NCP Ajit Pawar : मुंबई : सत्तांतरानंतर आता महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील (State Cooperative Bank)घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांची (Mumbai Police)आर्थिक गुन्हे शाखा (EOW)पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. सक्रिय होताच काका पुतण्या म्हणजेच अजित पवार आणि रोहित पवार यांच्याकडे मोर्चा वळवला आहे.(Will Rohit Pawar be in trouble along with Ajit Pawar?possibility of being investigated by the EOW)
अधिक वाचा : बीसीसीआयचा मोठा निर्णय, राष्ट्रीय निवड समिती बरखास्त
राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि विधानसभेचे विरोधी (Opposition Leaderof Legislative Assembly)पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि राष्ट्रवादीचे आमदार (NCP MLA)रोहित पवार (Rohit Pawar) यांच्याशी संबंधित कंपन्यांनी साखर कारखाने विकत घेताना संशयास्पद व्यवहार केल्याचा गुन्हे शाखेला संशय आहे. आर्थिक गुन्हे शाखेने या घोटाळा प्रकरणात अजित पवार आणि रोहित पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांची चौकशी करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडून कोर्टाकडे परवानगी मागितली आहे.
अधिक वाचा : चंद्रकांत खैरेंच्या भाषणाकडे लोकांनी फिरवली पाठ
राज्य सहकारी बँक घोटाळ्यात ईडीने केलेल्या चौकशीनंतर पवार कुटुंबियांशी संबंधित कंपन्यांकडून संशयास्पद लिलावाद्वारे कारखाने खरेदी करण्यात आले आहेत का, याबाबत आर्थिक गुन्हे शाखेकडूनही तपास केला जाणार आहे. ज्या कंपन्यांचा तपास केला जाणार आहे, त्यात जरंडेश्वर साखर कारखाना तसेच रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीकडून खरेदी करण्यात आलेल्या साखर कारखान्यांचा समावेश आहे.
अधिक वाचा : रात्रीची लाईट, अन् पिकाला पाणी देण्यासाठी गेला, झाला मृत्यू
दरम्यान, अजित पवार यांच्याबरोबरच अनेक राजकीय नेत्यांसह एकूण 75 जणांना दोन वर्षांपूर्वी 'क्लीन चीट' देणाऱ्या मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखेच्या भूमिकेत बदल झाला आहे. आरोपांबाबत फेरतपास सुरू करण्यात आला असल्याची माहिती इओडब्ल्यूतर्फे काही दिवसांपूर्वी मुंबई सत्र न्यायालयात देण्यात आली होती.
शिखर बँकेतील त्या-त्या काळच्या संचालक मंडळांतील संचालकांनी तसेच कर्ज मंजुरी समित्यांनी अनेक सहकारी साखर कारखाने, सूत गिरण्या तसेच संचालकांचे हितसंबंध असलेल्या कंपन्यांना नियमबाह्यपणे व सवलतीच्या दरांत कर्जांचे वितरण केले. या कर्जांची परतफेड न झाल्याने बँक डबघाईस आली आणि सरकारी तिजोरीचे 25 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी राज्य सरकारच्या सहकार विभागातील प्राधिकृत अधिकाऱ्याने महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील कलम 88 अन्वये तत्कालीन संचालक मंडळातील संचालकांवर सप्टेंबर-2015 मध्ये आरोपपत्र ठेवले. शिवाय काहींनी फौजदारी कारवाईसाठी पोलिसांत तक्रार दिली. तरीही कोणतीच कारवाई झाली नाही', असे आरोप फिर्यादी अरोरा यांनी केले होते.
अरोरा यांनी 2015 साली फौजदारी जनहित याचिका केली होती. त्याची अत्यंत गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने तातडीने एफआयआर नोंदवण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार, 'इओडब्ल्यू'ने माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवला. यामध्ये अजित पवार, शिवसेनेचे आनंदराव अडसूळ, राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये गेलेले विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याबरोबरच हसन मुश्रीफ, राजन तेली, श्रीनिवास देशमुख, माणिकराव कोकाटे अशा अनेक बड्या राजकीय नेत्यांना आरोपी करण्यात आले होते.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.