श्रीजी होम्सचा खरा मालक कोण, सोमय्यांचा सवाल

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Apr 16, 2022 | 19:41 IST

Who is the real owner of Shreeji Homes asking Kirit Somaiya : मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या ‘श्रीजी होम्स’ नावाच्या रिअल इस्टेट कंपनीचा खरा मालक कोण असा प्रश्न भारतीय जनता पार्टीच्या किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला.

Who is the real owner of Shreeji Homes asking Kirit Somaiya
श्रीजी होम्सचा खरा मालक कोण, सोमय्यांचा सवाल  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • श्रीजी होम्सचा खरा मालक कोण
  • किरीट सोमय्यांनी उपस्थित केला सवाल
  • मनी लाँड्रिंगसाठी ‘श्रीजी होम्स’ नावाच्या कंपनीचा वापर - सोमय्या

Who is the real owner of Shreeji Homes asking Kirit Somaiya : मुंबई : मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या ‘श्रीजी होम्स’ नावाच्या रिअल इस्टेट कंपनीचा खरा मालक कोण असा प्रश्न भारतीय जनता पार्टीच्या किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला. मनी लाँड्रिंगसाठी ‘श्रीजी होम्स’ नावाच्या कंपनीचा वापर सुरू आहे. बेनामी संपत्ती वापरून बांधलेले ‘श्रीजी हाऊस’ जप्त करणे आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी करणे आवश्यक आहे. यासाठी इडीच्या अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. खऱ्या मालकाला लपविण्यासाठी कागदोपत्री जी व्यवस्था रचली आहे ती चौकशीतूनच उघड होईल, असे सोमय्या म्हणाले. आदित्य ठाकरेंचा ७ कोटींचा कोमोस्टॉक एक्सचेंजचा घोटाळा आहे या प्रकरणातही चौकशीची मागणी केल्याचे सोमय्या म्हणाले. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आर्थिक घोटाळे केले आहेत. या घोटाळ्यांकडे लक्ष जाऊ नये म्हणून संजय राऊत यांना पुढे करून नवनवे मुद्दे उपस्थित केले जात आहेत. संजय राऊत यांचा बोलविता धनी उद्धव ठाकरे आहेत, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. 

माझ्यावर आणि माझ्या मुलावर झालेल्या आरोपांचा एकही पुरावा कोर्टासमोर आलेला नाही. पण मी जे आरोप केले त्याचे पुरावे दाखवले. काही प्रकरणात चौकशी सुरू आहे आणि काही प्रकरणात कोर्टाच्या आदेशाने कारवाई सुरू आहे; असे किरीट सोमय्या म्हणाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी