Maharashtra legislative council: राज साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मतदान करणार पण कोणी गृहीत धरू नये - राजू पाटील

मुंबई
Updated Jun 20, 2022 | 15:00 IST | टाइम्स नाऊ मराठी

Maharashtra legislative council | राज्यात सध्या विधानपरिषदेच्या निवडणुकीचे वारे वाहत आहे. सर्वच प्रमुख पक्षांनी आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.

Will vote as Raj Saheb said but no one should assume says mla Raju Patil
राज साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मतदान करणार पण...  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • राज साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मतदान करणार पण कोणी गृहीत धरू नये - राजू पाटील.
  • व्यक्ती पाहून मतदान करण्याचा राज साहेबांचा मानस.
  • विजयासाठी महाविकास आघाडी आणि भाजप या दोघांनाही एक-एक मत मोलाचे आहे.

Raju Patil | कल्याण : राज्यात सध्या विधान परिषदेच्या (Maharashtra legislative council) निवडणूक होत आहे. सर्वच प्रमुख पक्षांनी आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. मात्र सर्वांचे लक्ष मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील (Raju Patil) हे कोणाच्या पारड्यात मतदान करणार याकडे लागले आहे. यादरम्यान स्वत: राजू पाटील यांनी याबाबत स्पष्टीकरण देत राजसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे मतदान करणार असल्याचे म्हटले आहे. राज्यसभेच्या मतदानावेळी मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील खूप चर्चेत आले होते आणि त्यांचे मत भाजपला गेल्याची खूप चर्चा रंगली होती. (Will vote as Raj Saheb said but no one should assume says mla Raju Patil). 

अधिक वाचा : महागाईमध्ये सरकार विकत आहे स्वस्तात सोनं, जाणून घ्या दर

मात्र काही वेळापूर्वीच राजू पाटील यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत विधान परिषदेच्या मतदानाबाबत सस्पेन्स निर्माण केला आहे. कोणी गृहीत धरू नये, भाजपला मतदान करणार आहोत की दुसऱ्या पक्षाला. लोकशाहीत मतदान हे पवित्र कर्तव्य असून तुम्ही पाहिलं आहे एका मताला देखील किती महत्व असतं. राज साहेबांनी निर्देश दिलेले आहेत, त्याप्रमाणे मतदान होईल, असे राजू पाटील म्हणाले.  

व्यक्ती पाहून मतदान करणार 

सध्या विजयासाठी महाविकास आघाडी आणि भाजप या दोघांनाही एक-एक मत मोलाचे आहे. त्यामुळे मनसेचे एकमेव मत आपल्या पारड्यात यावे यासाठी सर्वच राजकीय नेते प्रयत्नशील असल्याचे पाटील यांनी म्हटले. तसेच काही राजकीय पुढारी यासाठी राजसाहेबांशी देखील विनंती करत असतात. मात्र राजसाहेबांनी व्यक्ती पाहून मतदार करण्याचे सांगितले आहे असे आमदार राजू पाटील यांनी आणखी म्हटले. त्यामुळे राजू पाटील नेमकं कोणाला मतदान करतात याची प्रतिक्षा वाढली आहे. याबाबतची स्पष्टता निकालानंतरच समोर येईल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी