Hanuman Chalisa Row: आज राणा दाम्पत्याचं काय होणार? जेल की बेल, मुंबई सत्र न्यायालय काय देणार निकाल

मुंबई
भरत जाधव
Updated May 02, 2022 | 09:45 IST

राणा दाम्पत्याच्या भवितव्याचा फैसला आज होणार आहे. राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या राणा दाम्पत्याच्या (Rana couple) जामीन अर्जावर (Bail application) आज सुनावणी होणार आहे. शनिवारी (30 एप्रिल) झालेल्या सुनावणीत न्यायालयाकडून निकाल राखून ठेवण्यात आला होता.

What will happen to the Rana couple today?
राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर आज निर्णय   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • मातोश्री बाहेर हनुमान चालिसा पठण करणार असल्याची घोषणा केल्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांची निर्दशने.
  • शनिवारी झालेल्या चर्चेदरम्यान दोन्ही बाजूंच्या वकिलांनी सुमारे अडीच तास युक्तिवाद केला.
  • आमदार रवी राणा यांच्याविरोधात 17, तर खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात 6 गुन्हे दाखल आहेत.

मुंबई: राणा दाम्पत्याच्या भवितव्याचा फैसला आज होणार आहे. राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या राणा दाम्पत्याच्या (Rana couple) जामीन अर्जावर (Bail application) आज सुनावणी होणार आहे. शनिवारी (30 एप्रिल) झालेल्या सुनावणीत न्यायालयाकडून निकाल राखून ठेवण्यात आला होता. मुंबई सत्र न्यायालय (Mumbai Sessions Court) आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि खासदार नवनीत राणा (Navneet Rana) जामीन अर्जावर आज आपला निकाल जाहीर करणार आहे. न्यायाधीश आर. एन. रोकडे हे राणा दाम्पत्याचा निकाल करणार आहेत.

दरम्यान शनिवारी झालेल्या चर्चेदरम्यान दोन्ही बाजूंच्या वकिलांनी सुमारे अडीच तास युक्तिवाद केला. राणा दाम्पत्यावर धार्मिक भावना भडकावल्याचा आणि देशद्रोहाचा आरोप आहे.दरम्यान, आमदार रवी राणा यांच्याविरोधात 17, तर खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात 6 गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे सरकारी वकिलांनी राणा दाम्पत्याच्या जामिनाला विरोध केला आहे.

दोन्ही बाजूंचे युक्तिवाद

न्यायालयात जामिनाला विरोध करताना मुंबई पोलिसांनी सांगितले की, नवनीत राणा यांच्यावर गंभीर आरोप आहेत. राणा दाम्पत्य तुरुंगातून बाहेर पडून प्रकरणावर प्रभाव टाकू शकते, असा सरकारचा युक्तिवाद आहे. दुसरीकडे राणा दाम्पत्याच्या वकिलांनी युक्तिवाद करताना राणा दाम्पत्य जबाबदार नागरिक असून सर्व अटी पाळणार असल्याचे सांगितले. सुनावणीदरम्यान वकिलाने देशद्रोहाच्या आरोपावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.  यादरम्यान वकिलाने राणा दाम्पत्याच्या ८ वर्षांच्या मुलीचाही संदर्भ दिला. मुख्यमंत्र्यांच्या खासगी निवासस्थानाजवळ हनुमान चालीसाचे पठण करून द्वेष निर्माण करण्याचा याचिकाकर्त्यांचा हेतू नसल्यामुळे कलम १५३ (ए) अंतर्गत आरोप कायम ठेवता येणार नाही, असे राणा दाम्पत्याने याचिकेत म्हटले आहे.

Read Also : राज ठाकरेंच्या अल्टीमेटवर मुस्लिम समाज शांत राहणार - जलील

यावरून सुरू झाला वाद 

नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरातील मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठन करणार असल्याचे जाहीर केल्यावर संपूर्ण वादाला सुरुवात झाली. या घोषणेनंतर शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी नवनीत राणांविरोधात निदर्शने केली. त्यानंतर अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार नवनीत राणा आणि बडनेराचे आमदार पती रवी राणा यांनी मात्र 23 एप्रिल रोजी मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याची त्यांची योजना रद्द केली.  मात्र पोलिसांनी त्यांना अटक करून कारागृहात पाठवले. सध्या 14 दिवस न्यायालयीन कोठडीत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी