Mumbai Local Train: मुंबई लोकल ट्रेनचे डिजिटल तिकीट कधी मिळणार? मुंबईकर विचारत आहेत प्रश्न

Mumbai Local Train Digital Ticket : कोरोनापूर्वी, ATVM, KOTVM, GTBS आणि मोबाइल UTS सारखे डिजिटल तिकीट पर्याय प्रवाशांसाठी उपलब्ध होते.

when digital ticket start for mumbaikar in mumbai local train
मुंबई लोकल ट्रेनचे डिजिटल तिकीट कधी मिळणार?  
थोडं पण कामाचं
  • मुंबईत कोरोनाचा संसर्ग (Corona in Mumbai) मोठ्या प्रमाणात आटोक्यात आला आहे.
  • मुंबई लोकल ट्रेनसह (Mumbai Local Train)  मेल आणि एक्स्प्रेस गाड्याही कोरोनाच्या काळात पूर्ण क्षमतेने रुळावर धावत आहेत
  • कोरोनापूर्वी, ATVM, KOTVM, GTBS आणि मोबाइल UTS सारखे डिजिटल तिकीट पर्याय प्रवाशांसाठी उपलब्ध होते.

Mumbai Local Train । मुंबई :  मुंबईत कोरोनाचा संसर्ग (Corona in Mumbai) मोठ्या प्रमाणात आटोक्यात आला आहे. मुंबई लोकल ट्रेनसह (Mumbai Local Train)  मेल आणि एक्स्प्रेस गाड्याही कोरोनाच्या काळात पूर्ण क्षमतेने रुळावर धावत आहेत. मात्र तिकीट काढण्यासाठी तिकीट खिडकीवर यावे लागत असल्याने मुंबई लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी आहे. तिकीट काढण्यासाठी मोबाईल किंवा इतर डिजिटल सुविधा अजूनही बंद आहेत. म्हणजेच तिकीट काढण्यासाठी तिकीट खिडकीवर येणे प्रवाशांना अपरिहार्य  आहे. त्यामुळे मोबाइल किंवा अन्य डिजिटल पद्धतीने तिकीट काढण्याची यंत्रणा कधी सुरू होणार, हा  प्रश्न मुंबईकर विचारत आहेत.  तिकीट खिडकीसमोर उभं राहून तिकीट काढण्यात बराच वेळ वाया जातो, त्यामुळे पुन्हा एकदा मोबाईल किंवा इतर डिजिटल माध्यमातून तिकीट काढण्याची सुविधा सुरू व्हावी अशी मुंबईकरांची इच्छा आहे. (when digital ticket start for mumbaikar in mumbai local train )

कोरोनापूर्वी, ATVM, KOTVM, GTBS आणि मोबाइल UTS सारखे डिजिटल तिकीट पर्याय प्रवाशांसाठी उपलब्ध होते. ते कोरोनाच्या काळात बंद होते. पण आता कोरोनाची लाट मंदावत आहे.  आता पूर्वीप्रमाणेच गाड्या पूर्ण क्षमतेने धावत आहेत. सर्व काही सामान्य होत असताना डिजिटल तिकीट सुविधा अद्याप बंद का आहे? हा प्रश्न आहे तसाच आहे.


एसटी संपाचा परिणाम मुंबई लोकलवर

राज्यातील एसटी बसेसच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे मुंबई आणि मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेवरही परिणाम झाला आहे. राज्य परिवहनच्या बसने प्रवास करणारे असे अनेक लोक आता ट्रेनमध्ये प्रवास करत आहेत. अशा परिस्थितीत मुंबई लोकलमध्ये प्रवास करण्यासाठी तिकीट खिडकीबाहेर रांगा लांबत चालल्या आहेत. तिकीट काढण्यासाठी लांबच लांब रांगेत उभे राहावे लागते. अशा परिस्थितीत डिजिटल तिकिटाची सुविधा पुन्हा सुरू करून प्रवाशांचा त्रास कमी व्हावा, अशी मागणी रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून होत आहे.

पडून असलेली यंत्रेही होतील खराब 

रेल्वे स्थानकांमध्ये तिकीट खिडक्याबाहेर लावलेल्या एटीव्हीएम आणि स्मार्ट कार्ड मशीनचा वापर केला जात नाही. अशा स्थितीत ते बंद पडून धूळ खात आहेत. त्याचा वापर लवकर सुरू न केल्यास ते मशीन बिघडतील, असे काही रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचेही मत आहे. अशा स्थितीत त्यांना भंगारात पाठवावे लागणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी