महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा सर्वाधिक का? जाणून घ्या त्या मागचं कारण

मुंबई
पूजा विचारे
Updated Apr 13, 2020 | 17:48 IST

कोरोना व्हायरस विरोधात जोरदार युद्ध लढलं जात आहे. मात्र याच दरम्यान कोरोनाबाधितांचा आकडा 9 हजारच्या पार गेला आहे. महराष्ट्रात एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 2 हजारच्या वर गेला. त्यात मुंबईत जास्त रुग्ण आढळून आलेत. 

Maharashtra
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा सर्वाधिक का? जाणून घ्या 

मुंबईः देशभरात कोरोनाचे एकूण रुग्णांची संख्या 9 हजारच्या पुढे गेली आहे. या भयानक व्हायरसमुळे जवळपास 300 लोकांना आपले प्राण गमावावे लागलेत. जर देशातल्या वेगवेगळ्या राज्यांबद्दल बोलायचं झालं तर महाराष्ट्रात जास्त रुग्ण आढळून आलेत. त्यानंतर दिल्लीत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेत. गेल्या 6 दिवसात कोरोनाचे रुग्णांमध्ये दुपटीनं वाढ झाली आहेओडिशा, पंजाब, महाराष्ट्र, बंगाल सारख्या राज्यांमध्ये 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात जवळपास 30 टक्के रुग्ण हे तबलिघीशी संबंधित आहेत. 

14 एप्रिलला लॉकडाऊनचा पहिला फेज 

कोरोनाचा फैलाव थांबवण्यासाठी लॉकडाऊनचा पहिला फेज 14 एप्रिलला समाप्त होत आहे. ओडिशा, पंजाब, महाराष्ट्र, पश्चिम बंगालच्या सरकारनं 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान राष्ट्रीय स्तरावर आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आला नाही आहे.  पंतप्रधान आणि राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत जास्तकरुन राज्यांनी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 

महाराष्ट्रात रुग्णांचा आकडा वाढता 

महाराष्ट्रात ही रुग्णांची संख्या इतक्या वेगानं का वाढत आहे हाच प्रश्न उपस्थित होतो. महाराष्ट्र सरकार परिस्थितीवर नियंत्रण ठेवू शकत नाही? राज्यात तबलिघी जमातीच्या लोकांचा शोध लागला नाही किंवा इतर कोणतं कारण आहे. यामागचं नेमकं कारण सांगणं कठीण असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे.

नियमांकडे दुर्लक्ष केलं जातं? 

महाराष्ट्रातील कोरोना प्रकरणावर नजर टाकल्यास ज्या भागात स्वच्छता तसेच सोशल डिस्टेंसिंगचं योग्य पालन केलं जात नाही अशा ठिकाणांहून जास्तीत जास्त प्रकरणं समोर येत आहेत. असं चित्र महाराष्ट्रातील काही भागांतून समोर आले आहे जिथे सोशल डिस्टेंसिंगचे उल्लंघन झाले आहे. यासह जेव्हा घराच्या क्वारंटाइन संदर्भात काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली गेली होती, तेव्हा त्या योग्य पद्धतीने पाळल्या जात नव्हत्या.

राज्यात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन कायम 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवार स्पष्ट केलं आहे की, १४ एप्रिलनंतर देखील महाराष्ट्रात लॉकडाऊन कायम असणार आहे. पंतप्रधान मोदींशी झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केलं होतं. 'राज्यातील मुंबई, पुणे आणि इतर काही शहरात कोरोनाची स्थिती गंभीर आहे. त्यामुळे कोरोनावर संपूर्ण मात करण्यासाठी हा लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मला नाईलाजाने हा निर्णय घ्यावा लागत आहे. म्हणजे किमान ३० एप्रिलपर्यंत हा लॉकडाऊन असेल. किमान मी अशासाठी म्हणतोय की, आपण जर या पुढील काळात कुठेही गर्दी केली नाही तरच आपण कोरोनाला नियंत्रणात आणू शकतो. म्हणून ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन कायम असणार आहे.' 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी