राहुल गांधींच्या महाराष्ट्र दौऱ्याला परवानगी नाकारणार?

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Dec 09, 2021 | 18:41 IST

ajit pawar comment on omicron cases in maharashtra and rahul gandhi's maharashtra tour ओमायक्रॉनचे राज्यातील रुग्ण वाढू लागले तर दिल्लीहून महाराष्ट्रात येणार असलेल्या राहुल गांधींच्या दौऱ्याला परवानगी देण्याबाबत प्रशासनाला विचार करावा लागेल, असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार म्हणाले. 

ajit pawar comment on omicron cases in maharashtra and rahul gandhi's maharashtra tour
राहुल गांधींच्या महाराष्ट्र दौऱ्याला परवानगी नाकारणार?  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • राहुल गांधींच्या महाराष्ट्र दौऱ्याला परवानगी नाकारणार?
  • ओमायक्रॉनचे राज्यातील रुग्ण वाढू लागले तर प्रशासनाला विचार करावा लागेल - अजित पवार
  • महाराष्ट्रातील ओमायक्रॉनबाधीत रुग्णांची संख्या बुधवार ८ डिसेंबर २०२१ रोजी दहा झाली

Will Rahul Gandhi's visit to Maharashtra be denied? मुंबईः काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी २८ डिसेंबर रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. पण ओमायक्रॉनचे राज्यातील रुग्ण वाढू लागले तर दिल्लीहून महाराष्ट्रात येणार असलेल्या राहुल गांधींच्या दौऱ्याला परवानगी देण्याबाबत प्रशासनाला विचार करावा लागेल, असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार म्हणाले. 

महाराष्ट्रातील ओमायक्रॉनबाधीत रुग्णांची संख्या बुधवार ८ डिसेंबर २०२१ रोजी दहा झाली. या दहा जणांच्या संपर्कात आलेल्या अनेकांच्या चाचण्या सुरू आहेत. यामुळे महाराष्ट्र शासन खबरदारी घेत असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. 

देशात दीर्घकाळ सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात असे चित्र होते. आता ओमायक्रॉन या कोरोना विषाणूच्या नव्या अवताराने बाधीत झालेल्या रुग्णांची राज्यातील संख्या झपाट्याने वाढू नये यासाठी शासन खबरदारी घेत आहे. यामुळेच राहुल गांधींच्या महाराष्ट्र दौऱ्याला परवानगी द्यावी की नाही याबाबत प्रशासन विचार करत असल्याचे संकेत अजित पवारांनी दिले.

एखाद्या नेत्याचा दौरा म्हणजे, मिरवणूक, सभा असे गर्दीचे कार्यक्रम होणार. या निमित्ताने संसर्ग पसरण्याचा धोका वाढू शकतो. यामुळेच राज्य शासन राहुल गांधींचा दौरा हा राज्यातले कोरोना आणि ओमायक्रॉनचे संकट वाढविण्याचे निमित्त ठरू नये या दृष्टीने विचार करत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी