मुंबई : दररोज नवनवीन घोटाळे बाहेर काढून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांची डोकेदुखी वाढवणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी आज मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांची एकजूट तोडण्यात उध्दव ठाकरे व संजय राऊत यांनी अनेक प्रयत्न करुनही हाती निराशा आली असताना आज किरीट सोमय्यांनी एका ट्विटमध्ये करुन दाखवले.
अधिक वाचा : सोमय्यांकडून मुख्यमंत्र्यांची भेट; शिंदे गटातील यामिनी जाधव, सरनाईकांवरील ईडीची पीडा टळणार?
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीने सरकार स्थापन केले. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे प्रथमच राज्याचे प्रशासकीय मुख्यालय असलेल्या मंत्रालयातील आपल्या दालनात दाखल झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि समर्थक आमदारांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्य दालनात कामकाजाला प्रारंभ केला. त्यानंतर त्यांना विविध पक्षाच्या नेत्यांनी भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
अधिक वाचा : आमच्याशी बोलायचे असेल तर आजुबाजूचे लोक बाहेर ठेवा, पण..; केसरकरांनी 'मातोश्री'ला सांगितली अट
भाजपचे नेते किरीट सोमय्या व त्यांचा पूत्र निल सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीचा फोटो ट्विट करीत वादग्रस्त मजकूर टाकला. यामध्ये सोमय्यांनी म्हटले की, मंत्रालयात आज 'रिक्षावाला' मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, शुभेच्छा दिल्या. माफिया मुख्यमंत्री ना हाठविल्या बदल अभिनंदन केले. सोमय्या यांच्या या वादग्रस्त ट्विटबद्दल शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच याबाबत आपण समर्थक आमदारांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती दिली.
केसरकर म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख हे मोठे नेते आहेत.मुंबईत आल्यावर शिंदे गटाचे आमदार आणि भाजपचे आमदार यांची संयुक्त बैठक झाली त्या बैठकीत शिवसेनेच्या मोठ्या व्यक्तींबद्दल वाईट बोलायचे नाही असे ठरले होते.सोमय्यानी केलेल्या या वक्तव्याचा निषेध करीत याबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेवून नाराजी व्यक्त करणार असल्याचे केसरकर यांनी स्पष्ट केले.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.