Whose conspiracy is it to cause riots in Maharashtra? : Ram Kadam : मुंबई : महाराष्ट्रात दंगली घडविण्याचे कारस्थान दिसत आहे. हे कारस्थान सत्ताधारी महाविकास आघाडीचे की काँग्रेसचे असा प्रश्न भाजपच्या राम कदम यांनी उपस्थित केला आहे. हिंदू आणि हिंदू संघटना यांना बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा संशय पण राम कदम यांनी व्यक्त केला.
कोरेगाव भीमा प्रकरणात शरद पवारांचा खोटेपणा उघड
नांदेडमध्ये तलवारी जप्त झाल्यानंतर राम कदमांनी राज्य सरकारवर डागली तोफ
महाराष्ट्रातील धुळे, पुणे आणि नांदेड या तीन जिल्ह्यांमधून तलवारींचा मोठा साठा पोलिसांनी जप्त केला. या संदर्भातली माहिती प्रसारमाध्यमांनी देताच भाजपच्या राम कदम यांनी थेट सत्ताधारी महाविकास आघाडीला धारेवर धरले.
नांदेड जिल्ह्यात २५ तलवारी पोलिसांनी जप्त केल्या. याआधी धुळे जिल्ह्यातून ८९ आणि पुणे जिल्ह्यातून ९७ तलवारी पोलिसांनी जप्त केल्या. नांदेड, धुळे आणि पुणे या तीन जिल्ह्यांमधून मोठ्या संख्येने तलवारींचा साठा जप्त झाला आहे. या प्रकरणात पोलीस तपास सुरू आहे. तपास सुरू असतानाच राम कदम यांनी तलवार प्रकरणात महाविकास आघाडी सरकारविषयी संशय व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रात अचानक तलवारींचे साठे जप्त होण्यास सुरुवात झाली आहे. ज्या भागांमध्ये तलवारी सापडत आहेत त्या भागांमध्ये सत्ताधारी गटाशी संबंधित लोकांचा प्रभाव आहे. याआधी मनसेच्या राज ठाकरे यांनी मशिदींवरचे भोंगे काढा नाही तर 'हनुमान चालिसा' लावू अशा स्वरुपाचा इशारा दिला. यानंतर ठराविक भागांमध्ये तलवारी आढळण्यास सुरुवात झाली आहे. हा घटनाक्रम बघता हिंदू आणि हिंदू संघटना यांना बदनाम करण्यासाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार प्रयत्न करत असल्याचा संशय भाजपच्या राम कदम यांनी व्यक्त केला आहे. तलवारींच्या प्रकरणाची निःपक्षपाती चौकशी व्हावी, अशी मागणी राम कदम यांनी केली.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.