उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार?, दुपारी 2 वाजता 'मातोश्री'वर पत्रकार परिषद

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी पत्रकार परिषद बोलावली आहे. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे हे एखादा मोठा निर्णय जाहीर करण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे.

what exactly will uddhav thackeray say press conference on matoshri at 2 pm
उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार?, दुपारी 2 वाजता 'मातोश्री'वर पत्रकार परिषद  |  फोटो सौजन्य: Facebook
थोडं पण कामाचं
  • उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर पत्रकार परिषद
  • उद्धव ठाकरे बंडखोर आमदारांविरोधात काय भूमिका घेणार?
  • उद्धव ठाकरे आणि बंडखोर आमदारांमध्ये समेट घडणार की दरी वाढणार?

मुंबई: शिवसेना (Shiv Sena) पक्ष प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आज (८ जुलै) आपल्या 'मातोश्री' (Matoshri) या निवासस्थानी पत्रकार परिषद घेणार आहे. यावेळी उद्धव ठाकरे बंडखोर आमदारांचं म्हणणं मानणार की आपला संघर्ष यापुढेही चालूच ठेवणार याकडे आता अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे. त्यामुळे आता या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतील ४० आमदारांना फोडून उद्धव ठाकरेंसमोर मोठाच पेच प्रसंग निर्माण केला आहे. शिंदेच्या या बंडामुळे उद्धव ठाकरे आपल्या पक्षाचं अधिकृत नाव आणि निशाणी देखील गमावू शकतात अशी जोरदार चर्चा आहे. असं झाल्यास उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का असू शकतो. या सगळ्या गोष्टींचा विचार करुन उद्धव ठाकरे हे आता नवी रणनिती आखून घडल्या प्रसंगाला सामोरं जात आहे. 

अधिक वाचा: शिंदेंच्या हाताला धरलं अन् मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसवलं!

एकीकडे मुख्यमंत्री पद मिळाल्याने एकनाथ शिंदे यांची राजकीय ताकद वाढत आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना आपला पक्ष टिकविण्यासाठी टोकाची धडपड करावी लागत आहे. सुरुवातीला आमदार फुटल्यानंतर आता राज्यातील वेगवेगळ्या महानगरपालिकांमधील नगरसेवक आणि इतर पदाधिकारी देखील शिंदे गटाकडे झपाट्याने वळले आहेत. अशावेळी आता उद्धव ठाकरे आजच्या पत्रकार परिषदेत काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे. 

राजीनाम्या दिल्यापासून उद्धव ठाकरे हे पक्ष संघटना सावरण्यासाठी स्वत: मैदानात उतरले आहेत. मात्र, असं असलं तरीही पक्षाला पडलेलं भगदाड काही ते बुजवू शकलेले नाही. किंबहुना हे भगदाड अधिकाधिक मोठंच होत चाललं आहे. एकीकडे भाजपसारखा बलाढ्या विरोधक आणि दुसरीकडे आपल्याच पक्षातील बंडखोर अशा दोन पातळ्यांवर उद्धव ठाकरेंना लढावं लागणार आहे. 

अधिक वाचा: सोमय्या CMच्या भेटीला;यामिनी जाधव,सरनाईकांवरील ED पीडा टळली

यातच आता लवकरच राज्यातील अनेक महापालिकांमध्ये निवडणुका लागणार आहेत. जर या निवडणुका अवघ्या काही महिन्यातच पार पडल्या तर उद्धव ठाकरे यांच्या हातात फारच कमी काळ असेल. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करुन त्यांनी पक्ष संघटनेचं काम हाती घेतलं आहे. 

उद्धव ठाकरे हे शिवसेनेत सक्रिय झाल्यापासून अनेक बंड झाले आहेत. नारायण राणे, राज ठाकरे यांच्यासारख्या दिग्गजांनी सेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतरही उद्धव ठाकरेंसमोर कठीण आव्हान निर्माण झालं होतं. त्या कठीण काळातही उद्धव ठाकरेंनी पक्ष सांभाळून ठेवला होता. मात्र, त्यावेळेस शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे हयात होते. मात्र, आता परिस्थिती फारच वेगळी आहे. कारण एकनाथ शिंदे यांनी जवळजवळ सगळा पक्षच फोडला आहे. एवढंच नव्हे तर त्याच एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदावर बसवून भाजपने त्यांना उद्धव ठाकरेंसमोर मोठ्या ताकदीने विरोधात उभं केलं आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे आगामी काळात काय निर्णय घेतात याची चुणूक आपल्याला आजच्या पत्रकार परिषदेतून येऊ शकते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी