शिंदे-फडणवीस आणि पवारांसमोर दोन माईक का?, आशिष शेलारांचा विधानसभेत खोचक सवाल

BJP MLA Ashish Shelar Vidhansabha: भाजप आमदार आशिष शेलार यांनी एक सवाल विचारुन आपल्याच सरकारला काहीसं खिंडित गाठण्याचा प्रयत्न केला असल्याचं विधानसभेत पाहायला मिळालं.

why two mike in front of shinde fadnavis and ajit pawar ashish shelars question in vidhansabha
शिंदे-फडणवीस आणि पवारांसमोर दोन माईक का?: आशिष शेलार  |  फोटो सौजन्य: Facebook
थोडं पण कामाचं
  • आशिष शेलारांचा विधानसभेत खोचक सवाल
  • फडणवीस-शिंदे आणि पवारांसमोर दोन-दोन माईक का?
  • आशिष शेलारांच्या प्रश्नाने अनेकांच्या भुवया उंचावल्या

Ashish Shelar: मुंबई: विधानसभेत (Vidhansabha) सर्व सदस्यांचे अधिकार सारखे असतात अशावेळी फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) या तीन सदस्यांसमोरच दोन-दोन माईक का लावण्यात आले आहेत? असा खोचक सवाल भाजपचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी सभागृहात उपस्थित केला आहे. त्यांनी हा प्रश्न विचारताच सभागृहातील अनेक आमदारांच्या भुवया देखील उंचावल्या आहेत. (why two mike in front of shinde fadnavis and ajit pawar ashish shelars question in vidhansabha)

पाहा आशिष शेलार नेमकं काय म्हणाले:

'आपण सभागृहाचे, विधानसभेचे अध्यक्ष आहात. आमच्या सगळ्या अधिकाराची काळजी आपण घेतली पाहिजे. सन्माननीय सदस्य दिलीप वळसे-पाटील सुद्धा आहेत. माझी विनंती एवढीच आहे की, सभागृहातील सर्व सदस्य हे समान पद्धतीवर काम करणारे आहेत. अपेक्षा अशी आहे की, सर्वांनी महाराष्ट्राचा एकत्रित समान पद्धतीने विचार आपण करतो आहोत. सगळ्यांचे अधिकार समान आहेत.'

अधिक वाचा: अजित पवारांचा सवाल अन् तानाजी सावंत गडबडले... विधानसभेतील नेमका ड्रामा काय?

'अध्यक्ष महोदय, पण मी कालपासून सभागृहापासून पाहतोय की, तीन सन्माननीय सदस्यांना दोन माईक आहेत. या ठिकाणी विरोधी पक्षनेत्यांना दोन माईक आहेत. उपमुख्यमंत्र्यांना दोन माईक आहेत. मुख्यमंत्र्यांना दोन माईक आहेत. आपल्यालाही दोन माईक नाही अध्यक्ष महोदय...' 

'सभागृहातील सर्व सदस्यांचा आवाज हा एका माईकवर महाराष्ट्रभर पोहचतो. एका माईकवर बाळासाहेब थोरात काम करु शकतात, एका माईकवर भुजबळ काम करु शकतात. एका माईकवर मी काम करु शकतो, आदित्य ठाकरेजी सुद्धा एका माईकवर काम करु शकतात. असं काय आहे की, या सदस्यांना दोन माईक दिले आहेत? याचं रेकॉर्डिंग दुसरीकडे जातंय का? यांच्यावर कोणी पाळत ठेवतंय काय?, यांच्याबाबतीत कोणाला विशेष माहिती हवी आहे का? हे दोन माईक का आहेत ही माझी हरकत आहे.' असा सवाल आशिष शेलार यांनी यावेळी उपस्थित केला.  

अधिक वाचा: महाराष्ट्रात १५ सप्टेंबरच्या आधी पुन्हा होणार मंत्रिमंडळ विस्तार

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं उत्तर 

दरम्यान, आशिष शेलार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीच उत्तर दिलं. ते म्हणाले की, 'शेलार साहेब आपल्याला खरं तर एका माईकची देखील गरज नाही. आपण माईकशिवाय देखील तेवढेच परिणामकारक आहात. आपण घेतलेल्या हरकतीची सखोल चौकशी करुन हा आवाज कुठे बाहेर जातोय का याबद्दलची पूर्ण माहिती घेऊ.' असं नार्वेकर म्हणाले. 

अधिक वाचा: महिलांसाठी सुरू असलेल्या कामाची गती वाढविणे आवश्यक : मोहन भागवत

मात्र, या सगळ्या प्रश्न-उत्तरामुळे आशिष शेलार यांनी हा सवाल नेमका का विचारला. त्यांची भूमिका काय? असा सवाल आता राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. नुकताच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला ज्यामध्ये आशिष शेलार यांना डावलण्यात आलं. त्याऐवजी त्यांना मुंबई भाजपचं अध्यक्षपद बहाल करण्यात आलं. त्यावरुन ते नाराज असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. त्यातच आता त्यांनी विधानसभेत असा प्रश्न विचारल्याने नव्या चर्चेला उधाण आलं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी