..पण तुम्ही उप मुख्यमंत्री म्हणत नार्वेकरांना शुभेच्छा देताना विरोधकांनी फडणवीसांना डिवचलं

मुंबई
भरत जाधव
Updated Jul 03, 2022 | 15:10 IST

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात अनेक भूकंपाचे धक्के लागल्याचे आपण पाहिले. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला होता. दरम्यान राज्यातील सत्तांतराच्या नाट्यानंतर आज विधानसभा अध्यक्षपदाची पहिली लढाई भाजप व शिंदे गटाने जिंकली.

Oppostion target to Deputy Chief Minister Fadnavis
नार्वेकरांना शुभेच्छा देताना विरोधकांनी फडणवीसांना डिवचलं   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांनी 164 मते मिळवत ही निवडणूक जिंकली.
  • सर्वात कमी वयात 20 वे अध्यक्ष होण्याचा मान राहुल नार्वेकरांना मिळाला

मुंबई  : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात अनेक भूकंपाचे धक्के लागल्याचे आपण पाहिले. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला होता. दरम्यान राज्यातील सत्तांतराच्या नाट्यानंतर आज विधानसभा अध्यक्षपदाची पहिली लढाई भाजप व शिंदे गटाने जिंकली. राहुल नार्वेकर विजयी झाल्यानंतर विरोधकांसह नुकतेच सत्तेत आलेल्या आमदारांनी त्यांचे अभिनंदन केलं. पण उपमुख्यमंत्री फडणवीसांना मात्र खाली पाहत बसावं लागलं. यामागील कारण म्हणजे नार्वेकरांना शुभेच्छा देताना विरोधकांनी फडणवीसांना उपमुख्यमंत्री पदावरुन डिवचलं. 

भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांनी 164 मते मिळवत ही निवडणूक जिंकली. तर, मविआच्या राजन साळवींनी 107 मते मिळवता आली. तर 3 आमदार हे सदस्य तटस्थ होते. त्यामुळे हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यरी यांनी बोलावलेले विशेष अधिवेशन सुरू झाले आहे, यात विधानसभेचे अध्यक्षांची निवड करण्यात आली.

राहुल नार्वेकर यांना 164 मते मिळत भाजप-शिंदे गटाने विजय मिळवला. एकीकडे विजय मिळवला असताना आनंदी असतानाच फडणवीसांना थोडंसं नाराजीची चव चाखावी लागली.  सर्वात कमी वयात 20 वे अध्यक्ष होण्याचा मान राहुल नार्वेकरांना मिळाला आहे. यामुळे विरोधी पक्षातील नेत्यांनी  नार्वेकरांना शुभेच्छा देताना आपल्या मागण्यांकडे लक्ष दिलं जाईल अशी मागणी करत फडणवीसांना जोरदार टोलेबाजी केली. या टोलेबाजीत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेना नेते सुनील प्रभू, राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांनी फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद घेण्यावरून डिचवचलं. 

फडणवीसजी तुमचं कसं कौतुक करायचं हाच प्रश्न - बाळासाहेब थोरात

राहुल नार्वेकरांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात काम केलं आहे. आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय म्हणून राहुल नार्वेकर ओळखले जात. परंतु आता ते भाजपकडून विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत शिवाय ते त्यांनी अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. त्यांना शुभेच्छा देताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, अध्यक्ष राहुल नार्वेकर तुम्ही आदित्य ठाकरे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस सगळ्यांचेच खास आहात, पण काँग्रेसच्या जवळ का नाहीत ते कळत नाहीत, सगळ्यांना तुम्ही आपलेसे वाटणारे अध्यक्ष आहात.  एकनाथ शिंदेही शाखा प्रमुखापासून मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचले, त्यांचं कौतुक वाटतं, पण फडणवीसजी तुमचं कसं कौतुक करायचं हाच प्रश्न आम्हाला पडतो, असा टोला त्यांनी लगावला. 

Read Also : दिवसातून 8 किलोमीटर चालणं आहे फायदेशीर

फडणवीस उपमुख्यमंत्री झाले याचं आम्हाला जास्त दुःख - सुनिल प्रभू

सत्तांतराचे वारे वाहू लागले तेव्हा असं वाटलं होतं की राहुल नार्वेकर या राज्याचे कायदेमंत्री होतील, पण काहीही होऊ शकतं, ज्यांना मुख्यमंत्री म्हणून पाहत होतो, त्यांना उपमुख्यमंत्री म्हणून पाहतोय, कायदेमंत्री म्हणून पाहत होतो त्यांना विधानसभा अध्यक्ष म्हणून पाहतोय, फडणवीस उपमुख्यमंत्री झाले याचं आम्हाला जास्त दुःख.

Read Also :शिंदे गटानेही आदित्यसह 16 आमदारांना बजावला व्हीप

फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक

भाजपने शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा दिला आणि शिंदे- भाजपचं सरकार सत्तेत आलं. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार सांभाळतील असा सर्वच जण अंदाज व्यक्त करत होते. मात्र, भविष्यातील राजकाराणाचा विचार करता देवेंद्र फडणवीसांनी नवीच खेळी खेळली. आपण कोणत्याच पदावर न राहता सरकारसोबत काम करणा अशी घोषणा त्यांनी केली होती. परंतु काहीवेळात देवेंद्र फडणवीस यांचा उपमुख्यमंत्री म्हणून त्याच दिवशी शपथविधी करण्यात आला. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी