Fact Chack : बाबरी मशीद पडली तेव्हा देवेंद्र फडणवीस १३ नाही होते २२ वर्षांचे 

Jayant Patil on Devendra Fadanvis : बाबरी ढांचा पाडताना एकही शिवसैनिक अयोध्येत नव्हता, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यानंतर शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये शाब्दीक वादाला सुरुवात झाले आहे.  यात राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उडी घेतली आहे. पण त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे वय सांगण्यात चूक केल्याचे समोर आले आहे. 

When Babri Masjid fell, Devendra Fadnavis was not 13 but 22 years old
बाबरी मशीद पडली तेव्हा फडणवीस १३ नाही होते २२ वर्षांचे  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बाबरी ढांचा पाडताना एकही शिवसैनिक अयोध्येत नव्हता, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले होते.
  • शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये शाब्दीक वादाला सुरुवात झाले आहे.  
  • यात राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उडी घेतली आहे. पण त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे वय सांगण्यात चूक केल्याचे समोर आले आहे. 

मुंबई : बाबरी ढांचा पाडताना एकही शिवसैनिक अयोध्येत नव्हता, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यानंतर शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये शाब्दीक वादाला सुरुवात झाले आहे.  यात राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उडी घेतली आहे. पण त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे वय सांगण्यात चूक केल्याचे समोर आले आहे. 

अधिक वाचा : ​एका रात्रीत प्रसिद्ध व्हायचेय? या सोप्या उपायांनी होणार ग्रह

अयोध्येतील बाबरी मशीद पाडली तेव्हा आपण त्याठिकाणी होतो, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. १९९२ साली देवेंद्र फडणवीस अवघ्या १३ वर्षांचे होते. त्यावेळी फडणवीस (Devendra Fadnavis) अयोध्येला गेले असतील तर हे गंभीर प्रकरण आहे. याप्रकरणी लालकृष्ण अडवाणी यांच्यावर १३ वर्षांच्या बालकाला अयोध्येला नेऊन त्याचे प्राण धोक्यात घातले म्हणून गुन्हा दाखल होऊ शकतो, असे वक्तव्य राष्ट्रावादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केले. ते मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलत होते.

अधिक वाचा : चहापाण्याला बोलवून मनसे कार्यकर्त्यांची अटक

पण जयंत पाटील देवेंद्र फडणवीस यांचे वय १३ असल्याचे म्हणून फसले आहे. देवेंद्र फडणवीस यांची जन्म तारीख २० जुलै १९७० आहे. सध्या ते ५१ वर्षांचे आहेत. बाबरी मशीद पाडली गेली तेव्हा ती तारीख होती ६ डिसेंबर १९९२. त्यामुळे त्या वेळी देवेंद्र फडणवीस यांचे वय हे २२ वर्ष आणि ५ महिन्यांच्या आसपास होते. त्यामुळे जयंत पाटील यांनी फडणवीस १३ वर्षांचे होते. हा केलेला दावा साफ खोटा ठरत आहे. त्याचे गणित चुकले असल्याचे दिसत आहे. 

हा घ्या पुरावा 

devendra - babari

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी