालयाने आठ IAS अधिकाऱ्यांना सुनावली २ आठवड्यांची शिक्षा

राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या गृह विभागाकडून भाजप नेत्यांवरील कारवाया संथपणे हाताळण्याप्रकरणी मुख्यमंत्री ठाकरेंची नाराजी आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर, परमबीरसिंग प्रकरण, रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरण यामध्ये वेळकाढूपणा करीत आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांसह भाजप नेत्यांविषयी दिलेल्या तक्रार अर्जावर गृह विभागाने पुढे काहीच केलेले नाही, यावर मुख्यमंत्री नाराज झाले आहेत. नाराजी कळवल्यानंतर यावर राष्ट्रवादीने सावध भूमिका घेत पुढे योग्य कारवाई केली जाईल असं म्हटलं आहे.

निर्णयामुळेही सेनेचं होतय नुकसान

इकतेच काय आहे कुठला धडाडीचा निर्णय असेल तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार समोर येत तो जाहीर करत असतात. परंतु कधी निर्णय फसला किंवा अंगाशी आला तेव्हा मुख्यमंत्र्यांना पुढं केलं जातं आणि अख्या महाराष्ट्रापुढे शिवसेनेची वाईट पब्लिसिटी होऊन बसते. सत्ता आणि पद टिकवण्यासाठी संजय राऊतांना उगाच का असेना शरद पवारांना आपलं आराध्य मानत शांत बसावं लागतं.

युती आणि सत्ता गेल्यामुळे जखमी झालेला भाजप शिवसेनेला मोकलळ बसण्याची संधी देत नाहीये. किरीट सोमय्या, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, नारायण राणे, नितीश राणे या नेते मंडळींकडून सेनेवर जोरदार हल्लाबोल केला जातो. त्यांच्यावर काही कारवाई करायची म्हणजे गृहखातं राष्ट्रवादीकडे आहे. परतुं राष्ट्रवादीकडून योग्य प्रकारे पावले उचलली जात नसल्यानं जनतेमध्ये शिवसेनेची अपराधीची बाजू दिसून येत आहे.

Read Also : काकाच भाजपमध्ये जाऊन पुतण्याला देणार धक्का?

दरम्यान सरकारमध्ये कामांचा धडका राष्ट्रवादीच्या नेत्यांचा दिसून येतो. त्याचाच प्रत्यय पंजायतीच्या निवडणुकांच्या निकालामध्ये दिसून आला होता. जेथे टीका होणार त्या ठिकाणी सावध होत आपली बाजू सुरक्षित करताना दिसत असतो. त्यात भाजपची राष्ट्रवादीविषयी थोडीशी मवाळ भूमिका आणि राष्ट्रवादीचं भाजपला दिलेली मोकळीक यामुळे सेनेला चिंता सतावत आहे. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे भाजप नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध शिवसेनेला अगदी नकोसे झालेले आहेत, तर प्रत्येक वेळी प्रशासनाची बाजू घेण्याचा मुख्यमंत्री ठाकरे यांचा स्वभाव राष्ट्रवादीसाठी मोठा अडचणीचा ठरतो आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत मोठे शीतयुद्ध सुरू आहे.अंतर्गत विरोधामुळेच आघाडी सरकार कोसळेल, असे भाजप नेते वारंवार म्हणत आले आहेत. मंत्र्यांविरोधातील केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा, काँग्रेसची नाराजी, शिवसेना-राष्ट्रवादी यांच्यातील शीतयुद्ध भाजपच्या पथ्यावर पडणार आहे.

सत्ता गणित आहे का?

सत्ता गणित असण्याची शक्यता आहेच. सध्या होत असल्याचा निधी वाटपाचा वाद आणि सरकारमध्ये वाढणारी राष्ट्रवादीची पातळी यामुळे पर्यायी व्यवस्था साबूत ठेवण्याचं काम राष्ट्रवादीकडून होत आहे. शिवेसनेच्या नेत्यांमध्ये राष्ट्रवादीविषयी नाराजी वाढू लागली आहे. पुढील निवडणुकीत धोका उत्पन्न होण्याची शक्यता असल्यानं राष्ट्रवादी सावध झाली आहे.  

aditya

सेनेकडूनही सावध पवित्रा

नारायण राणेविषयी आता शिवसेनेचा आक्रमकपणा कमी झाला आहे. जर भाजपकडून शिवेसेनेवर आरोप कमी झाले तर शिवसेना युतीविषयी करु शकते असं संकेत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले आहेत. तर भाजप तिन्ही पर्यायासाठी तयार आहे, जरी दोन्ही पक्षातून कोणी सोबत आले तरी सरकार करणार आणि नाही आले तरी भाजप एकट्याने निवडणुकीला सामोरे जाणार असून त्याची तयारी देखील सुरू झाली आहे.

यात मात्र काँग्रेस कुठेच दिसत नाहीये. राज्यातील काँग्रेस नेत्यांनी आपला आक्रमकपणा काढून टाकला आहे. एकटेच नाना पटोले आपल्यापरीने दंड थोपटताना दिसत आहेत. आधीच कमजोर झालेली काँग्रेस पाच राज्यातील विधानसभा, पंचायती समित्यांच्या निवडणुकातील पराभवामुळे अजून कमजोर झाली आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी