Maharashtra Winter Assembly Session : उद्यापासून अधिवेशनला सुरुवात; मुंबईत गाजणार हिवाळी अधिवेशन

मुंबई
भरत जाधव
Updated Dec 21, 2021 | 14:42 IST

Maharashtra Winter Assembly Session : उद्यापासून राज्याचे हिवाळी  (Winter) अधिवेशन (Assembly Session) सुरू होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीमुळे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत (Mumbai) होतं आहे.

Winter Assembly Session
उद्यापासून राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात   |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूकही या अधिवेशनात होण्याची शक्यता.
  • उद्याच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांची बैठक
  • 22 ते 28 डिसेंबर या दरम्यान हे अधिवेशन होणार आहे.

Maharashtra Winter Assembly Session : मुंबई :  उद्यापासून राज्याचे हिवाळी  (Winter) अधिवेशन (Assembly Session) सुरू होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीमुळे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत (Mumbai) होतं आहे. ओबीसी आरक्षण(OBC Reservation), पेपरफुटी (PaperLeak), परीक्षेतला विलंब, मराठा आरक्षण(Marathawada), शेतकरी प्रश्न (Farmers) अशा विविध मुद्द्यांवर या अधिवेशनात जोरदार गदारोळ होण्याची शक्यता आहे. आघाडी सरकारच्या (Aghadi Government) कारभारावरून आणि नेत्यांवरच्या आरोपांवरून विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याच्या प्रयत्नात दिसणार आहेत. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूकही या अधिवेशनात होण्याची शक्यता आहे. 

विरोधकांच्या आरोपांवरुन संयम ठेवून प्रतिहल्ला चढवणारे मुख्यमंत्री आता थेट उत्तर देणार आहेत. अधिवेशनाच्या निमित्त ठाकरे सरकार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आमने-सामने येणार आहेत. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आज भाजप नेत्यांची दुपारी बैठक होणार आहे. यात अधिवेशनातल्या रणनीतीवर खलबतं होणार असल्याची माहिती मिळत आहे. 

राज्याचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून (बुधवार) सुरु होत असून, हे हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. आधीच नागपूरमध्ये न होणारे हिवाळी अधिवेशन आणि अधिवेशनाचा कमी कालावधी यामुळे विरोधक आक्रमक आहेत. त्यातच ओबीसीच्या राजकीय आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालामुळे ठाकरे सरकारची डोकेदुखी वाढवण्याची शक्यता आहे. याचसोबत टीईटी परीक्षा घोटाळा, म्हाडा पेपर फुटी प्रकरण यासारख्या मुद्यावरून भाजप अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसांपासून सरकारची कोंडी करण्याची शक्यता आहे. भाजपने आपल्या सर्व आमदारांची बैठक बोलावली असून, अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा मास्टर प्लॅन भाजप आखत आहे. कमी कालावधीचे अधिवेशन असले तरी या अधिवेशनात सरकारची कोंडी करण्यासाठी भाजप रणनीती आखत आहे. 

सात दिवसांच्या अधिवेशनात पाच दिवस कामाचे

यंदाच्या राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला 22 डिसेंबरला सुरुवात होणार आहे. 22 ते 28 डिसेंबर या दरम्यान हे अधिवेशन होणार आहे. कार्यकाळ जरी सात दिवासांचा वाटत असला तरी शनिवार आणि रविवारमुळे हे अधिवेशन अवघ्या पाच दिवसांचे असणार आहे. हे अधिवेशन अधिक वादळी ठरण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी