Mumbai Crime: 10 वर्षांनी लहान प्रियकरासोबत हॉटेलमध्ये गेली, सकाळ होताच बेडवर आढळला मृतदेह

मुंबई
सुनिल देसले
Updated Jul 13, 2022 | 19:09 IST

Woman found dead in Mumbai hotel : आपल्यापेक्षा 10 वर्षांनी लहान प्रियकरासोबत हॉटेलमध्ये गेलेली एक महिला मृतावस्थेत आढळून आली आहे. मुंबईतील या घटनेने एकच खळबळ उडाली. 

Representative Image
प्रातिनिधिक फोटो 
थोडं पण कामाचं
  • मुंबईतील हॉटेलमध्ये आढळला महिलेचा मृतदेह 
  • मृतक महिला आपल्या प्रियकरासोबत आली होती हॉटेलमध्ये
  • आरोपी प्रियकराला पोलिसांनी केली अटक

मुंबई : मुंबईतील एका हॉटेलमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. ही महिला आपल्या प्रियकरासोबत हॉटेलमध्ये दाखल झाली होती. त्यानंतर सकाळच्या सुमारास महिलेचा मृतदेह आढळून आला. मुंबईतील मढ आयलंड येथील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि आपला तपास सुरू केला. या प्रकरणात महिलेच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला विवाहित होती आणि तिचा प्रियकरही विवाहित होता. मात्र, विवाहित असतानाही दोघांचे एकमेकांसोबत प्रेमसंबंध होते. आरोपी प्रियकर हा महिलेपेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे. दोन दिवसांपूर्वी हे दोघेही मढ आयलंड येथील एका हॉटेलमध्ये राहण्यासाठी आले होते. 

हॉटेलमध्ये असताना दोघांमध्ये जोरदार वाद झालं. या दोघांतील कडाक्याच्या भांडणाचा आवाज हॉटेलमधील त्यांच्या शेजारील रूममधील ग्राहकांना येऊ लागला. त्यानंतर या ग्राहकांनी हॉटेल प्रशासनाकडे याबाबत तक्रार केली. या तक्रारीनंतर हॉटेल प्रशासनाने त्या दोघांनाही हॉटेल सोडण्यास सांगितलं. यानंतर दोघांनीही माफी मागितली आणि आपल्या रूममध्ये पुन्हा गेले.

हे पण वाचा : डॉक्टर तरुणीची कोल्हापुरात आत्महत्या

सकाळी प्रियकर रूममधून गेला आणि...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भांडण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच प्रियकर हा हॉटेलमधून बाहेर गेला. बराच वेळ झाला तरी ही महिला रूममधून बाहेर आली नाही. त्यानंतर वेटरने त्यांच्या रूमचा दरवाचाही ठोठावला मात्र, कुठलाही प्रतिसाद आला नाही आणि त्यामुळे हॉटेल प्रशासनाला संशय आला.

हे पण वाचा : गर्भपात बंदीमुळे स्त्रिया साठवणूक करत आहेत गर्भनिरोधक गोळ्या

रूमचा दरवाजा उघडताच...

हॉटेल प्रशासनाने त्यांच्या रूमची मास्टर कि आणत दरवाजा उघडला. त्यानंतर समोरील दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसला. रूममध्ये ही महिला बेशुद्धावस्थेत आढळून आली. त्यानंतर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी याबाबत पोलिसांना कळवले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि तपासले असता ती महिला मृतावस्थेत असल्याचं कळालं.

मुंबई पोलीस आयुक्त विशाल ठाकूर यांनी सांगितले की, हॉटेलमध्ये चेक इन करताना दिलेल्या आयडीप्रूफ नुसार दोघांची ओळख पटली आहे. त्यानुसार मृतक महिलेचे नाव अमालूमैरी चार्ली असे आहे तर आरोपी प्रियकराचे नाव अमित आनंद असे आहे. आयडीप्रूफच्या आधारे आरोपीचा तपास सुरू केला आणि त्याला अटक केली. दोघेही आधीपासून विवाहित असून त्यांचे एकमेकांसोबत प्रेमसंबंध होते.

अटक करण्यात आलेल्या आरोपीने सांगितले की, हॉटेलमध्ये त्या दोघांमध्ये वाद झाला आणि कडाक्याच्या भांडणानंतर त्याने प्रेयसीचा गळा आवळून हत्या केली. महिलेच्या मृतदेहाचा पोस्टमार्टम करण्यात आलं आहे मात्र, अद्याप रिपोर्ट आलेला नाहीये. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यावर महिलेच्या मृत्यूबाबत अधिक माहिती समोर येईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी