childbirth In Auto Rickshaw : खड्ड्यांमुळं महिलेची रिक्षातच प्रसुती; गावात सोय नाही म्हणून मुंबईत आले, पण गावापेक्षा शहरात रस्ते खराब निघाले

मुंबई
भरत जाधव
Updated Aug 26, 2022 | 08:48 IST

मागील काही दिवसांत मुंबई (Mumbai)जवळच्या ठाणे, पालघर जिल्ह्यांत खड्यांमुळे अपघात (accident) होऊन जीव गमावल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे एका गरीब महिलेची प्रसूती (childbirth) रिक्षामध्ये (Rickshaw) झाल्याची घटना चक्क मुंबईत घडली आहे. यामुळे चकाचक मुंबई असं म्हटलं जात असलं तरी मुंबईतील रस्त्यांची खरी परिस्थिती काय हे परत एकदा समोर आलं आहे.

Woman gives birth in rickshaw due to potholes in mumbai
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळं महिलेने रिक्षातच दिला बाळाला जन्म  |  फोटो सौजन्य: Indiatimes, Representative Image
थोडं पण कामाचं
  • खडड्यांमुळे महिलेला रिक्षात करावी लागली प्रसुती.
  • खराब रस्त्यांमुळे रुग्णवाहिकेचे चालकदेखील त्रस्त
  • दहा मिनिटात रुग्णालयात पोहचण्याऐवजी खडड्यांमुळे 40 मिनिटाचा करावा लागला प्रवास

मुंबई : मागील काही दिवसांत मुंबई (Mumbai)जवळच्या ठाणे, पालघर जिल्ह्यांत खड्यांमुळे अपघात (accident) होऊन जीव गमावल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे एका गरीब महिलेची प्रसूती (childbirth) रिक्षामध्ये (Rickshaw) झाल्याची घटना चक्क मुंबईत घडली आहे. यामुळे चकाचक मुंबई असं म्हटलं जात असलं तरी मुंबईतील रस्त्यांची खरी परिस्थिती काय हे परत एकदा समोर आलं आहे. दरम्यान रिक्षात प्रसूती झालेल्या महिलेच्या पतीने धावतपळत सांताक्रूझमधील व्ही. एन. देसाई रुग्णालय गाठले. तिथे त्वरित आई अन् नुकत्याच जन्मलेल्या बाळाला दाखल केल्यामुळे त्याच्यावरील संकट टळलं.  (Woman gives birth in rickshaw due to potholes in mumbai )

आदिवासी भागात रस्ते किंवा वाहने नसल्याने गर्भवतींना डोल्यांमधून किंवा खांद्यावरून नेल्याच्या बातम्या आपण वाचल्या पाहिल्या आहेत. मुंबई सारख्या शहरात खड्ड्यांमुळे महिलेला रुग्णालयात नेणं कठिण झाल्याची घटना घडल्यानं प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. या प्रकरणात मिळालेल्या अधिक माहितीनुसार, रमेश यादव हे सांताक्रूझमधील शास्त्रीनगर परिसरामध्ये राहतात. यादव यांच्या एका अपत्याचा जन्मानंतर काही दिवसात मृत्यू झाला होता. यामुळे गावात सुविधा राहत नसल्यानं ते दुसऱ्या प्रसुतीसाठी गावातून शहरात आले. परंतु शहरात तर गावासारखाच अनुभव त्यांच्या नशिबी आला.

Read Also :5G सेवा कधी सुरू होणार? केंद्रीय मंत्र्यांनीच दिली ही तारीख

गावात वैद्यकीय सुविधा नसलेल्या गावी पत्नीचे बाळंतपण केल्यामुळे आपले मूल दगावल्याची सल त्यांच्या मनात होती. यामुळे ते दुसऱ्या बाळंतपणाला शहरात आले, जेणेकरुन काही अडचण आली तर त्वरित वैद्यकीय उपचार घेता येतील. यादव राहतात त्या शास्त्रीनगर येथून रुग्णालय गाठण्यासाठी दहा ते बारा मिनिटांचा अवधी लागतो. मात्र सध्या रस्त्यांवरील खड्डे आणि त्यामुळे होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे तिप्पट वेळ लागत आहे. कळा सुरू झाल्यानंतर त्यांनी आपल्या पत्नीला रुग्णालयात नेण्यासाठी रिक्षा घेतली. परंतु रस्त्यावरील खड्ड्यामुळे त्यांचा जिव टांगणीला लागला होता.

Read Also : सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणी मोठा ट्विस्ट, खुनाचा गुन्हा दाखल

रस्त्यातील खड्डे चुकवत वाहतुककोंडीमधून मार्ग काढत येणाऱ्या यादव यांच्या जिवाची घालमेल होत होती. दहा मिनिटात रुग्णालयात पोहचता येणाऱ्या अंतर कापण्यासाठी त्यांना चाळीस मिनिटे लागली.  परंतु पत्नीला कळा असह्य झाल्याने त्यांच्या पत्नीची अखेर रिक्षामध्येच प्रसूती झाली. त्यानंतर पटकन घाई करत यादव यांनी बाळ व आईला घेऊन ते रुग्णालयामध्ये नेले, तेव्हा डॉक्टरांनी त्वरित बाळाला अतिदक्षता विभागामध्ये दाखल केले. बाळाला नीट श्वास घेता येत नव्हता. आता मात्र बाळाची प्रकृती ठीक असल्याचे यादव यांनी सांगितले.

खराब रस्त्यांमुळे रुग्णवाहिकेचे चालकदेखील त्रस्त झाले आहेत. रुग्णांना वेळेवर पोहचवण्याची त्यांची इच्छा असूनही ते काम वेळेत पूर्ण करू शकत नाहीत. रस्त्यावरील खड्डे व वाहतूककोंडीमुळे रुग्णवाहिकांना रुग्णांना नेण्यास-आणण्यास वेळ लागतो. गर्भवती, अस्थिव्यंग तसेच अन्य रुग्ण, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना सांभाळून न्यावे लागते. त्यांना रुग्णालयापर्यंत पोहचेपर्यंत रुग्णांच्या नातेवाईकांचा जीव टांगणीला लागलेला असतो. त्यामुळे अनेक रुग्णवाहिकाचालकांना रुग्णाच्या नातेवाईकांचा ओरडाही खावा लागतो, असं रुग्णवाहिकाचालक विवेक पाटील म्हणाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी