Mumbai Bank : प्रवीण दरेकर यांचं काय होणार? आज उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी

मुंबई
भरत जाधव
Updated Apr 12, 2022 | 11:23 IST

मुंबई बँकेतील बोगस मजूर प्रकरणी चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

What will happen to Praveen Darekar
Mumbai Bank : प्रवीण दरेकर यांचं काय होणार?  |  फोटो सौजन्य: Indiatimes

Mumbai Bank :  मुंबई बँकेतील बोगस मजूर प्रकरणी चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. याआधी सत्र न्यायालयाने दरेकर यांना अटकेपासून दिलासा दिला असला तरी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. 

मुंबई पोलिसांनी प्रवीण दरेकर यांची दोन वेळा चौकशी केली होती. काही दिवसांपूर्वीच त्यांची चौकशी झाली होती. दरेकर यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले असून सरकार सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचे म्हटले. पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्याची आमची तयारी असल्याचे प्रवीण दरेकर यांनी म्हटले. तर, उच्च न्यायालयात सरकार तोंडघशी पडणार असल्याचा दावा दरेकर यांच्या वकिलाने केला होता. त्यामुळे आता उच्च न्यायालय दरेकर यांना दिलासा देणार की अटकपूर्व जामीन फेटाळणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

काय आहे प्रकरण?

प्रवीण दरेकर यांची मुंबै बँकेवर संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली होती. मुंबै बँकेच्या निवडणुकीत प्रवीण दरेकर मजूर आणि नागरी सहकार बँक अशा दोन्ही प्रवर्गातून निवडून आले होते. परंतु सहकार विभागाने प्रवीण दरेकर यांना मजूर म्हणून अपात्र ठरवले. दरेकर 1997 पासून मुंबै बँकेवर मजूर प्रवर्गातून संचालक म्हणून निवडून येत आहेत. पण मजूर नसतानाही निवडणूक लढवून प्रवीण दरेकर यांनी बँकेच्या हजारो ठेवीदारांची आणि सरकारची फसवणूक केल्याचा आरोप करत आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे यांनी त्यांच्याविरोधात तक्रार नोंदवली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी