Sleeping Hours : हे नेते झोपत का नाहीत? कमी झोपण्यामुळे निर्णयक्षमतेवर परिणाम होतो

मुंबई
अमोल जोशी
Updated Aug 16, 2022 | 19:06 IST

आपला नेता कमी झोपतो, याचं काही कार्यकर्त्यांना कोण कौतुक असतं. मात्र असं करणं आरोग्याच्या दृष्टीने घातक असून याचा निर्णयक्षमतेवरही विपरित परिणाम होतो.

Sleeping Hours
हे नेते झोपत का नाहीत?  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • नेते कमी झोपत असल्याचं होतं कौतुक
  • कमी झोपण्यामुळे निर्णयक्षमतेवर परिणाम
  • मानसिक आरोग्यही बिघडण्याची शक्यता

Sleeping Hours : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) रात्री फक्त दोन-तीन तास (2 hours sleep) झोपतात, असं विधान दीपक केसरकर (Deepak Keasarkar) यांनी नुकतंच केलं होतं. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबतही (PM Narendra Modi) त्यांच्या जवळचे नेते असंच काहीसं बोलत असतात. ते १८ तास काम करतात, फक्त ३ तास झोपतात वगैरे वगैरे. ही मंडळी खरोखरच असं करतात की नाही, या वादात आपण पडायला नको. पण जर खरोखरच असं होत असेल तर ते चांगलं आहे की वाईट, हे तपासून पाहण्याचा आपण प्रयत्न करूया. 

किती झोप गरजेची?

नॉर्मल सर्वसाधारण माणसाला किमान ६ ते ८ तासांची झोप आवश्यक असते. ती मिळाली नाही, तर निर्णयक्षमतेवर वाईट परिणाम होतो, असं हेल्थलाईनच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. हा रिपोर्ट म्हणतो की कमी झोपणाऱ्या माणसांच्या निर्णयक्षमतेवर वाईट परिणाम होतो, त्यांची क्रिएटिव्हिटी कमी होते आणि त्यांचा अपघात होण्याची शक्यता वाढते. कशाचा अपघात? तर ते जे काही ड्राईव्ह करत असतील त्याचा अपघात. 

जर सलग ४ रात्री तुम्ही ५ तासांपेक्षा कमी झोपला, तर मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम होतो, असंही या रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे. 

कमी झोपणारी माणसं ही सतत निगेटिव्ह मूडमध्ये असतात, कमी प्रॉडक्टिव्ह असतात असंही यात म्हटलं आहे. 

सो, मेडिकल अँगलने आपण याकडं बघितलं, तर कमी झोपणारी माणसं ही व्यवस्थित झोपणाऱ्या माणसांच्या तुलनेत अंडर परफॉर्मर ठरतात, असं दिसतं. 

अधिक वाचा- Dispose National Flag Respectfully : राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक डिस्पोज करा, वाचा मार्गदर्शक सूचना

काय आहे वर्क कल्चर?

आता आपण वर्क कल्चरच्या दृष्टीने हे तपासून बघुया. जगातल्या सगळ्या विकसित देशांमध्ये आणि विकसनशील देशांमध्ये कामाचे तास ठरवून देण्यात आले आहेत. त्यानुसार कुठलंही काम हे ८ ते ९ तासात पूर्ण करणं अपेक्षित असतं. आपल्याकडे त्यानुसारच कामाच्या वेळा आणि शिफ्ट ठरवण्यात आलेल्या असतात. सो, ठरवून दिलेल्या वेळेत एखाद्याला आपलं काम पूर्ण करता येत नसेल तर इनएफिशियंट आहे, असं मानलं जातं. म्हणजे ते काम करण्यासाठी जेवढी पात्रता असायला पाहिजे, त्यापेक्षा कमी पात्रता त्याच्याकडे आहे, असं मानलं जातं. तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये असे अनेक कर्मचारी बघत असाल, जे कामाचे तास संपले तरी ऑफिसमध्ये पडीक असतात आणि आपण कामाला किती वाहून घेतलंय, आपण किती डेडिकेटली काम करतोय, याचा दिखावा करत राहतात. 

सो बॉटम लाईन इज, माणूस कुठल्याही क्षेत्रात काम करत असो. जर तो रोजचं काम ८ ते ९ तासांत संपवू शकत नसेल, तर त्यानं लायकीपेक्षा मोठा घास घेतलाय, हे लक्षात ठेवा. 

अधिक वाचा- Nitish Kumar Cabinet list: नितीश मंत्रिमंडळात 31 चेहरे, पाहा मंत्रिमंडळाची संपूर्ण यादी, कोणाला मिळालं कोणते मंत्रिपद

मानसशास्त्र काय सांगतं?

आता, सायकॉलॉजिकली याचा विचार केला, तर अमूक एखादी व्यक्ती कमी झोपते, याचं एवढं कौतुक काहीजणांना का वाटत असावं? सायकॉलॉजिस्ट असं सांगतात की ज्यांना कामाचे रिझल्ट दाखवता येत नाहीत, त्यांना आपण किती कष्ट घेतले हे दाखवावं लागतं. जो कर्मचारी दिलेली असाइनमेंट वेळेत पूर्ण करू शकत नाही, तो काय म्हणणार? मी तर रात्री उशीरापर्यंत जागून काम करत होतो, पुन्हा पहाटे लवकर उठून काम सुरू केलं. सकाळपासून जेवलोसुद्धा नाही, नाश्तासुद्धा केला नाही, पाणीसुद्धा पिलं नाही वगैरे वगैरे. तर रिझल्ट न देता सतत अशी कारणं सांगणारा कर्मचारी एखाद्या कंपनीत प्रमोट होत राहिला, तर पुढच्या काही वर्षात त्या कंपनीचं काय होईल, असं तुम्हाला वाटतं? आपला नेता झोपत नाही असं प्रमोशन करण्याऐवजी तो पुरेशी झोप घेतो, वेळेत जेवण करतो, दिलेल्या वेळेत कामे पूर्ण करतो असं प्रमोशन करायला काय हरकत आहे?

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी