Chhagan Bhujbal on quitting Shiv Sena: मुंबई : छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची शिवसेनेतील (ShivSena) कारकीर्द आणि त्यांनी शिवसेना सोडणे ही खूपच वादग्रस्त बाब आहे. भुजबळ शिवसेना सोडून ज्येष्ठ नेते शरद पवारांसोबत (Sharad Pawar) गेले होते ही महाराष्ट्रातील त्यावेळेच्या राजकीय पटलावरील धक्कादायक गोष्ट होती. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Chief Balasaheb Thackeray)यांचा महत्त्वाचा साथीदार शरद पवारांसोबत जातो ही घटनाच राजकारणाला हादरवणारी होती. आता त्याच धक्कादायक, जोखमीने भरलेल्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवणाऱ्या घटनेबद्दल राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आपले मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी सांगितले की, इतर मागासवर्गीयांच्या (Other Backward Classes) (OBCs)हितासाठी आपण शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) मध्ये प्रवेश करून मी मोठी जोखीम पत्करली होती. (When I left Shiv Sena, I had risked my political career, says Chhagan Bhujbal)
मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना नेहमीच ओबीसी समाजाच्या मदतीचा मार्ग दाखवला आहे, असेही ते म्हणाले. ओबीसी समाज हक्क संघर्ष समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना भुजबळ म्हणाले, "गेली अनेक वर्षे मी ओबीसी समाजासाठी काम करत आहे. त्यांच्या फायद्यासाठी मी माझी राजकीय कारकीर्द धोक्यात घातली आणि शिवसेनेतून बाहेर पडलो."
महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री भुजबळ पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ओबीसींच्या हक्कांच्या लढ्यात त्यांना खूप मदत केली. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत समाजाला राजकीय आरक्षण मिळावे या मागणीसाठी पालघरमध्ये ओबीसी समाज हक्का संघर्ष समितीच्यावतीने निदर्शने करण्यात आली आहेत.
भुजबळ यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेतून केली होती, मात्र 1991 मध्ये त्यांनी पक्ष सोडला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळेस शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Chief Balasaheb Thackeray) यांचा जबरदस्त करिष्मा होता. शिवसेनेचा राज्याच्या राजकारणात विशेषत: मुंबईत दबदबा होता. अशावेळी कोणीही बाळासाहेबांना किंवा शिवसेनेला सोडून जाण्याचा विचारदेखील करू शकत नसते. मात्र भुजबळांनी हा प्रचंड जोखमीचा आणि धाडसी निर्णय घेऊन अवघ्या महाराष्ट्राला हादरवले होते. त्यानंतर कित्येक दिवस छगन भुजबळ यांच्या शिवसेना सोडण्याच्या निर्णयाचीच चर्चा सुरू होती. नंतर, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काँग्रेसपासून फारकत घेऊन स्वत:चा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस (राष्ट्रवादी), स्थापन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, भुजबळ त्यांच्यासोबत गेले.
सध्या, महाविकास आघाडी (MVA) सरकारचा एक भाग म्हणून महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची सत्ता आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी 3 मे पर्यंत मशिदींतील लाऊडस्पीकर हटवण्याचा राज्य सरकारला दिलेल्या अल्टिमेटमवर भुजबळ म्हणाले की, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून हा मुद्दा काळजीपूर्वक हाताळण्याची गरज आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.