महाराष्ट्राला कोरोनाच्या लसीच्या कमी मात्रा का दिल्या जात आहेत? आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा सवाल

मुंबई
Updated Apr 08, 2021 | 15:50 IST | टाइम्स नाऊ मराठी

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आणि कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्राला आवश्यकतेच्या प्रमाणात लसींच्या मात्रा का दिल्या जात नाहीत असा सवाल केला.

Rjesh Tope
महाराष्ट्राला कोरोनाच्या लसीच्या कमी मात्रा का दिल्या जात आहेत? आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा सवाल 

थोडं पण कामाचं

  • भाजपाचे सरकार असलेल्या राज्यांना झुकते माप दिल्याचा आरोप
  • गुजरातची लोकसंख्या निम्मी, पण मात्रा महाराष्ट्रापेक्षा जास्त
  • डॉ. हर्षवर्धन यांनी परिस्थिती सुधारण्याचे दिले आश्वासन

नवी दिल्ली: महाराष्ट्राचे (Maharashtra) आरोग्यमंत्री (health minister) राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी गुरुवारी केंद्र सरकारवर (central government) हल्लाबोल केला आणि कोरोनाचा (corona) सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्राला (Maharashtra) त्याच्या आवश्यकतेच्या प्रमाणात (proportion of need) लसींच्या मात्रा (vaccine doses) का दिल्या जात नाहीत असा सवाल त्यांनी उपस्थित केला. केंद्राने महाराष्ट्राला दिल्या जाणाऱ्या लसींची संख्या 7 लाखांवरून 17 लाखांवर नेली आहे, मात्र टोपे यांनी म्हटले आहे की राज्याला दर आठवड्याला कोव्हिड-19च्या लसीच्या किमान 40 लाख मात्रांची आणि प्रत्येक महिन्याला साधारण 1.6 लाख मात्रांची गरज आहे.

भाजपाचे सरकार असलेल्या राज्यांना झुकते माप दिल्याचा आरोप

टोपे यांनी म्हटले आहे की केंद्र सरकार महाराष्ट्राला जितकी गरज आहे तितकी मदत करत नाही आहे आणि उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात, हरियाणा अशा भाजपाशासित राज्यांना महाराष्ट्रापेक्षा जास्त लसी दिल्या जात आहेत. लसींची डिलिव्हरी मिळाल्याबरोबर लगेचच केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याशी संवाद साधून त्यांनी हा भेदभाव होत असल्याचा मुद्दा त्यांच्यासमोर मांडल्याचेही टोपे यांनी म्हटले आहे.

गुजरातची लोकसंख्या निम्मी, पण मात्रा महाराष्ट्रापेक्षा जास्त

यावेळी राजेश टोपे म्हणाले, "गुजरातची लोकसंख्या ही महाराष्ट्राच्या निम्मी आहे. मात्र गुजरातला आत्तापर्यंत 1 कोटी लसीच्या मात्रा मिळाल्या आहेत पण महाराष्ट्राला फक्त 1.04 लाख मात्रा मिळाल्या आहेत." ते पुढे म्हणाले, "महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटी आहे, इथे रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे, सकारात्मकता दर आणि मृत्यूंची संख्याही सर्वाधिक आहे. आम्हाला इतक्या कमी लसी का दिल्या जात आहेत?"

डॉ. हर्षवर्धन यांनी परिस्थिती सुधारण्याचे दिले आश्वासन

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी परिस्थिती सुधारण्यासाठी गरजेची पावले उचलण्याचे आश्वासन दिले असल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, "आम्ही अजूनही वाट पाहात आहोत. आम्हाला दर महिन्याला 1.6 कोटी आणि प्रत्येक आठवड्याला 40 लाख मात्रांची गरज आहे, कारण आम्ही दररोज 6 लाख लोकांचे लसीकरण करत आहोत. तसेच रेमिडिसिव्हिरचा पुरवठा आणि किंमतीवर नियंत्रण, शेजारी राज्यांमधून प्राणवायूचा पुरवठा आणि व्हेंटिलेटर्सचा पुरवठा याबाबतच्या समस्यांची चर्चाही पंतप्रधानांसोबत आज ठरलेल्या बैठकीत करणार असल्याची माहितीही टोपे यांनी दिली आहे.

जाणून घ्या राजेश टोपे यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे

  1. लसींच्या पुरवठ्यावरून केंद्र शासनासोबत वाद-विवादाचा विषय नाही. मात्र 6 कोटी लोकसंख्या असलेल्या आणि सध्या 17 हजार सक्रीय रुग्ण असलेल्या गुजरात राज्याला लसीचे 1 कोटी डोस देण्यात आले.
  2. गुजरातच्या दुप्पट लोकसंख्या आणि सुमारे साडे चार लाख सक्रीय रुग्ण असलेल्या महाराष्ट्रालाही 1 कोटी 4 लाख डोस देण्यात आले. त्यातील सुमारे 9 लाख डोस शिल्लक आहेत. 
  3. सातारा, सांगली, पनवेल या ठिकाणी लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्राला दर आठवड्याला फक्त 7.5 लाख डोस देण्यात येणार आहेत.
  4. याबाबत आज पुन्हा केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर त्यात 15 एप्रिलनंतर वाढ करून 17.5 लाख डोस पुरविण्यात येणार आहेत.
  5. उत्तर प्रदेशला 48 लाख, मध्ये प्रदेशला 40 लाख, गुजरातला 30 लाख आणि हरियाणाला 24 लाख डोस पुरविण्यात आले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी