Raj Vs Uddhav: 'काय तर म्हणे चार भिंतीच्या आत शब्द घेतला होता', राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर का केली अशी टीका?

मुंबई
रोहित गोळे
Updated Aug 23, 2022 | 16:45 IST

Raj Thackeray criticize Uddhav Thackeray: अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदावरुन राज ठाकरे यांनी आपला भाऊ उद्धव ठाकरे यांच्यावर तुफान टीका केली आहे.

why did mns chief raj thackeray criticize uddhav thackeray on cm post bjp vs shiv sena
'काय तर म्हणे चार भिंतीच्या आत शब्द घेतला होता', राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर का केली अशी टीका?  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका
  • भाजपचे जास्त आमदार असताना शिवसेनेने मुख्यमंत्री पद मागणं योग्य नव्हतं, राज ठाकरेंची शिवसेनेवर टीका
  • ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र बाळासाहेब असतानाच ठरलेलं, राज ठाकरेंचा दावा

Raj Thackeray: मुंबई: मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी  पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना सध्याच्या राजकीय परिस्थितीवर प्रचंड टीका केली. मात्र, प्रामुख्याने त्यांनी शिवसेना (Shiv Sena) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीकेची झोड उठवली. 'ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री असं काही वर्षापूर्वीच ठरलं होतं तर तुम्ही मध्येच अडीच वर्षाचं मुख्यमंत्री पद हे कुठून काढलं? काय तर म्हणे चार भिंतीच्या आत शब्द घेतला होता.' असं म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर जाहीर टीका केली. (why did mns chief raj thackeray criticize uddhav thackeray on cm post bjp vs shiv sena)

राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर तुफान टीका, भाजपसाठी सॉफ्ट कॉर्नर?

'मला लोकांची कमाल वाटते. २०१९ साली निवडणुका झाल्या. शिवसेना-भाजपने एकत्र निवडणूक लढवली. दोघांनी फारकत घेतली. काय तर म्हणे अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाचं घोषित केलं होतं. मला अजूनही आठवतंय.. मला माहितए... मी त्या बैठकीत असायचो. माननीय बाळासाहेब, मनोहर जोशी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे.. बरेच जण होते. तिथे पहिल्यांदा ठरलं की, ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री.. जर ही गोष्ट ठरलेली आहे तर २०१९ ला मागणी करुच कशी शकता की, कमी आमदार आलेत शिवसेनेचे..' 

अधिक वाचा: Raj Thackeray : विधानसभेच्या पुढील निवडणुका कधी, राज ठाकरेंनी सांगितला महिना

'म्हणे मी पहिल्यांदा शब्द घेतला होता. चार भिंतीत शब्द घेतला. माणसं कोण तिथे तर दोनच. एक तर हे खरं बोलतायेत किंवा ते खरं बोलतायेत. मुळात पहिल्यांदा तुम्ही मागितलंच कसं? ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री.. हे जर समीकरण ठरलेलं आहे तर तुम्ही पहिली गोष्ट सांगताच कशी.' 

'पंतप्रधान मोदी जेव्हा व्यासपीठावरुन भाषण करत होते त्यावेळी त्या व्यासपीठावर उद्धव ठाकरे बसलेले. तेव्हा मोदी जाहीर भाषणात सांगतायेत की, आपली परत सत्ता येईल आणि सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होईल. अमित शाहांनी जाहीर भाषण करताना सांगतायेत की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील. त्याचवेळी आक्षेप का नाही घेतला?'

अधिक वाचा: MNS: माझ्या नवऱ्याच्या हातात जेव्हा सत्ता येईल तेव्हाच रस्ते चांगले होतील: शर्मिला ठाकरे

'त्याचवेळी त्यांना फोन का केला नाही?, तेव्हाच त्यांची भेट घेऊन त्यांना सांगितलं का नाही की.. तुम्ही मला शब्द वेगळा दिला आणि व्यासपीठावर वेगळं बोलतायेत. सगळे निकाल लागल्यावर मग तुम्हाला आठवलं. याचा अर्थ या सगळ्याची बोलणी ही अगोदरपासून सुरु असणार. मग काय तर काँग्रेस-एनसीपी-शिवसेना यांचं सरकार. लोकांनी मतदान कोणाला केलं होतं.' 

'समजा आपण असं धरुयात शिवसेना-भाजपला मतदान करणारे लोकं आणि काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदान करणारी लोकं. दोघांनाही काय झालं असेल? काँग्रेस-राष्ट्रवादीच्या लोकांना वाटत असेल आम्हाला शिवसेना नको म्हणून तुम्हाला मतदान केलं. तर तुम्ही त्यांच्याबरोबर गेला.' 

अधिक वाचा: बाळासाहेबांचा तो किस्सा जो राज ठाकरेंनी आजवर सांगितला नव्हता

'ते नको म्हणू आम्ही तुम्हाला मतदान केलं आणि तुम्ही त्यांच्याच सोबत जातात. ही हिंमत होतेच कशी? ही हिंमत त्याचवेळी होते जेव्हा लोकं या गोष्टीला शासन करत नाहीत. जनता यांना शिक्षा करत नाही.' असं म्हणत राज ठाकरेंनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. त्यामुळे आता त्यांच्या टीकेला शिवसेना नेते काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी