Raj Thackeray : विधानसभेच्या पुढील निवडणुका कधी, राज ठाकरेंनी सांगितला महिना

Raj Thackeray : राज्यातील सध्याची स्थिती पाहता राज्यात कधीही मध्यावधी निवडणुका लागू शकतात अशी शक्यता सर्व राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत. पण आजचा सुप्रीम कोर्टातील राज्याच्या सत्तासंघर्षावर आलेल्या अपटेडनंतर राज्यातील निवडणुका या येत्या जानेवारी-फेब्रवारी महिन्यात लागू शकतात असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

When will the next assembly elections be held, Raj Thackeray said the month
विधानसभेच्या पुढील निवडणुका कधी, राज ठाकरेंनी सांगितला महिना  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • राज्यातील सध्याची स्थिती पाहता राज्यात कधीही मध्यावधी निवडणुका लागू शकतात अशी शक्यता सर्व राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत.
  • राज्याची सध्याची स्थिती पाहता राज्यातील मतदारांना प्रश्न पडला असेल की आपण कोणाला मतदान केले आणि काय झाले.
  • सध्याची परिस्थिती पाहता गणपती आणि दिवाळीत निवडणुका होणार नाहीत

Raj Thackeray, मुंबई :  राज्यातील सध्याची स्थिती पाहता राज्यात कधीही मध्यावधी निवडणुका लागू शकतात अशी शक्यता सर्व राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत. पण आजचा सुप्रीम कोर्टातील राज्याच्या सत्तासंघर्षावर आलेल्या अपटेडनंतर राज्यातील निवडणुका या येत्या जानेवारी-फेब्रवारी महिन्यात लागू शकतात असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी व्यक्त केले आहे. (When will the next assembly elections be held, Raj Thackeray said the month)

अधिक वाचा :  आधी बँकेचे पैसे परत करण्यासाठी अभ्यास करा - रोहित पवार

राज्यात काय सुरू आहे. राज्याची सध्याची स्थिती पाहता राज्यातील मतदारांना प्रश्न पडला असेल की आपण कोणाला मतदान केले आणि काय झाले.  त्यांना हा पण विसर पडला असावा की आपण कोणाला मतदान केले आहेत. त्यामुळे सुप्रीम कोर्टात आज झालेल्या सुनावणीनंतर जी काही अपडेट आली त्यावरून असे दिसते आहे की, राज्यातील लवकरच मध्यावधी निवडणुका लागू शकतात, असे राज ठाकरे यांनी आज मुंबईतील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सांगितले आहे. 

अधिक वाचा :  Vastu Tips: जेवण करताना या दिशेला तोंड केल्यास बनाल श्रीमंत

सध्याची परिस्थिती पाहता गणपती आणि दिवाळीत निवडणुका होणार नाहीत. त्यामुळे दिवाळी नंतर किंवा पुढील वर्षी जानेवारी फेब्रुवारीमध्ये मध्यावधी निवडणुका लागू शकतात. त्यामुळे आपण कामाला लागणे गरजेचे आहे. माझे भाषण, माझे वक्तव्य हे लोकांपर्यंत पोहचवायला हवीत, लोकांमध्ये जनजागृती निर्माण व्हायला हवी, असेही राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले. 

अधिक वाचा :  असा आहे 'या'अभिनेत्रीचा बॉलिवूडपर्यंतचा खडतर प्रवास

राज्यातील स्थितीवर आणि इतर गोष्टींवर राज ठाकरे यांनी आपली रोखठोक मते मांडली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, भाजप यांच्यावर नाव न घेता टीका केली.  माझ्यासोबत बाळासाहेब आणि प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार आहेत. याबाबतीत आपण श्रीमंत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मला कोणत्याही चिन्हाची गरज नाही. विचार खूप महत्त्वाचा आहे. तो माझ्याचकडे असल्याचा दावा राज ठाकरे यांनी यावेळी केला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी