Rajesh Tope : मुंबई : भारतात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची (Corona Patients) संख्या वाढत आहे. महाराष्ट्रात शुक्रवार आणि शनिवारच्या तुलनेत रविवारी कोरोना रूग्णांमध्ये वाढ झाली आहे. अशातच राज्यात कोरोनाची चौथी लाट येणार का? अशी चर्चा नागरिकांसह माध्यमांमध्ये सुरू झाली आहे. दरम्यान याविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंना (Health Minister Rajesh Tope) प्रश्न करण्यात आला. यावर उत्तर देताना सांगितलं काळजी करण्याची गरज नाही.
कोरोनाची चौथी लाट, हा फार मोठा विषय नाही
आरोग्यमंत्री राजेश टोपे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, कोरोनाचा आजचा आकडा पाहता 254 नवीन रुग्ण आहेत. रिकव्हरी 98 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. राज्यात कोविड 19 च्या चौथी लाट येणार या चर्चेत आता काही तथ्य वाटत नाही. राज्यात कोरोनाची चौथी लाट येणार नाही. राज्यात कोरोना रुग्ण वाढत नसून लसीकरणही चांगलं झाले आहे. राज्यात सध्या 1950 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. हा फार मोठा विषय नाही. सध्या सर्वत्र गर्दी होत असून राजकीय मेळावे होत आहे. तरीही कोरोना रुग्णांची अपेक्षित वाढ नाही. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. आणि चौथ्या लाटेचीही शक्यता वाटत नाही. अँटीबॉडीजची टेस्ट करुन बूस्टर डोस घ्यावा. बूस्टर डोसबाबत केंद्राच्या सुचना आहे. त्यानुसार राज्यात बूस्टर डोस देण्यात येत आहेत. ॲंटीबॉडीजची टेस्ट करुन लोकांनी बूस्टर डोसबाबत निर्णय घ्यावा असे आरोग्यमंत्री म्हणाले.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.