13th Installment Release Date and Time: आर्थिकदृष्ट्या कमकुवत शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 13व्या हप्त्यासाठी बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. अशी आशा आहे की, (PM Kisan Samman Nidhi) या अंतर्गत प्राप्त होणारा 13 वा हप्ता 24 फेब्रुवारीच्या आसपास जारी केला जाऊ शकतो. परंतु आतापर्यंत सरकारकडून या मुद्द्यावर कोणती अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही (when the 13th installment of PM Kisan Yojana will be released)
2019 मध्ये चालू केलेल्या या योजनेला लवकरच 4 वर्षे पूर्ण होणार आहे. या 4 वर्षात शेतकऱ्यांना 12 हप्त्यांचा लाभ देण्यात आला आहे. 17 ऑक्टोबर 2022 रोजी 11 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना 12व्या हप्त्याचा लाभ मिळाला. किसान सन्मान निधी अंतर्गत, 2000 रुपये थेट नोंदणीकृत शेतकर्यांच्या खात्यात वर्षातून तीनदा जमा केले जातात.
या निधीअंतर्गत मिळणारी रक्कम वाढवण्याबाबत यापूर्वीही अनेकदा चर्चा झाली आहे. मात्र, ही रक्कम वाढविण्याचा सध्या कोणताही प्रस्ताव नसल्याचे सरकारकडून संसदेत सांगण्यात आले आहे. सध्या, किसान योजनेंतर्गत, शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये दिले जातात. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी लोकसभेत असा कोणताही बदल किंवा प्रस्ताव याबाबत भाष्य केलेले नाही.
अधिक वाचा : मुंबईत जोडीनं फिरायचं आहे मग या ठिकाणी जा
अधिक वाचा : ब्लेडमध्ये का बनवली जातेही डिझाइन
केंद्र सरकारने सुरू केलेली ही योजना केंद्रीय क्षेत्रातील योजना आहे. नियमानुसार राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासन गरजू शेतकरी कुटुंब शोधून लाभ देतात. सरकारी आकडेवारीनुसार, 30 जानेवारी 2023 पर्यंत, या योजनेंतर्गत, शेतकऱ्यांना वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये 2.24 लाख कोटींहून अधिक रक्कम प्रदान करण्यात आली आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.