आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौरा कधी? संजय राऊतांनीचं केला सवाल अन् जवाबही दिला

मुंबई
भरत जाधव
Updated May 08, 2022 | 12:49 IST

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचा अयोध्या दौरा राजकीय नसेल, असं संजय राऊत (Sanjay Raut) यांनी स्पष्ट केलं आहे. त्यासोबतच 10 जून रोजी मोठ्या संख्येनं शिवसैनिक आणि युवासैनिक आदित्य ठाकरेंसोबत अयोध्येला जातील असंही राऊत म्हणाले आहेत.

When is Aditya Thackeray's visit to Ayodhya?
आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचा 'हा' आहे मुहूर्त  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • शिवसेनेकडून अयोध्येत पोस्टर लावली जात आहेत.
  • अयोध्येत कोण जातंय, कोण येतंय? यानं फरक पडत नाही. तिथे सर्वांना जावंच लागेल. प्रभू श्रीराम सर्वांचेच दैवत आहेत.- संजय राऊत
  • आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचा मुहूर्त 10 जूनचा ठरला

Ayodhya Thackeray Ayodhya Visit : मुंबई :  देशाच्या राजकारणात आता अयोध्येला विशेष स्थान मिळू लागलं आहे. साधरण सर्व राजकीय नेते आता अयोध्येचा (Ayodhya ) दौरा करू लागले आहेत. नव्याने हिंदुत्वाच्या (Hindutva) भूमिकावर ठाम होत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष (President) राज ठाकरे (Raj Thackeray) हे 5 जूनला अयोध्येला जाणार असल्याचं घोषित झाल्यानंतर आता शिवसेनेचे नेते पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही अयोध्येचा दौरा करणार आहेत. हा दौरा कधी असणार, कसा असेल असे प्रश्न स्वत: करत संजय राऊतांनीचं त्याची उत्तरे दिली आहेत.  

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचा अयोध्या दौरा राजकीय नसेल, असं संजय राऊत (Sanjay Raut) यांनी स्पष्ट केलं आहे. त्यासोबतच 10 जून रोजी मोठ्या संख्येनं शिवसैनिक आणि युवासैनिक आदित्य ठाकरेंसोबत अयोध्येला जातील असंही राऊत म्हणाले आहेत. राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यावरुन मनसे आणि शिवसेनेत पोस्टर युद्ध सुरू झालं आहे. सुरुवातीला मुंबईत मनसेकडून राज ठाकरेंच्या दौऱ्याविषयी पोस्टर लावण्यात आली होती. आता शिवसेनेकडून अयोध्येत पोस्टर लावली जात आहेत. या पोस्टर्सवरही राऊतांनी भाष्य केलं आहे. 

राऊत म्हणाले आहेत की, "माहित नाही असली नही क्या है? कोणी पोस्टर्स लावलेत? पण मला फक्त एवढंच माहीत आहे की, अयोध्येत शिवसेनेच्या स्वागताची तयारी सुरु झाली आहे. जोरदार स्वागत होईल. अयोध्येत कोण जातंय, कोण येतंय? यानं फरक पडत नाही. तिथे सर्वांना जावंच लागेल. प्रभू श्रीराम सर्वांचेच दैवत आहेत. ते एखाद्या धर्मापुरते मर्यादित नाहीत. पण कोणी खोट्या भावनेनं, राजकीय भावनेनं जात असेल किंवा कोणाला कमी लेखण्यासाठी जात असेल, तर त्यांना प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद नाही मिळणार. तिथे विरोध होताना दिसेल."

दरम्यान, राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यानंतर आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती मिळत आहे. 10 जून रोजी अयोध्येला जातील, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचा मुहूर्त 10 जूनचा ठरला असून त्यांच्या दौऱ्याची सगळी तयारी जवळपास पूर्ण झाल्याचंही संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. "मुख्यमंत्री होण्यापूर्वी आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर गेले होते. आता तुम्ही विचारताय आदित्य ठाकरे केव्हा जाणार? आदित्य ठाकरे 10 जून रोजी जाणार आहेत. आदित्य ठाकरेंचा दौरा राजकीय नसून आम्ही प्रभू श्रीरामांवरील श्रद्धा आणि भक्तीपोटी अयोध्येत जात आहोत, असंही राऊतांनी यावेळी बोलताना सांगितलं. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी