Eknath Shinde Not Reachable : शिवसेनेत उभी फूट, पुढे काय होणार? फडणवीस, राज्यपालांच्या भूमिकेकडे लक्ष

मुंबई
अमोल जोशी
Updated Jun 21, 2022 | 11:50 IST

महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकार तरणार की पडणार याचा निर्णय पुढील काही दिवसांत होण्याची शक्यता आहे. पाहुया, पुढे नेमकं काय घडू शकतं.

Eknath Shinde Not Reachable
शिवसेनेते उभी फूट, पुढे काय होणार? 
थोडं पण कामाचं
  • महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता
  • काय असेल पुढची प्रक्रिया?
  • राज्यपालांची भूमिका ठरू शकते निर्णायक

Eknath Shinde Not reachable : शिवसेनेत उभी फूट पडल्याचं स्पष्ट झालं असून शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे 13 आमदारांसह सूरतमध्ये असल्याचं स्पष्ट झालं आहे. काहीजण आमदारांची संख्या याहूनही अधिक असल्याचा दावा करत आहेत, तर शिवसेनेनं त्यातील काही आमदार हे मातोश्रीवरच असल्याचा दावा केला आहे. मात्र एकनाथ शिंदेंनी बंड केल्याचं आता स्पष्ट झालं असून राज्यातील महाविकास आघाडी सरकारसमोर मोठं संकट उभं ठाकलं आहे. जर या सर्व आमदारांनी आपला गट स्थापन केला आणि महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, तर राज्यात पुढे काय होऊ शकतं, याची चर्चा सुरू आहे.

सरकार अल्पमतात आल्याचा दावा

राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याचं पत्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना देऊ शकतात. त्यानंतर सरकारने बहुमत सिद्ध करून दाखवावं, अशी सूचना राज्यपालांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली जाऊ शकते. बहुमातासाठी आवश्यक असणाऱ्या 145 आमदारांचं समर्थन उद्धव ठाकरे यांना असल्याचं विधिमंडळात सिद्ध करून दाखवावं लागेल. शिवसेनेचे सध्या 55 आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे 53 तर काँग्रेसचे 44 आमदार आहेत. ही एकूण संख्या होते 152. याशिवाय काही मित्रपक्षांनी आणि अपक्षांनीही सरकारला पाठिंब दिला आहे. मात्र शिवेसनेचे 13 आमदार आणि काही अपक्ष सरकारमधून फुटले तर हे सरकार अल्पमतात येण्याची शक्यता आहे. शिवाय काँग्रेसमधूनही काही आमदारांनी महाविकास आघाडीविरोधात भाजपला मतदान केल्याचं राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत दिसून आलं आहे. त्यामुळे बहुमत सिद्ध कऱण्याचं मोठ आव्हान मुख्यमंत्र्यांपुढे असणार आहे. जर हे  आव्हान ते पेलू शकले, तर सरकारसमोर असणारी अस्थिरता दूर होईल आणि सरकार आणखी काही काळ निश्चिंतपणे कारभार करू शकेल.

अधिक वाचा -  Eknath Shinde Not Reachable : आमदारांसोबत एकूण 4 मंत्रीही नॉट रिचेबल, शिवसेनेतील बंडामुळे राजकीय हालचालींना वेग

बहुमत सिद्ध न झाल्यास राजीनामा

मुख्यमंत्री बहुमत सिद्ध करू शकले नाहीत, तर त्यांना राजीनामा द्यावा लागू शकतो. यापूर्वी दीड दिवसांच्या सरकारमध्ये बहुमत सिद्ध करू शकत नाही, हे अगोदरच दिसून आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे हे बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच पदाचा राजीनामा देऊ शकतात. 

अधिक वाचा - Eknath Shinde : सुरतेतील झटक्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात भूकंप होणार? शिंदे आणि गुजरातच्या भाजप नेत्यामध्ये खलबतं

भाजपकडून सत्तास्थापनेचा दावा शक्य

जर बहुमत सिद्ध होऊ शकलं नाही किंवा त्याअगोदरच मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला, तर भाजपकडून सत्तास्थापनेचा दावा केला जाऊ शकतो. फुटलेले शिवसेना आमदार, अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या समर्थनासह भाजप बहुमताची जुळवाजुळव कऱण्यात यशस्वी ठरला, तर पुन्हा एकदा भाजप सरकार महाराष्ट्रात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी