पालघर : पालघर (Palghar) जिल्ह्यातील मुंबई-अहमदाबाद (Mumbai-Ahmedabad)राज्य महामार्गावर एका कॅब (Cab) महिलेचा विनयभंग (molestation) झाल्याची घटना घडली आहे. सेक्ससाठी नकार दिल्याने चालकाने आणि कारमधील इतर प्रवाशांनी महिलेच्या 10 महिन्याच्या बाळाला धावत्या कारमधून फेकून दिलं. त्यानंतर महिलेचा विनयभंग करुन तिलाही कारच्या बाहेर फेकण्यात आल्याची घटना घडली आहे. (Woman molested in moving car, 10-month-old baby thrown out of cab)
अधिक वाचा : कुठे ढगाळ वातावरण तर कुठे आहे पावसाचा अंदाज
याप्रकरणी मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील आरोपी चालक फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अद्याप आरोपीची ओळख पटलेली नसून चालकाचा तपास केला जात आहे. दरम्यान या लाजिरवाण्या घटनेला जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांने सांगितले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला तिच्या लहान बाळासोबत वाडा तहसीलमधील पेल्हारहून पोशेरे येथे कॅबने येत होती. त्यावेळी त्या कारमध्ये इतर लोक होते. चालकाच्या मनात वासना आल्यानंतर त्याने महिलेच्या हातातील बाळ धावत्या कारमधून फेकून दिले. नंतर महिलेसोबत गैरवर्तन करू लागला. काही अंतर कार गेल्यानंतर महिलेलाही चालत्या कारमधून बाहेर फेकून दिलं. यामुळे पीडित महिला गंभीर जखमी झाली आहे.
अधिक वाचा : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांवर शाईफेक
कॅब चालू असताना वाटेत चालकाने आणि काही सहप्रवाशांनी विनयभंग केल्याचा आरोप महिलेने केला आहे. महिलेने पोलिसांना सांगितले की तिने विरोध केल्यावर त्यांनी तिच्या बाळाला हिसकावले आणि त्याला धावत्या कॅबमधून फेकून दिले यामुळे लहान मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर काही अंतर कार गेल्यानंतर चालकाने महिलेचा विनयभंग केला. 10 महिन्याच्या मुलीला कारमधून फेकल्यानंतर मुलीचा जागीच मृत्यू झाला. महिलाही गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.