Bully Bai App : बुल्ली बाई ऍपमुळे सोशल मीडियावर वाद, दिल्ली मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू

Bully Bai App सध्या सोशल मीडियावर बुल्ली बाई या ऍपमुळे वाद निर्माण झाला आहे. या ऍपवरून मुस्लिम महिलांचे तथाकथित लिलाव करण्यात येत असून त्यांचे फोटो अनधिकृतपणे वापरण्यात येत आहेत.

थोडं पण कामाचं
 • सध्या सोशल मीडियावर बुल्ली बाई या ऍपमुळे वाद निर्माण झाला आहे.
 • या ऍपवरून मुस्लिम महिलांचे तथाकथित लिलाव करण्यात येत आहेत
 • या ऍपवर बंदी आणण्याची मागणी केली जात आहे.

Bully Bai App : मुंबई : सध्या सोशल मीडियावर बुल्ली बाई या ऍपमुळे वाद निर्माण झाला आहे. या ऍपवरून मुस्लिम महिलांचे तथाकथित लिलाव करण्यात येत असून त्यांचे फोटो अनधिकृतपणे वापरण्यात येत आहेत. बुल्ली बाई या ऍपवर अनेक मुस्लिम महिलांचे फोटो व्हायरल करण्यात आले या ऍपवर बंदी आणण्याची मागणी केली जात आहे. ( what is Bulli Bai Photographs of Muslim women uploaded on Bulli Bai all you need to know about )

जाणून घेऊया  काय आहे बुल्ली ऍप आणि वाद 

 • १ जानेवारीपासून हे ऍप सुरू झाले आहे. या ऍपमध्ये मुस्लिम महिलेचा चेहरा ‘बुल्ली बाई’च्या रुपात दाखवण्यात आले आहे.  
 • ज्या महिलेचा चेहरा या ऍपमध्ये दाखवल जातो, तो फोतो बुल्ली बाई ऑफ द डे च्या रुपात प्रदर्शित केला जातो.  
 • त्यानंतर या महिलेच्या विरोधात अतिशय अश्लील आणि वादग्रस्त टिप्पणी केली जाते. इतकेच नाही तर त्यांची बोली लावून ट्रेंडे केले जाते.
 • या ऍपच्या माध्यमातून सामजिक कार्यकर्त्या, पत्रकार आणि अनेक क्षेत्रातील महिलांना लक्ष्य केले जाते आणि त्यांचे फोटो या ऍपवर सातत्याने अपलोड केले जातात. 
 • दिल्लीत एका महिला पत्रकाराचा फोटो या ऍपवर अपलोड करण्यात आला होता, इतकेच नाही तर तिच्या फोटोशी छेडछाडही करण्यात आली होती. तेव्हा या महिलेने पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली होती. 
 • शिवसेनेच्या खासदार प्रियंकाअ चतुर्वेदी यांनी मुंबई पोलीस आणि माहिती, तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे याबाबत कारवाई करण्याची मागणी केली आहे. 
 • या प्रकरणी दिल्ली आणि मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चौकशी सुरू केली आहे. तसेच इंडियन कॉम्प्युटर एमरजेन्सी रीस्पॉन्स टीम ही केंद्रीय यंत्रणा पोलिसांसोबत कारवाई करत आहे. 
 • राष्ट्रीय महिला आयोगानेही पीडित महिला पत्रकाराच्या तक्रारीची दखल घेतली आहे. या प्रकरणी आयोगनए दिल्ली पोलिसांना तत्काळ कारवाई करण्याची सूचना दिली आहे. अनेक राजकीय नेते, महिला आणि नेटकर्‍यांनी याबाबत उजव्या विचारसरणीच्या लोकांवर आरोप केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महिलांविरोधातील अत्याचार आणि धार्मिक द्वेषाविरोधात आवाज बुलंद करण्याचे आवाहन केले आहे. तर जम्मू कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी जे लोक अशा प्रकारे महिलांविरोधात गुन्हे करत आहेत त्यांना सत्ताधार्‍यांचे आशिर्वाद आहे असा आरोप त्यांनी केला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी