What is holashtak? What is date and time of holashtak? Why avoid auspicious work during holashtak? Read in Marathi : होळीचे आठ दिवस म्हणजे होलाष्टक (Holashtak) किंवा होळाष्टक. होलिका दहनाच्या आठ दिवस आधीपासून होलाष्टक सुरू होते. फाल्गुन शुद्ध अष्टमीपासून सुरू झालेले होलाष्टक होलिकादहनापर्यंत म्हणजे होळी प्रज्वलित होईपर्यंत सुरू असते. धर्मसंस्कारात वर्णिलेले 16 संस्कार होलाष्टकाच्या काळात करत नाहीत. होलाष्टकाच्या काळात शुभारंभ करणे किंवा १६ संस्कार करणे अशुभ समजले जाते.
होलाष्टक सुरू झाल्यापासून रस्त्यांवर ठिकठिकाणी परंपरा स्वरूप होलिका दहन केले जाते. तिथे गंगाजल (स्थानिक भागातील नदीचे पाणी) शिंपडून प्रतीक म्हणून दोन लाकडाच्या काठ्या स्थापित केल्या जातात. एक काठी होलिका आणि दुसरी काठी भक्त प्रल्हाद स्वरुप मानली जाते. यानंतर येथे लाकूड आणि कंडे लावले जातात. याचे होळीच्या दिवशी दहन केले जाते, यालाच होलिका दहन म्हणतात. पण अलिकडच्या धावपळीच्या जमान्यात ही परंपरा मागे पडली आहे. अनेक ठिकाणी होलाष्टक काळात शुभकार्य करत नाहीत आणि होलिका दहन हे थेट होळीच्या दिवशीच करतात. आधीच्या छोट्या स्वरुपातील होलिका दहनाची परंपरा मागे पडली आहे.
महाराष्ट्रात वापरल्या जाणाऱ्या पंचांगानुसार,
ज्योतिष शास्त्राप्रमाणे, होलाष्टकाच्या पहिल्या दिवशी अर्थात फाल्गुन शुद्ध अष्टमीला चंद्र, नवमीला सूर्य, दशमीला शनी, एकादशीला शुक्र, द्वादशीला गुरु, त्रयोदशीला बुध, चतुर्दशीला मंगळ आणि पौर्णिमेला राहु हे ग्रह उग्र स्वरुपात असतात. याचा मानवी मनावर प्रतिकूल परिणाम होतो. मानवी विकार बळावतात. माणूस चिडचिडा होतो. मन अशांत राहते. अडचणी, समस्या निर्माण होतात. याचा परिणाम हातात घेतलेल्या कार्यांवर होतो आणि त्यात यश मिळण्याऐवजी अपयश येते. घरात नकारात्मकता, अशांती, दुःख आणि क्लेशदायक वातावरण तयार होते. याच कारणामुळे होळीपूर्वीचे आठ दिवस अशुभ मानले जातात.
गर्भाधान, विवाह, गर्भाधारणाच्या तिसर्या महिन्यात करण्यात येणारे संस्कार, नामकरण, चूडाकरण, विद्यारंभ, गृह प्रवेश, गृह निर्माण, गृह शांती, हवन-यज्ञ कर्म आदी धर्मसंस्कार होलाष्टकाच्या कालावधीत करू नयेत.
Holi : गोडधोड खाऊन पोट बिघडले तर करा हे उपाय । या लोकांना पपई खाल्ल्याने होईल नुकसान
कच्ची पपई खा आणि अनेक आजारांपासून लांब राहा । जास्त चिकन खाल तर तब्येत बिघडवाल
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.