Eknath Shinde on Uddhav Thackeray: सत्ता स्थापन झाली, आता उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं...

मुंबई
सुनिल देसले
Updated Jul 04, 2022 | 19:53 IST

Eknath Shinde on Uddhav Thackeray: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला आणि त्यावर मुख्यमंत्री काय म्हणाले पाहूयात.

Will Shinde group discuss things with Uddhav Thackeray on this question Maharashtra CM Eknath Shinde replied
Eknath Shinde on Uddhav Thackeray: सत्ता स्थापन झाली, आता उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं... 
थोडं पण कामाचं
  • व्हीपचं उल्लंघन केलेल्यांवर कारवाई होणार - एकनाथ शिंदे 
  • बहुमताचा प्रस्ताव आम्ही जिंकला, खरी शिवसेना आम्ही आहोत - एकनाथ शिंदे
  • संतोष बांगर हे खऱ्या शिवसेनेत आले आहेत - देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्य विधानसभेचं दोन दिवसीय विशेष अधिवेशन मुंबईत पार पडलं. या अधिवेशनात एकनाथ शिंदे सरकारने बहुमत सिद्ध केलं आहे. दोन दिवसीय अधिवेशन पार पडल्यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Maharashtra CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. यावेळी पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले की, आता उद्धव ठाकरेंसोबत (Shiv Sena Party President Uddhav Thackeray) चर्चा करणार का? 

नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री? 

बंड पुकारल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी चर्चेस बोलावले होते आणि यावर मार्ग काढण्याचे प्रयत्न केले होते. आता सत्ता स्थापन झाली आहे तर उद्धव ठाकरेंसोबत चर्चेचे दरवाजे खुले आहेत का? की कायमचे बंद झाले आहेत? पत्रकारांनी विचारलेल्या या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर देणं टाळलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आज आम्ही थोडं फ्री झालो आहोत. त्यामुळे थोडं थांबा नंतर सर्व सांगतो.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, अडीच वर्षांचा कार्यकाळ हे सरकार पूर्ण करेल. इतकेच नाही तर पुढील निवडणुकीत आमचे दोनशे आमदार निवडून येतील. महाविकास आघाडीने घेतलेले सर्व निर्णय आम्ही रद्द करणार नाहीत. तर ज्या ठिकाणी घाई-गडबडीत निर्णय घेतले आहेत त्यावर आम्ही नियमानुसार निर्णय घेऊ. नियमानुसारच आम्ही काम करू.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत खासदार कुणाला मतदान करणार?

जे खासदार तुमच्या संपर्कात आहेत ते राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवाराला मतदान करणार का? या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, त्या संदर्भात मी नंतर बोलतो.

हे पण वाचा : पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचे; कुठे ऑरेंज अलर्ट अन् कुठे Yellow Alert? वाचा

सरकार कोसळणार?

शरद पवारांनी म्हटलं, सहा महिन्यांत सरकार कोसळणार, यावर एकनाथ शिंदे यांनी म्हटलं, शरद पवार हे खूप मोठे नेते आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे की, ते जेव्हा भाष्य करतात त्याच्या नेमकं विरुद्ध होत असतं. आमचं सरकार अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार आणि पुढील निवडणुकीत आमच्या युतीचे 200 आमदार विजयी होतील.

आज बहुमत सिद्ध करण्यापूर्वी शिवसेनेचे आमदार संतोष बांगर हे एकनाथ शिंदे गटात दिसून आले आणि त्यांनी शिंदे सरकारच्या बाजुने भाष्य केलं. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, संतोष बांगर खऱ्या शिवसेनेत आले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी