धनुष्यबाण कुणाचा?, १५ दिवसानंतर इलेक्शन कमिशन देणार निकाल

Maharashtra Politics: शिवसेनेच्या ४० आमदारांनी उद्धव ठाकरेंच्या विरुध्द बंड केले होते, ज्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी (एमव्हीए) सरकार कोसळले होते. त्यानंतर बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली

Whose bow is it? Election commission will give the result after 15 days
धनुष्यबाण कुणाचा?, १५ दिवसानंतर इलेक्शन कमिशन देणार निकाल   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • शिंदे गटाने लोकसभा, विधानसभा आणि पाठोपाठ शिवसेनेच्या राजकीय पक्षावर दावा केला आहे.
  • शिंदे गटाला शिवसेना म्हणून मान्यता देण्यात यावी, तसेच धनुष्यबाण चिन्ह मिळावं अशी मागणी केली होती.
  • उद्धव ठाकरे गटाला 23 ऑगस्टपर्यंत आपलं म्हणणं मांडावंच लागणार आहे.

मुंबई : निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला पक्षाच्या निवडणूक चिन्हावरील दाव्याच्या समर्थनार्थ कागदपत्रे सादर करण्यासाठी आणखी 15 दिवसांची मुदत दिली आहे. निवडणूक चिन्ह ताब्यात घेण्यासाठी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाने शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हावर दावा ठोकला आहे. (Whose bow is it? Election commission will give the result after 15 days)

अधिक वाचा : AHMEDNAGAR | शिर्डीच्या साईचरणी 36 लाखांचा सोन्याचा मुकुट; आंध्रप्रदेशातील भक्ताचे दान

गेल्या महिन्यात निवडणूक आयोगाने माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या प्रतिस्पर्धी गटांना पक्षाच्या निवडणूक चिन्ह धनुष्यबाणावरील दाव्याच्या समर्थनार्थ 8 ऑगस्टपर्यंत कागदपत्रे सादर करण्यास सांगितले होते.

अधिक वाचा : Indepandance Day 2022 : खाते वाटप आणि पालकमंत्र्यांबाबत विलंब, पण ध्वजारोहणाची यादी झाली जाहीर, कोण कुठे करणार पाहा संपूर्ण यादी 

दरम्यान, उद्धव ठाकरे गटाच्या विनंतीनंतर निवडणूक आयोगाने आता त्यांना 23 ऑगस्टपर्यंत कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. उद्धव ठाकरे गटाने हे प्रकरण चार आठवडे तहकूब करण्याच्या याचिकेवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, सूत्रांनी सांगितले की सध्या निवडणूक आयोगाने फक्त कागदपत्रे मागवली आहेत आणि नंतर सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना सेनेच्या विधिमंडळ आणि संघटनात्मक शाखेकडून पाठिंब्याचे पत्र आणि या प्रकरणावरील त्यांची लेखी निवेदने यासह कागदपत्रे सादर करण्यास सांगितले होते.

अधिक वाचा : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्टपासून

या वर्षी जूनमध्ये शिवसेनेच्या 39 आमदारांनी पक्षनेतृत्वाविरुद्ध बंड केले होते, ज्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी (MVA) सरकार कोसळले होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश होता. शिंदे गटाने भाजपशी हातमिळवणी केली आणि नंतर महाराष्ट्रात सरकार स्थापन केले. शिंदे यांनी 30 जून रोजी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नंतर शिंदे गटाचे 9 आमदार आणि भाजपचे 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, अद्याप खाते वाटप झाले नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी