उद्या कुठे जाण्याचा प्लान करताय? आजच जाणून घ्या रेल्वेचं वेळापत्रक, मध्य, हार्बर मार्ग असेल ब्लॉक

मुंबई
भरत जाधव
Updated Nov 05, 2022 | 08:01 IST

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार आणि पनवेल ते वाशीदरम्यान मध्य रेल्वेने रविवारी ब्लॉक घोषित केला आहे.

central, harbor route will be block
मध्य, हार्बर मार्गावर उद्या ब्लॉक  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • बोरिवली ते भाईंदरदरम्यान रात्रकालीन ब्लॉक
  • सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान रविवारी ब्लॉक घेण्यात येत आहे.
  • हार्बर रेल्वेच्या पनवेल ते वाशी दरम्यान सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 या ब्लॉक घेण्यात येणार आहे

मुंबई :  मुंबईची लाईफलाईन (Lifeline) समजली जाणारी मुंबई लोकल (Mumbai Local) आठवड्यातील एक दिवस आराम करते. रेल्वेचा (railway) आराम करायचा दिवस बहुदा रविवार असतो. रेल्वे रुळ, रेल्वे गाड्या, सिग्नल, ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीची कामे या दिवशी केली जातात. या कामांसाठी मुंबईतील जीवनवाहिनी असलेल्या लोकलवर ब्लॉक घेतला जातो. (Where are you planning to go tomorrow? central, harbor route will be block)

अधिक वाचा  : काश्मीरहून ते कन्याकुमारी फक्त 3,900 रुपयात जाणारी बाइक

दरम्यान उद्या रविवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार आणि पनवेल ते वाशीदरम्यान मध्य रेल्वेने ब्लॉक घोषित केला आहे. तर बोरिवली ते भाईंदरदरम्यान रात्रकालीन ब्लॉक असल्याने पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक असणार नाही. यामुळे रविवारी काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून, काही लोकल फेऱ्या विलंबाने धावतील. 

अधिक वाचा  : ट्विटरच्या भारतातील सर्व कर्मचाऱ्यांनी गमावली नोकरी

मध्य रेल्वेचा  मुख्य मार्गावर म्हणजेच सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान रविवारी ब्लॉक घेण्यात येत आहे. अप आणि डाउन धीमा दोन्ही मार्गावर ब्लॉक असेल. ब्लॉकचा वेळ सकाळी  10.55 ते दुपारी 3.55 असणार आहे. या वेळेत ब्लॉक असल्याने अप-डाऊन धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या अप-डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल गाड्या रद्द राहणार असून काही फेऱ्या 20 मिनिटे विलंबाने धावणार आहेत. तर हार्बर रेल्वेच्या पनवेल ते वाशी दरम्यान सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 या  ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक अप आणि डाउन या दोन्ही मार्गावर असेल. या घेण्यात आलेल्या ब्लॉकमुळे  सीएसएमटी ते पनवेल/बेलापूर आणि पनवेल-ठाणे दरम्यान धावणाऱ्या अप आणि डाऊन फेऱ्या रद्द राहणार आहेत. या कालावधीत बेलापूर/नेरूळ आणि खारकोपर, ठाणे-वाशी/नेरूळ आणि मुंबई-वाशी दरम्यान लोकल फेऱ्या धावणार आहेत. 

पश्चिम रेल्वेवरील बोरिवली ते भाईंदर या स्थानकादरम्यानही ब्लॉक घेण्यात येत आहे. हा ब्लॉक अप-डाउन धीमा अशा दोन्ही मार्गावर असेल. या ब्लॉकची वेळ शनिवार ते रविवार मध्यरात्र असेल. रात्री 12.35 ते 4.35 या वेळेत हा ब्लॉक असणार आहे. या वेळेत धीम्या मार्गावरील वाहतूक विरार/वसई रोड ते बोरिवली/गोरेगाव दरम्यान जलद मार्गावर वळविण्यात येणार आहे. काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी