Hindustani Bhau : शालेय शिक्षणमंत्र्यांच्या घराला घेराव आंदोलन करणारा हिंदुस्थानी भाऊ आहे तरी कोण? कसे जमा केले विद्यार्थी?

मुंबई
भरत जाधव
Updated Jan 31, 2022 | 18:24 IST

Students Agitation : काही दिवसांपूर्वीच परीक्षा (Examination) ऑफलाईनच (Offline) होणार असे शिक्षणमंत्र्यांकडून (Minister of Education) स्पष्ट करण्यात आल्यानंतर आज विद्यार्थी (Student) त्याविरोधात आक्रमक झाले आहेत. मुंबईत आज अचानक शेकडो विद्यार्थी रस्त्यावर (Student Protest) उतरत शिक्षण मंत्री (Minister of Education) वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्या घराला घेराव घातला.

Hindustani Bhau
शिक्षणमंत्र्यांच्या घराला घेराव घालणारा हिंदुस्थानी भाऊ   |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • आंदोलन पेटण्यापूर्वी हिंदुस्तानी भाऊची उपस्थिती
  • विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार दहावी आणि बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी या मागणीसाठी रस्त्यावर उतरण्याचं आवाहन
  • विकास पाठक हिंदुस्तानी भाऊ म्हणून युट्यूबवर प्रसिद्ध

Students Agitation :  मुंबई : काही दिवसांपूर्वीच परीक्षा (Examination) ऑफलाईनच (Offline) होणार असे शिक्षणमंत्र्यांकडून (Minister of Education) स्पष्ट करण्यात आल्यानंतर आज विद्यार्थी (Student) त्याविरोधात आक्रमक झाले आहेत. मुंबईत आज अचानक शेकडो विद्यार्थी रस्त्यावर (Student Protest) उतरत शिक्षण मंत्री (Minister of Education) वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्या घराला घेराव घातला. गर्दी एवढी जास्त होती की, पोलीसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. विद्यार्थ्यांच्या आंदोनलानामुळे ठाकरे सरकारला पुरता घाम फुटला. सरकारला चिंतेत पाडण्यासाठी कारणीभूत ठरलाय तो म्हणजे युट्यूबर हिंदुस्तानी भाऊ.  हिदुस्तानी भाऊ हा अनेक प्रकारे सोशल मीडियावर चर्चेत असतो. यावेळी पहिल्यांदाच तो विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. 

शिक्षणमंत्री आणि सरकारचं मुकाट्याने ऐकून घरीच बसणारे हे सर्व विद्यार्थी अचानक आले कुठून, त्यांचं नेतृत्व नेमकं कुणी केलं? कुणाच्या आवहानावर ते जमा झाले असे अनेक प्रश्न पोलीसांना पडला, तितकाच सरकारलाही पडला असेल. मग त्यातून हिंदुस्थानी भाऊचं (Hindustani Bhau Video) नाव समोर आलं. एक साधा रगड भाषेत व्हिडिओ बनवणारा युट्यूबर व्यक्ती एक इतकं मोठं आंदोलनाचं नेतृत्व करू शकतं. वा विद्यार्थ्यांना प्रभावित करू शकतं हे साधं तुम्हालाही वाटलं नसेल. अगदीच ठाकरे सरकारलाही ते वाटलं. 

कोण आहे हा हिंदुस्थानी भाऊ, त्याचं नेमकं नाव काय, तो करतो काय, असे अनेक प्रश्न सरकारसह अनेकांना पडली. विद्यार्थ्यांचं आदोलन पेटण्यापूर्वी काही वेळ आधीच तिथे हिंदुस्तानी भाऊ आलेला. मात्र त्याला तिथे न थांबू देता पोलिसांनी तिथून बाहेर काढलं. त्यानंतरच हे आंदोलन आणखी आक्रमक झालं. या हिंदुस्तानी भाऊला पोलिसांनी या ठिकाणाहून काढल्यानंतर हिंदुस्तानी भाऊने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे, तो व्हिडिओ आता चांगलाच वायरल होऊ लागला आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार दहावी आणि बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी या मागणीसाठी हिंदुस्तानी भाऊने यूट्युबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरण्याचं आवाहन काल केलं होतं. 

कोण आहे Hindustani Bhau 

या हिंदुस्तानी भाऊचे नाव आहे विकास पाठक. या हिंदुस्तानी भाऊने विद्यार्थ्यांना भडकावल्याचा आरोप केला जात आहे. हिंदुस्तानी भाऊ बिग बॉसच्या सीझन 13 मध्येही दिसून आला होता. त्याआधी सोशल मीडियावर त्याचे अनेक व्हिडिओ आहेत. ज्यामध्ये तो खालच्या भाषेत व्हिडिओ बनवण्यासाठी ओळखल जातो. त्यातूनच इन्फ्लूअन्सर युट्यूबर म्हणून तो प्रसिद्ध झाला आहे.

अभिनेता संजय दत्तच्या बोलण्यावर फिदा झालेला हिंदुस्तानी भाऊ आपल्या व्हिडिओमध्ये संजय दत्तसारखी बोलण्याची नक्कल करत असतो. 1999 मध्ये प्रदर्शित झालेली वास्तव या सिनेमाने प्रभावित झाल्यानंतर हिंदुस्तानी भाऊ संजय दत्त सिनेमात ज्या प्रकारे बोलायचा त्याच प्रमाणे विकास पाठक आपल्या व्हिडिओमध्ये बोलताना दिसतो.  हिंदुस्तानी भाऊच्या व्हिडिओची सुरुवात निकल ल****, पहिली फुरसत में निकल ही वाक्यांनी होत असतं. त्याची व्हिडिओ पाहणारे लोक नेहमी हिच वाक्य बोलताना दिसतात. 

विकास पाठक म्हणजे आत्ताचा हिंदुस्तानी भाऊ याने 20 डिसेंबर 2013 ला युट्यूब चॅनेल सुरू केला, त्याला हिंदुस्तानी भाऊ असं नाव दिलं. 2019 मध्ये त्याला यूट्यूबने Silver Play बटण दिलं होतं. 2019 पासून हिंदुस्तानी भाऊ युट्यूबवर लोकप्रिय झाला, सुरुवातीला तो पाकिस्तान आणि इतर युट्यूबरांना आपल्या व्हिडिओतून टार्गेट करायचा. विकास पाठक अर्वोच्च भाषेत व्हिडिओ बनवण्याबरोबर मुंबईतील दक्ष पोलीस टाइम्समध्ये एक बातमीदार म्हणूनही काम करतो. 2011 मध्ये विकास पाठकला मुख्य गु्न्हेगारी वार्ताहर म्हणून सन्मानित करण्यात आलं होतं.

दंडावर साईचं गोंदण काढलेला हिंदुस्तानी भाऊ हा भगवान गणेशचा भक्त आहे. इतकेच नाही तर भाऊ एक आदित्य युवा प्रतिष्ठान नावाची एनजीओ देखील चालवतात.   दरम्यान आजच्या आंदोलनाविषयी म्हणाताना पाठक म्हणाला की, शिक्षमंत्र्यांनी माझं म्हणनं ऐकून घेतलं नाही असा आरोप विकास पाठक ऊर्फ हिंदुस्तानी भाऊने केला आहे. 

आंदोलनानंतर काय म्हणाला हिंदुस्तानी भाऊ?

 आज तीन महिने झाले हे विद्यार्थी वर्षा गायकवाड यांना सांगत आहेत. त्यांचा आवाज ऐकला नाही. त्या विद्यार्थ्यांनी आज माझ्या आवाहनाला प्रतिसाद दिला, तर मी आज वाईट झालो का? कोरोना महामारी संपत नाही तोपर्यंत परीक्षा पुढे ढकला. तुम्ही सर्व बैठका ऑनलाईन घेता, मग विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाईन का. हे विद्यार्थी देशाचं भविष्य आहेत. परीक्षा नको असं मी म्हणालोच नाही. फक्त ती परीक्षा पुढे ढकला. तसेच तीन महिन्यापासून विद्यार्थी माझ्या संपर्कात आहेत. मी आज सरकारला आवाहन करतोय की परीक्षा पुढे ढकला. खेडेगावात आज हजारो विद्यार्थी आहेत. त्यांना ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण घेताच आलं नाही. लाखो विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्र्यांना आवाहन केलं होतं. आता विद्यार्थ्यांनी मला आवाहन केलं की आमच्यासाठी उभे राहा म्हणून मी आज त्यांच्यासाठी उभा आहे. अशी प्रतिक्रिया त्याने आंदोलननंतर दिली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी