मुंबई : निवडणूक आयोगाने (Election Commission) शिंदे गटाला (Shinde group) शिवसेना (Shiv Sena) हे नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण दिलं. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिंदे गट ठाकरे गटाच्या ताब्यात असलेल्या कार्यालयांवर ताबा घेत आहे. अशात दोन्ही गटात व्हिपवरुन दावा प्रतिदावा केला जात आहे. ठाकरे गटानुसार शिंदे गटाचे व्हिप हा आम्हाला लागू होत नाही तर शिंदे गटानुसार, आमचा व्हिप हा सर्व शिवसेना आमदारांना लागू असेल असा दावा केला जात आहे. प्रत्येक गटातील नेत्यांचा दावा करत असला तरी कायदा मात्र वेगळंच सांगतो. (whips of the Shinde group and the Thackeray group applicable to each other? find out)
अधिक वाचा : ब्राऐवजी तुम्ही काय- काय परिधान करू शकता
येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिवसेनेच्या सर्व 56 आमदारांना व्हिप लागू करुन आदित्य ठाकरे यांच्यासह ठाकरे गटाच्या 14 आमदारांना कोंडीत पकडण्याचा डाव शिंदे गटाने आखल्याची चर्चा आहे. या व्हिपचे पालन करणाऱ्या आमदारांवर कारवाई होऊ शकते, असे संकेत शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी दिले होते. त्यामुळे ठाकरेंच्या गोटातील खळबळ माजली आहे.
अधिक वाचा : Chanakya Niti डोक्यात ठेवली तर कधीच नाही बिघडणार आपला बजेट
विधानसभेत सध्या ठाकरे गटाचे 16, तर विधान परिषदेत12 आमदार आहेत. लोकसभेत उद्धव ठाकरे गटाचे 6, तर राज्यसभेत 3 खासदार आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ठाकरे समर्थक आमदार-खासदारांना शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा पक्षादेश पाळणे बंधनकारक ठरू शकतो, अशी चर्चा आहे.
शिंदे गटातील प्रतोद भरत गोगावले हे शिवसेनेतील 56 आमदारांना व्हिप देणार आहेत. या 56 आमदारांमध्ये शिंदे आणि ठाकरे गटाच्या आमदारांचा समावेश होतो. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर सर्व अधिकार शिंदे गटाकडे गेले आहेत. त्यामुळे व्हिप बजावल्यनंतर सर्व आमदारांनी त्याचं पालन करावं. व्हिपचं उल्लंघन केल्यास कारवाई होईल, असं प्रताप सरनाईक म्हणाले.
व्हिप बजावण्यावरुन शिंदे गटाने ठाकरे गटातील आमदारांना दिला आहे. शिवसेनेच्या सर्व 56 आमदारांनी सभागृहात उपस्थित राहावं, असं वक्तव्य आमदार प्रताप सरनाईक यांनी केलं आहे. तर त्यासंदर्भात प्रतोद भरत गोगावले सूचना देतील. 56 आमदारांनी व्हिपचं उल्लंघन करू नये. जे उपस्थित राहणार नाहीत त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली जाईल, असंही प्रताप सरनाईक म्हणाले.
अधिक वाचा : लग्नासाठी पती-पत्नीच्या वयात किती अंतर असावे?
प्रसारमाध्यमांशी बोलताना भरत गोगावले म्हणाले की, “अधिवेशनातील उपस्थितीबाबत लवकरच व्हीप जारी करणार आहे. हा व्हीप सर्वांना लागू होतो, त्यातून कोणीही सुटणार नाही. शिवसेना नाव आणि चिन्ह यावर जे कोणी निवडून आले आहेत, मग ते ठाकरे असो किंवा शिंदे गट, सर्वांनाच हा व्हीप लागू होणार आहे. आम्ही चुकीचं काही करणार नाही.
अधिक वाचा : तुम्हाला परीक्षेत टॉपर व्हाययंच मग लावा या सवयी
शिंदे गटाने दिलेल्या व्हिप देण्याच्या इशाऱ्यावरुन ठाकरे गटातूनही प्रतिक्रिया आल्या आहेत. यावर बोलताना खुद्द उद्धव ठाकरे म्हणालेत की, “आमदार अपात्र होऊ शकत नाही. कारण, निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला मान्यता दिली आहे. दोन गट आहेत, हे मान्य केलं आहे. त्यानुसार आम्हाला नाव आणि चिन्ह वेगळं दिलं आहे.” मूळ नाव आणि चिन्ह हे कोणाचं, याचा निर्णय निवडणूक आयोग देऊ शकत नव्हतं. मात्र आयोगाच्या या निर्णयाला आम्ही आव्हान दिलं आहे. त्या गटाला त्यांनी नाव आणि चिन्ह दिलं आहे. त्यामुळे आमचा आणि त्यांचा काही संबंध नाही,”
व्हिप पाळला नाहीतर आमदारांवर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. परंतु एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेना अशाप्रकारे ठाकरे गटाची आमदारांवर कारवाई करू शकत नाही, असे मत कायदेतज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. या व्हिपच्या प्रकरणात कायदेतज्ज्ञ आणि राज्याचे माजी महाधिवक्त श्रीहरी अणे म्हणाले की, शिंदे गटाला ठाकरे गटातील आमदारांसाठी व्हिप वापरता येणार नाही.
अधिक वाचा : Daily Horoscope :सहा राशींसाठी सोमवती अमावस्येचा दिवस असेल भारी
शिवसेना शिंदे गटाची किंवा शिवसेना ठाकरे गटाची या दोन विरुद्ध Entities (संस्था) वेगवेगळे पक्ष आहेत असा निवडणूक आयोगाचा निकाल आहे. मुख्य पक्ष शिंदेंचा आहे असं त्यांनी म्हटलं आहे. हा शिंदेंचा पक्ष नव्हे, त्याअर्थी हा सत्ताधारी पक्ष नव्हे, हा वेगळा पक्ष आहे, असा त्याचा अर्थ आहे. जसा भाजपचा व्हिप सेनेवर चालत नाही, सेनेचा व्हिप राष्ट्रवादीवर चालत नाही किंवा दोघांचेही व्हिप काँग्रेसवर चालत नाही तशी स्थिती आहे. कायद्यामध्ये हे दोन भिन्न संस्था आहेत.
पक्षांतर बंदी कायद्यातील चौथ्या परिच्छेदानुसार, एखाद्या पक्षातून दोन तृतीयांश आमदार बाहेर पडले, त्यांनी वेगळा गट स्थापन केला तर उरलेले लोक आहेत, त्यांचा वेगळा पक्ष असतो. तो वेगळा पक्ष ठरतो, बाहेर पडलेल्यांचा वेगळा पक्ष होतो. त्यामुळे एकनाथ शिंदें गटाचा व्हिप ठाकरे गटाच्या आमदारांवर लागू होणार नाही,असं घटनातज्ज्ञ उल्हास बापट म्हणालेत.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.